का तर ती एक गृहिणी आहे म्हणून...भाग 2
घरी गेल्यागेल्या तिने हातातली पर्स फेकली आणि बेड वर पडून खूप रडली.
सुलभा आणि राजीवच्या लग्नाला वीस वर्ष झाले. हे दोघे, एक मुलगा आणि एक मुलगी असं चौकोनी कुटुंब होतं.
मुलगा अठरा वर्षाचा तर मुलगी सोळा वर्षाची होती.
लग्न झालं त्यावेळी सुलभा बावीस होती, खूप सुंदर आणि देखनी होती.
बारीक नाजूकशी सुलभा लग्न झाल्यानंतर पहिल्या डिलेवरीतच गोल मटोल झाली. तिने स्वतःला मेंटेन ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण लगेच दुसरी डिलिव्हरी झाली आणि पुन्हा ती स्थूल झाली.
पण तरी सुलभाची सुंदरता कमी झाली नव्हती. तिच्या शरीरात बदल झाल्यामुळे कोणीही तिला काहीही बोलत असे.
राजीव पार्टीवरून आला तेव्हा सुलभा झोपलेली होती.
“काय झालं सुलभा?” का अशी निघून आलीस?”
“काही नाही.”
“खोटं बोलू नकोस, तिथे तुला कोणी काही बोलल का? आणि बोलल तर मला सांगायचं ना. मी बोललो असतो ना तुझ्याबाजूने.”
“काही गरज नाही, तुम्हालाच मी आवडत नाही तर इतरांचे काय? मी इतकी वाईट दिसते का? तुम्हाला शोभत नाही ना? यानंतर मी तुमच्यासोबत कधीच कुठेच पार्टीला येणार नाही. राजीव प्लीज मला बोलायचं नाहीये.” असं म्हणत तिने तोंड फिरवून घेतल.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव उठला, त्याने सकाळची सगळी कामे केली. जेवन, डबा नाश्ता सुद्धा बनवला.
थोड्या वेळाने सुलभा उठली, किचन मध्ये गेली तर सगळं तयार केलेलं होतं. तिला खूप आश्चर्य वाटलं ती खोलीत गेली तर राजीव ऑफिस साठी तयार झाला होता.
“काय आज अगदी सकाळी सकाळी? आणि किचनमध्ये सगळे तुम्ही का केलं?”
“तू पटकन तयार हो आणि माझ्या सोबत ऑफिसला चल.”
“ऑफिसला कशाला?”
“कशाला काय? हा प्रश्न विचारू नकोस मी म्हणतोय ना म्हणून चल.”
सुलभा तयार झाली आणि राजीव तिला ऑफिसमध्ये घेऊन गेला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा