क कोरोनाचा.....( भाग 2) मरण

Why people behave rudely if they are rich. When they know , Last truth is death.

क कोरोनाचा....(भाग 2) मरण

          आण्णा.
          आपले आण्णा म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्व.
असायलाच पाहिजे. अण्णांची हिस्टरी, जिओग्राफीच रुबाबदार आहे म्हटल्यावर.
तर आण्णा सेवानिवृत्त उच्चपदस्थ सरकारी अधिकारी. पण रुबाबाच म्हणाल तर ते कोवळ्या वयापासूनच.
का? बापजादयाची पुण्याई.
आण्णाचे पणजोबा इंग्रजांच्या काळातील चिटणीस.
त्यामुळे रुबाबही इंग्रजी. अगदी पेहरवापासून ते बोलण्या, वागण्यातही.
आजोबाही तसेच.
वडील मात्र वेगळे. साधी राहणी उच्च विचार. भारतीय संस्कृती पालक.
पण आण्णा मात्र आजोबासारखे, रुबाबदार, कर्तृत्ववान.
क्लर्कपासून ते कमिशनरपर्यंतचा पदोन्नतीचा प्रवास.
प्रवासात सगळंच आनंदी आनंद गडे.
एकंदरीत आण्णा खाऊन 'पिऊन' सुखी माणूस.
आणि  पैशाने सुखी माणसाला दुःखी माणसांची ऍलर्जी असते. तशी आण्णानाही होती.
वडिलांना गावातल्या प्रत्येक माणसाचा नि भावभावंडाचा खूप पुळका.
आण्णाना मात्र तेवढीच ऍलर्जी. म्हणून दुरावाही तेवढाच.
उच्चपदस्थ आण्णानि फक्त उच्चस्तरातीलच लोकमाया जमविली.
वडील गावात शेतातल्या घरी जाऊन राहिलेले. त्यांना माहितेय आपला पोऱ्या कसा आहे ते, त्यामुळे अपेक्षा शून्य. आण्णा 'घेनां ना देना, जय विरक्तसेना'. 
 ५ रूमच्या बंगल्यात आण्णा एकटेच.
का? दोन पोर. त्यातील मोठ्या पोराने मोठं नाव करून अमेरिकेत सेटल झालेला. खूप गर्व आहे त्याचा आण्णाना. लहाण्यांनीपन नाव मोठं केलेलं. भारताच्या प्रत्येक राजधानीत तो राज करतोय. नोकरीच आहे तशी त्याला. 
             तर आण्णा 'एकटा जिव सदाशिव'.
घरकामाला नोकर चाकर. मनोरंजन म्हणून क्लब जॉईन केलेलं. सोबत म्हणूंन कुत्रा पाळलेला.
 सर्व निवांत चाललेलं.
              पण मध्येच कोरोना आलाय. नोकरचाकर आपापल्या घरी. काम करायला कुणी नाही. अण्णांना घरकामातील 'घ' सुद्धा माहीत नाही. मोठीच पंचाईत.
अण्णांच्या सौ जिवंत होत्या तेव्हा ह्यांना घरकाळजी नव्हतीच. आणि आताही नाही. अण्णांचं कुठेही, काहीही अडलं नाही. 
का? 'पैसा फेक तमाशा देख'.
पण आता कस? नोकर नाही, क्लब नाही, घराबाहेर पडणं नाही.
करायचं काय?
    तरी चुलतकाकांच्या शहरात राहणाऱ्या पोराचा फोन येऊन गेलेला, "काका सर्व ठीक आहे ना?"
आण्णा - 'सर्व ठीक. बिघडलं तर आपलं अकाउंट भक्कम आहे अजून'.
बरोबर आहे अण्णांचं. सोयच तशी केलेली. कुणासमोर हात पसरायला नको म्हणून.
          पण एक दिवस गझब झाला. घरकाम न करणारे घरकाम शिकताना, करताना अण्णा घसरून पडले. पडले नि तसेच पडून राहिले. भुताच्या बंगल्यात येणार कोण उचलायला. 
स्वतःच उठले, पण त्रास खूप. फोनाफोनी झाली. मोठठ नाव केलेल्या मोठ्याने लहाण्याकडे बोट दाखवलं. लहाण्याने सांगितलं 'भक्कम अकाउंटचा वापर करा'.
            दोघांचीही शारीरिक सोडा मानसिक उपस्थिती नव्हती आणि राहणारही नव्हती.
 का? तर दोघेही आण्णा पेक्षाही भक्कम अकाऊंटवाले व गरिबांची ऍलर्जी असणारे होते. हो. अण्णांचीही ऍलर्जी. आण्णा त्यांच्यापेक्षा गरीबच होते. ऍलर्जीदायक. दोन्ही सुपुत्र कुुपुत्र निघाले. 
व हे लक्षात आणून दिले कोरोनाने. 
               झाडाच्या फांद्याच झाडापासून जाणूनबुजून तुटल्यात मग दुसर्याकडून कोण्या तोंडाने अपेक्षा करणार?
 जे मदतीला येत होते त्यांना आपणच दूर घालवल.
झालं. अण्णांच्या दवाखाणाच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि तशातच आण्णाना थोडाशी सर्दी, थोडासा ताप, थोडासा खोकला सुरू झालेला.
आला. कोरोना आला. अण्णाना ग्रहतारे सोडा आकाशगंगाच आठवली.
अंबुलन्स घेऊन गेली. थोडासा कोरोना मोठा झाला.
आणि त्यावेळी अण्णांचा भक्कम अकाउंट, रुबाब, उच्चस्तरातील मित्र, क्लब कुणीकुणी साधं फोनाफोनी करून विचारलं सुद्धा नाही.
मग काय?
आपले आण्णा आकाशाकडे आशेने बघत बसले.
भक्कम अण्णांचं भक्कम अकाउंट डोळ्यातून टपटप गळत होत.
आठवले. वडील, सौ, नातेवाईक, गाव. 
सर्व ऍलर्जी असणाऱ्या गोष्टी आठवल्या.
पश्चात्ताप. खूप मोठं विष आहे हे. ज्याला याची बाधा होते तो माणूस तीळतीळ तुटतो.
आण्णाही तीळतीळ तुटले व मेले. तुटून तुटून.
कुणी अश्रू ढाळायला नाही, हळहळायला नाही.
'बेचारा मेला' अससुद्धा कुणी म्हटलं नाही.
गावाकडेही शोकांतिका नाही.
मोठं नाव कमवलेल्या पोरांनी मोठी कारणे दिली न येण्याची.
दवाखान्यातील लोकांनी आपापली कामगिरी बजावली. 
जरी कोरोना नसता तरी अण्णांचं मरण असच असत.
का? अण्णांचा भक्कमपणा.
       शेवटी एकच त्रिकालसत्य, "मरण एवढं सहज आहे तर आपल्याला एवढा माज का "?

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास ........
'चुकीला माफी नाही'.
 हसत जगा व सर्वाना हसत जगू द्या.
धन्यवाद.