'क' कोरोनाचा .....(भाग 5)

Its story of happyness.

'क' कोरोनाचा .....(भाग 5)


लॉकडाउननंतर खूप दिवसांनी दुकान उघडलेलेत.

"जय श्रीकृष्ण...
हे भगवान धंदेमे बरकत दे...
अरे बापरे .....आजपण उशीर झालाय...
लवकर दुकान उघडायला पाहिजे....
अरे सात वाजले तरी हा मुलगा आला कसा नाही...."

अस बोलून मदनशेठ दूध आणि मिठाईची दुकान उघडतात....
तेवढ्यात त्यांच्या दुकानात काम करणारा अठरा वर्षाचा बिहारी पोरगा बल्लू येतो... 

मदनशेठ - किधर मर गया था बे सुअरके बच्चे? अभि कितना टाइम हो गया हे ? दुकानमे झाडू कौन मारेगा, तुम्हारा बाप?

बल्लू - मालिक माँ बिमार हे इसलीये....

मदनशेठ - ये तुम्हारी क्या मगजमारी चलती रेहती हे, कभी माँ बिमार, कभी बाप बिमार... तुम लोग इंसान हो या बिमारी की दुकान....
साला कामचोर कहीका....
ऐसा बारबार करोगे तो पगार कट करूंगा तुम्हांरी...
हम को क्या रतन टाटा समज रखा हे क्या दानपुण्य करने केलीये ...

बल्लू - मालिक, अमूल दुधका डिलिव्हरी अभितक हुआ की नाही....

मदनशेठ - हमसे क्या पुछते हो बे? हमभी तो देर से आये हे, तो दुकान का ये हाल...
समज नही आता तुम पढेलिखे कैसे बन गये?..गवार कहिके....
अबे साले देखके काम कर.....दूध तुम्हारे बाप के घरसे नाही आता ...

अस मदनशेठच सकाळीसच तुणतुणे सुरू झालं होतं. दररोजसारखाच. 
बल्लूवर चिडल्याशिवाय, त्याच्या आईबापाची आठवण काढल्याशिवाय त्याच दुकान चालत नसे.. आजही तेच..
दुकानासमोर कचरा बघून अजून रागावला..

मदनशेठ - ये साले BMC के लोग बहुत आलसी हे. इनको सुबह जलदी आके झाडू मारनेको नही होता हे..साले कामचोर.....

असच बडबडत मदनशेठच काम सुरू होत.
रेल्वे स्टेशनच्या बाजूला शेठचे दुकान. 
भरघोस कमाई तशी भरघोस मुजोरीही चालायची सगळ्यावर..

सकाळचे साडे आठ वाजले होतें.
सखाराम. BMC (मुंबई महानगर पालिकेचा सफाई कर्मचारी)
रेल्वे स्टेशणच्या बाजूला, मदनशेठच्या दुकानासमोर झाडू मारत होता. तो साधारण पन्नाशीतला असावा.

तेवढ्यात ऑटोरिक्षामधून एक पस्तीशीतील बाई उतरून फोनवर बोलत येत होती. व सखाराम पाठमोरा झाडू मारत होता. ती बाई पुढे जायला नि सखारामने झाडून कचरा पुढे ढकलायला एकच वेळ ..कचरा तिच्या ड्रेसवर उडाला....

ती बाई खूप जोरात ओरडली... " तने सु करेंछो गंधेडो? तमे जोता नथी? तमे पागल थई गया छो? मेरी  इतनी मेहंगी ड्रेस खराब करदी पागलने...

म्हणजे तू हे काय केलेस? तुला दिसत नाही का? तू पागल झालास काय? असं बरंच काही ती त्याला बोलायला लागली.

 सखाराम - ओ मॅडम सॉरी हं, माझं लक्ष नव्हतं  आणि तुमचंपण.. पण सॉरी हं...

ती - तुम्हांरी कॅम्पलेंट करूगी मै. You rascle, stupid  man. 

  सखाराम - ओ बाई नीट बोलायचं हं..

ती - काय नीट बोलायचं? तुझे डोळे फुटलेत काय?

सखाराम - हो का. फोनवर तुमचा बाप बोलत होता काय रस्त्यावर चालताना. आणि म्हणे माझे डोळे फुटलेत.. रासकल म्हणतेस काय मला..
एक तर स्वतः च लक्ष नाही, नि मला स्टुुपिड बोलतेय ही बया. तरी मी हिला सॉरी बोललो.
 
