'क' कोरोनाचा .....( भाग ८)

Good work make good result.

क कोरोनाचा ....(भाग ८)


तनय
लॉकडाऊनमध्ये घरात बोर झालेला. कुठे जाऊ नि कुठे नको असं त्याला झालेलं.
बारावीचा निकाल लागला पण त्याला सेलिब्रेट करता नाही आलं.
नुसता जळफळाट, चिडचिड, वैताग.
 बरोबर आहे. किती दिवस घरात राहणार?....
मम्मा डॅडा पन बिझी. मनीसुद्धा. मनी छोटी बहीण. पाचवीत शिकणारी.
आणि हा तनय. याला घरात बोर होतय म्हणून बाहेर चाललेला, तोही मम्माशी भांडण करून.

"भांडणार नाहीतर काय?
लहानपणापासून तीने मला दिलंच काय? 
डॅडाकडून अपेक्षाच नको करायला. डॅडला मनीच जास्त प्रिय. मी घरात नकोसा.
मम्मा वेळ तर देत नाहीच, पैसेसुद्धा देत नाही कधीच. जास्त पैसे दिल्याने मूल बिघडतात म्हणे..
मला कुणी समजूनच घेत नाही.
पण घराबाहेर निघालो तर जाणार कुठे? तेही या कोरोनामध्ये...पोलिसांनी पकडलं तर....जाऊदे ना तसही आपण कुठं पळून जातोय...एकदोन तासात परत  जाऊया...
पण सध्या तरी घरी जायला नको..
कोरोना नसता तर मित्रांच्या घरी मज्जा केली असती नेहमीसारखी...मम्माच ते बोरिंग लेक्चर एकण्यापेक्षा हे केव्हाही बरच..
Mamma is very bad. She don't know how to care to children, then why she gave birth to us."

मनीला सुद्धा असच वाटतं होत की मम्मा बॅड आहे म्हणून. कारण हीच.
तर ह्यांची मम्मा सुप्रसिद्ध डॉक्टर आहे, डॅड पण.
डॉ. अनया व डॉ. मनीष.
डॅड नि मम्माच मोठ्ठ हॉस्पिटल आहे. व ते दोघेही पेशंटकडून पैसे लुटतात हा आरोप तनयने ऐकलेला. आधीच मम्माशी पटत नाही त्यात हा आरोप म्हणजे आगीत तेल.
भांडणच भांडण. तेही फक्त मम्माशी. डॅड लक्षच देत नाही ना त्याच्याकडे.

" आज कुठेतरी मज्जा करायची. पैसे? 
आहेतना मम्माच्या बॅगमधून हजार रुपये काढलेत म्हणजे चोरलेत रात्रीच. आजतो एश करेंगे".

एवढ्यात कुठूनतरी आवाज आला...
"कुठे निघा्लास तनय?"

आवाज अनोळखी. कुणीतरी सत्तरीतल्या इसमाने दिलेला.
तनय - आपण कोण?

आजोबा - मला तू नाही ओळखणार, पण मी तुला चांगला ओळखतो. सांगतो, सर्व सांगतो.

आजोबा तनुच्या खांद्यावर हात ठेवतात व रस्त्याच्या बाजूच्या बाकावर बसायला घेऊन जातात.
दोघेही बसतात.

आजोबा - एवढासा होतास जेव्हा तू अनयाला सापड्लास ती तडक माझ्याकडे घेऊन आली होती तुला....

तनु - सापडलो होतो..... मला कळलं नाही काय बोलताय ते......मी तुमच्याकडे......

आजोबा - अरे बापरे तुला माहीत नाही की काय?...सॉरी सॉरी...मला वाटलं नव्हतं तुला माहित नसेल म्हणून....मी ओघात बोलून गेलोरे...

तनु - खरं काय ते सांगाना आजोबा ...मला काय माहीत नाही...

आजोबा - 
अरे लेकरा....सांगतो .. ऐक....तुझी आई नेहमीसारखी आमच्या वृद्धाश्रमात येत होती. धोधो पावसात तिला तू नाल्याच्या काठाजवळ सापड्लास...तशीच बिचारी उचलून रडतरडत माझ्याकडे गोकुळात आली...नवीनच लग्न झालेली पोर....कुणीतरी स्त्री बाळाला जन्म देऊन लगेच फेकून देते हे बघूनच तिला खूप रडायला येत होतं...आणि तिच्यातील मातृत्व जागृत झालं..आम्हा म्हाताऱ्यावर निशुल्क उपचार करणारी  डॉक्टर त्यादिवशी तुझी डॉक्टरआई झाली..आम्हाला तो दिवस चांगलाच लक्षात आहे..तेव्हापासून वृद्धाश्रममध्ये अनाथ मुलेही संगोपनासाठी सुरुवात केली आणि वृद्धाश्रम गोकुळ झाले...तुझ्या आईला तुला मिळवण्यासाठी जगाशी नि तुझ्या वडिलांशीही झगडावं लागलं. तुझ्या वडिलांना दुसऱ्याच्या रक्ताचं पोर नको होत पण ती म्हणाली की तुझ्या शरीरात माणसाचंच रक्त आहे हेच खूप मोठ्ठ कारण आहे तुला जवळ घेण्यासाठी आणि शेवटी तीच जिंकली..
आणि हो तुझं तनय हे नाव आम्ही म्हातार्यांना ठेवलेलं बरं.. अनयाचा तनय...बाळा ग्रेट आहे रे तुझी मम्मा. अशी माणसं लाखात एक असतात रे. सांभाळ हो तिला..

