Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

_काळ आला होता पण_

Read Later
_काळ आला होता पण_
*काळ आला होता पण...*

*कर्तव्यदक्ष*

सकाळी सगळेच आपापल्या कामात व्यस्त होते. आई नाश्ता बनवत होती, आजोबा वर्तमानपत्र वाचत होते, आजी देवपूजा करत होती. समीर आणि रिया शाळेची तयारी करत होते आणि बाबा... बाबा मात्र सीमेवर देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत होते, कारण ते एक भारतीय सैनिक होते. सध्या आदित्यची (समीरचे वडील) ड्युटी लेह लडाखला होती. वर्षातून दोनदा घरी येत आणि एक महिना सुट्टी एन्जॉय करून पुन्हा नोकरीवर रुजू होत.

कुटुंबातील प्रत्येकजण त्याला खूप मिस करीत. त्यांची आठवण आल्यावर घरच्यांना पत्र लिहून पाठवायचे. रजा संपवून आदित्य ड्युटीवर जायला निघाले की सगळ्यांनाच खूप दुःख व्हायचे, पण त्यांची लाडकी रिया हट्ट करून म्हणायची, "बाबा, मी पण तुमच्यासोबत येणार." आणि खूप रडू लागायची.

आदित्यला कळून चुकलं होतं की आधी देशसेवा करणं हे आपलं कर्तव्य नसून धर्मही आहे. काही महिने तो आपल्या कुटुंबाला भेटू शकणार नाही याचंही दु:ख होतं पण एका शूर सैनिकाप्रमाणे त्यांनी हार न मानता कर्तव्यावर जाण्याचा निर्णय घेतला आणि आणीबाणी देखील होती कारण दहशतवादी हल्ले चालू होते आणि तो आपल्या कुटुंबाला सांगू इच्छित नव्हता की तो त्यांना दुःखी पाहू शकत नाही. आदित्यने विचार केला की आपल्या देशाचे रक्षण केल्यानंतर, दहशतवादी मिशन पूर्ण करून तो परत येईल. आता दहशतवाद्यांचा हल्ला इतका वाढला होता की हाय अलर्ट करावा लागला. आपल्या देशाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात भीषण युद्ध सुरू होत. लोक खूप घाबरले. जेव्हा आदित्यच्या कुटुंबीयांना या दहशतीची माहिती मिळाली तेव्हा ते सगळे घाबरले. पण आपल्या जवानांनी आपल्या शक्तीने आणि शौर्याने त्या दहशतवाद्यांचा नायनाट करून विजय मिळवला आणि आपले ध्येय पूर्ण करण्यात ते यशस्वी झाले. ही बातमी ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला पण दु:खही झालं. कारण त्या हल्ल्यामुळे आपले काही जवान शहीद झाले, काही जखमी झाले, पण सगळ्यांनी शेवटच्या श्वास पर्यंत हार मानली नाही आणि जिंकले.

जखमी झालेल्या जवानांमध्ये आदित्यचाही समावेश होता, ज्यांना गोळ्या लागल्या होत्या आणि जखमा झाल्या होत्या. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आदित्यला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. आदित्यच्या दुखापतीची बातमी ऐकून त्याच्या कुटुंबीयांना खूप धक्का बसला आणि ते लवकरात लवकर हॉस्पिटलला रवाना झाले. त्याची प्रकृती पाहून त्याचे कुटुंबीय खूप रडत होते. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत होते.

आदित्यवर येथे उपचार सुरू असताना दुसरीकडे त्याचे कुटुंब हतबल झाले होते. बराच वेळ निघून गेला पण आदित्यला शुद्ध आली नाही. सर्वजण त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. खूप दिवस झाले पण आदित्यच्या तब्येतीत काहीच सुधारणा नव्हती. डॉक्टर म्हणाले की, "आता जगणे कठीण आहे." हे सर्व ऐकून त्यांचे कुटुंब पूर्णपणे कोसळले पण आठवडाभरानंतर आदित्यला हळूहळू शुद्धी येऊ लागली. डॉक्टरांनी पाहिल्यावर त्यांना आश्चर्यचा धक्काचं बसला आणि हा मोठा चमत्कार असल्याचे सांगितले. शुद्धीवर येऊनही आदित्यने त्याची अवस्था न पाहता आपल्या सहकारी सैनिकांची स्थिती विचारली आणि सांगितले की माझ्यासोबत काहीही झाले तरी त्याच्या साथीदारांना काहीही व्हायला नको. हे सर्व ऐकून डॉक्टरांचेही डोळे पाणावले आणि म्हणाले की, "तू तुझ्या प्रकृतीकडे लक्ष न देता तुझ्या साथीदारांची काळजी करतोस फक्त खरा सैनिकच असा विचार करू शकतो."

आदित्य शुद्धीवर आल्याची बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद झाला आणि ते त्याला भेटायला गेले. त्याला स्वतःपेक्षा आपल्या देशाची आणि आपल्या मित्रांची जास्त काळजी आहे हे त्याच्या कुटुंबाला कळल्यावर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि खूप अभिमान वाटला.

नाव :- शुभांगी घोलप
टीम :- नाशिक
विषय :- काळ आला होता पण
कथेचं नाव :- कर्तव्यदक्ष
स्पर्धा :- इरा राज्यस्तरीय करंडक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//