 ती - तू माझा बाप काढणार काय? तुला नाही नोकरीवरून काढल ना, तर नावाची शीना पटेल नाही.
तुम कचरेवाले ईतनासा पगार घेता नि माजलाय किती? 

 सखाराम खूप चिडतो -
हो आम्ही माजलोत ना, तुम्हीच आमचा पगार देताय ना.
आम्ही माजलोत म्हणून तुम्ही स्वच्छ रस्त्यावर चालताय.
आम्ही माजलोत, म्हणून तुम्ही फेकलेले प्लास्टिक, चॉकलेट रॅपर, बिसलेरीच्या बॉटल, आणि तुमचे थुंकणे साफ करतो.
आम्ही माजलोत तरीही तुमच्यासारख्या श्रीमंतांना सन्मान देतो नि तुम्ही आम्हाला किळसवाण्या नजरेने बघताय.
          अरे आम्हीपण माणसं आहोत, कचरेवाले नाही, साफसफाईवाले आहोत. आणि आम्हाला गर्व आहे आमच्या कामावर. 
           निदान आम्ही घाण तर करत नाही तुमच्यासारखी वस्तूंची, शब्दांची नि माणसांचीही...
         आम्ही जर माजून या लॉकडाऊन मध्ये घरी बसलो असतो तर तुमच्यासारख्या श्रीमंतांना कचऱ्याच्या ढिगातून रस्ता शोधावा लागला असता नि मग ऑफिसला जावं लागलं असत हे विसरू नका.

एव्हाना आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमलेली असते. ती ओशाळली  'तुला बघून घेईन' अस बोलून निघुन गेली. 

 मदनशेठही हे सर्व बघत असतो.
सर्वजण गेल्यावर सखाराम शिव्या हासडत हळूच डोळ्याच्या कडा पुसत होता व हे मदनशेठ ने पाहिलं. 
त्याने सखाराम ला बोलावलं व पाणी दिल.

शेठ - भाई ये थोडा पाणी पिलो. त्या बाईच बोलणं मनावर लावून नको घेऊ. असतात असे काही मूर्ख जे माणसांना माणसं समजत नाही.

बल्लू मदनशेठकडे बघतच राहिला......................
.......................................................................

दिवस दुसरा...
पुन्हा सकाळी मदनशेठच तुणतुणे पण तीव्रता कमी....
पुन्हा सकाळचे साडे आठ.
पुन्हा सखाराम चे झाडू मारणे 
पुन्हा तीच बाई..
पुन्हा तिच्या कपड्यावर कचरा उडाला...
पण यावेळी सखाराम चिडला. तो काही बोलणार तेवढ्यात....

ती - सॉरी भाई. चुकलं माझं. मी कल नको ते बोलली.. Sorry for all that and take it.
हे घे नि मला क्षमा करा..  ...

सखाराम चिडलाच होता " हे काय नवीन नाटक?"

ती - हे डेरी मिल्क चॉकलेट आणि रेनकोट. अभी  बारीश येणार ना म्हणून तुमच्यासाठी आणलं. ये लो और माफ करो प्लीज...

सखा - नको तुमचे उपकार. सबके सामने इन्सल्ट किया और माफी अकेले मे. असु देत. ते सर्व ठेवा तुमच्याकडे....

ती - नही नही. ऐसा मत बोलो, मैं कान पकडती हु, पाया पडू का? ....
अस बोलून ती खरच वाकते तेव्हा सखाराम मागे होतो आणि हसून तिला माफ करतो नि बोलतो - 
Remember one thing, with human behave like human.

तशी ती अजून आदराच्या भावनेने त्यांच्याकडे बघते.
ती चॉकलेट नि रेनकोट देते नि हसत हसत जाते.

मदनशेठ हेही सर्व पाहत होता. तो बल्लूला बोलावतो व म्हणतो - 
बल्लू ये लो ऍडव्हान्स मे पैसे , अपनी माँ का इलाज करवा लेना और साथमे घर जातेटाइम मिठाई साथ लेते जाना.  और हा...ये डेरी मिल्क चॉकलेट तुम्हारे लिये.......

 दोघांच्या चेहऱ्यावर मोठ्ठी इस्माईल......

Kiss me close your eyes...... n miss me...
I can read your lips on your fingertips....N happyness in your eyes.......

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

माझी पोस्ट माझे नावरहित सामायिक केल्यास.......... चुकीला माफी नाही. (कॉपीराईट भानगड वैगेरे वैगेरे.)
हसत जगा नि सर्वाना हसत जगू द्या.

आपल्याला जर माझ्या कथा आवडत असतील तर मला फॉलोव करा.

🎭 Series Post

View all