एव्हाना तनु रडायला लागलेला...
आजोबा - का रडतोस बाळा? वाईट वाटलं का तुझे आईबाबा तुझे नाहीत म्हणून...

तनु - नाही आजोबा माझे मम्मा डॅड माझेच आहेत म्हणुन ..... 
पुढे त्याला बोलवेना..
तनु घराकडे पळत सुटला..

इकडे डॉ. अनया आणि  मनी, तनु रागात घरातून निघून गेला म्हणून काळजीत होते. फोन करून डॅडलापण बोलावलं होतं. डॅड खूप रागात होता.  तो अनुलाच बोलायला लागला " याच कारणासाठी मी त्याला जवळ घेणार नव्हतो. शेवटी संस्कार हे रक्तातच असतात हे दाखवून दिले त्याने. मी याअगोदर पण त्याने पैसे चोरल्याच बघितलंय, आणि तो सिगरेट पितानासुद्धा. पण तुझ्यामुळे गप्प राहतो आहे. तुझ्यामुळे मी माझ नाव त्याच्यासारख्या नालायकाला लावावे लागतेय. पण मनातून मी त्याला माझा पोरगा कधीच स्वीकारलं नाहीये आणि स्वीकारणारपण नाही."

डॉ. अनुचे अश्रू थांबता थांबत नव्हते. नवऱ्याला कस उत्तर द्यावे, कस समजवावे हेच तिला कळत नव्हतं.
ती फक्त तनुच्या काळजीत होती. कोरोना, लॉकडाऊन, पोलिस, कर्फ्यु हेच तिच्या डोक्यात फिरत होत.

तेवढ्यात..
तनु आला... 
आला नि रडतरडत डॅडला चिटकून आणखी जोरात रडायला लागला..
त्याला बघून अनयाला हायसे वाटले पण तो का रडतोय हे कळेना. पोलिसांनी मारलंबिरल तर नाही या शंकाकुशंका...
डॅडला ही कळेना तनु त्याला चिटकून का रडतोय. कारण  एरवी ते दोघेही काम असेल तेव्हाच बोलायचे.
चिडलेला डॅड शांत झालेला होता.
 
तनु रड रड रडला. सर्वजण हैराण.
तो थोड्या वेळाने शांत झाला. 
" मम्मा, डॅड मी तुमचा गुन्हेगार आहे. सॉरी फॉर ऑल".

सर्वजन शॉकमध्ये..
तनु - मम्मा मी रात्री तुझ्या बॅगमधून एक हजार पैसे चोरले. सॉरी. मी खूप वाईट आहे ग....(पुन्हा रडारड)
मी मध्येमध्ये सिगरेट पण पितो, ड्रिंक पण घेतो, पण मी ठरवलंय मी सुधारणार.. सॉरी ...आता मी फक्त अभ्यास करेल...डॅड म्हणतील तसच करेल..


डॅड - हे सर्व तू काय बोलतोय?. तुला कुणी काही बोलल का?....
 (मध्येच......)

तनु - मी ठरवलंय यांनतरच शिक्षण मी स्वतः कमवेल आणि पूर्ण करेल..कारण तुम्ही मला जवळ घेतलं नसत तर मला अनाथाश्रमात हेच कराव लागलं असत..

मम्मा नि डॅड एकमेकांकडे बघत असतात. आतापर्यंत स्वतःचे रक्त नसलेल्या त्या मुलाकडे डॅड स्वतःच्या मुलाप्रमाणे बघत होते. तनूला त्यांनी जवळ घेतलं नि विचारलं

डॅड - काय झालंय ते नीट सांग..

तनु - मला गोकुळमधल्या आजोबांनी सर्व सांगितलंय.
मम्मा तू बॅड मम्मा आहेस, मला आधी का नाही सांगीतलं गोकुळबद्दल जेव्हा मी विचारत होतो की तुला भीती वाटत होती की मला समजेल तेव्हा दुःख होईल म्हणून.......
(तनूच रडणं चालूच होत.) पण आज मला कळलं तर मला दुःख नाही अभिमान वाटतोय की मी तुमचा मुलगा आहे..

डॅडला आपलं नाव लावणं सार्थक झाल्याचं वाटत होतं. पण त्याला कळत नव्हतं की तो तर तनु कडे अजिबात लक्ष देत नव्हता मग हा त्यालाच का चिटकून रडतोय. तनुला वाटत होतं की आतातरी त्यांनी तनूला प्रेम द्यावं. वडीलासारखच.

तनु - डॅड मी तुमच्यासारखाच मोठ्ठा डॉक्टर होईल आणि तुमचं नाव रोशन करेल. तुम्ही जे माझ्यासाठी केलंत ते उपकार तर मी फेडू शकणार नाहीं पण जेवढे शक्य आहे तेवढे तुमचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि मम्मा मी तुझ्यासोबत गोकुळात येणार आहे, नेहमीच, आयुष्यभर निशुल्क सेवा करेल तुझ्यासारखीच.

मम्मा आणि डॅडाला जग जिंकल्याचा आनंद झाला. त्यांना कळलं होतं की केलेले चांगले कर्म चांगले परिणाम घेऊन येतात.


आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.

आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.

🎭 Series Post

View all