का तर ती एक गृहिणी आहे म्हणून..

Ka tar ti ek gruhini aahe mhanun

का तर ती एक गृहिणी आहे म्हणून.. भाग 1

“सुलभा तयार झालीस का ग?” राजीव बाहेर हॉल मध्ये बसलेला आणि सुलभाला आवाज दिला.

“हो होतेच आहे.” सुलभा हातात गजरा घेऊन आली.
“अहो, हा गजरा माळून द्या ना जरा.”

“काय सुलभा हे मिडल क्लास सारख वागतेस. तू ना टिपिकल गृहिणी शोभतेस. अग आपण पार्टीला जात आहोत ना? मग थोडे पार्टीविअर कपडे घालायचे ना, साडी का नेसली?”

“अहो छान तर दिसतेय.”

राजीव काहीही न बोलता बाहेर गेला.
त्याने गाडी काढली, सुलभा जाऊन बसली.
गाडी सुसाट निघाली.

राजीवच्या ऑफिस मित्राकडे पार्टी होती.
दोघेही पोहोचले.
दोघेही आत गेले,

सगळ्यांनी दोघांना वेलकम केलं. त्यानंतर राजीव त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारायला लागला, तर सुलभा एका टेबल वर जाऊन बसली.
त्यातल्या काही मित्रांच्या बायका सुलभाकडे बघून कमेंट करत होत्या. की
“ती कोणाची कोणाची आहे? बिझनेस पार्टी मध्ये कशी साडी नेसून आली आहे. टोटल टिपिकल वाटतं ते.” त्यातली एक बाई

त्या बाया सुलभा विषयी कुजबुज करत होत्या आणि ते सगळ सुलभा ऐकत होती, तिचे डोळे पाणावले.

तरी तिने कोणालाही काहीही न दाखवता अश्रू लपवले. थोड्यावेळाने राजीव तिच्याजवळ.

“सुलभा ये माझ्यासोबत, मी तुझी ओळख करून देतो सगळ्यांशी.”

“नाही राजीव तुम्ही जा, मी ठीक आहे.”
“अग चल ना, पार्टीला आलीस ना की  बसायला आलीस, चल ओळख करून देतो.”

“खरंच मला कुणालाही भेटायचं नाही आहे.  राजीव तुम्ही पार्टी एन्जॉय करा, मी घरी जाते. बाय...”
“अगं पण सुलभा..”

सुलभा काहीही न ऐकता घरी निघून गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all