'क' कोरोनाचा...... ( भाग ४)

It's story of people who lives in chaal in mumbai.

         'क' कोरोनाचा .....( भाग 4 )
 
चाळ.
मुंबईतील चाळ किंवा कॉलोनी म्हणजे छोटेखानी  गाव.
 गावाच्या भाषेत पाडा किंवा टोली म्हणतात.
मुंबई ही अशीच.
पोटात खुपसारे पाडे घेऊन नांदणारी.
तर याच मुंबईतील ' सच्ची घटना कच्चे शब्दोमे'...

तर मुंबईच्या पोटातील, 
एका चाळीतील,
साठीतील, 
जाधव आजोबांना सर्दी, खोकला झालेला.

एरवी जाधव आजोबांना 'अव्वल नंबरची हरामखोर' वाटणारी पोरसोर आता 'अव्वल नंबरची मदतखोर' झालेली...

पोरांचा सूर...."लॉकडाऊनमे कोरोनाको मारना है, इंसानियतको नही".

पोर....
जवळच्याच खाजगी दवाखान्यात घेऊन गेलेली.
 स्टाफने कोरोना टेस्ट केली.

टेस्ट पॉझिटिव्ह...
पोर व चाळ निगेटिव्ह...
काळजात धस्स झालेलं...

अख्खी चाळ धुऊन शॉपिंगला निघालेले..
का ? 
अरे एक पेशंट पॉझिटिव्ह मिळालाय तर आख्खी चाळ सील करणार ना.....
गरजेच्या वस्तू नको घ्यायला....
वस्तू महत्वाच्या, जीवाच नंतर बघू....

खर्च नको म्हणून सरकारी दवाखान्यात शिफ्ट केलेलं.
तिथेही कोरोना टेस्ट...
टेस्ट रिपोर्ट  निगेटिव्ह....
पोर व चाळ पॉझिटिव्ह...
चला सुटलो.....


दक्षता म्हणून दवाखान्यातच ठवलेलं....

रात्री व्हिडीओ कॉलवर अख्खी चाळ जाधव आजोबांशी बोलली.
" लवकर या, वाट बघतोय".
आजोबांचा जीव वरखाली.
प्रेमाचा वर्षाव बघून....
प्रकृती स्थिर, ठणठणीत.....

सकाळी दवाखान्यातून फोन.......
आजोबा गेले......

पुन्हा काळजात धस्सस....
कसे गेले? ठीक तर होते रात्री.......
काय झालं?....

कोरोनाची भीती हाय लेव्हल....
आजोबांचा बीपी लो लेव्हल....
लाईफलाईन मायनस... सरळ....
देवाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट.....

संपलं. चाळ सुटकात पडली.
" चांगले होते आजोबा"......
" सुटला म्हातारा"......
आणि बरेच काही.....

आजोबा गेले.
अंतीमसंस्कार पार पडले.
चाळ उदास....

सकाळीच.…
ज्या दवाखान्यात प्रथम आजोबांना नेलं होत, तिथून फोन...
"माफ करा. जाधव आजोबांना कोरोना झालाच नव्हता. भायखळ्याच्या सखाराम जाधव आजोबांना झालेला मात्र नावात साम्य म्हणून गोंधळ झालेला.  दादरच्या सखाराम जाधवना कोरोना झाल्याचे सांगितले. कसे आहेत आजोबा? आमच्यामुळे झालेल्या तासदीबद्दल  आम्ही क्षमस्व आहोत...."

पोर - "गेले. तुमच्यासाठी असलेले दादरचे सखाराम जाधव आजोबा गेले. कस वाटतय तुम्हाला आता?".
फोन कट...

पुन्हा पोर व चाळ निगेटिव्ह....
मारू की फोडू हा पवित्रा.
पण आजोबा परत येणार का?..

पुन्हा तेच....... "लॉकडाऊनमे कोरोनाको मारना है, इंसानियतको नही".


नमस्कार....

मी इरा वरती नवखी आहे. काही चुका असल्यास द्यावे घ्यावे. 
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.

आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.

🎭 Series Post

View all