कै. भाऊसाहेब वर्तक वृद्धाश्रम

एक हृदयस्पर्शी .धक्कादायक कथा..
कै. भाऊसाहेब वर्तक वृद्धाश्रम

मी समीर अतिशय चांगले शिक्षण असूनही सुशिक्षित बेकार .रोज नौकरी साठी वण - वण फिरतोय फक्त माझ्या साठी नाही तर आई -बाबांनसाठी ...
हो!कारण आम्ही तीन भाऊ मी सगळ्यात लहान दोन्ही भावाची लग्न झाली.त्यांच्या लग्नानंतर दोन तीन महीने ठीक होत पण नंतर दोन्ही वाहिनीनी त्यांचा खरा रंग दाखवायला सुरवात केली दोघीही अतिशय स्वार्थी आणि भांडखोर् आई बाबांना खूप त्रास देत ..मी मधे बोललो तर माझी बेकारी आणि त्या मुळे घरातील लाचारी वैगरे सगळी काढली जायची .दोन्ही भाऊ नेहमी त्यांचीच बाजु घेत.रोज -रोज घरी अगदी तमाशा असे.मला जर नौकरी मिळाली असती तर लगेच घेऊन गेलो असतो आई -बाबांना या नरकातून ..
शेवटी तो आनंदाचा दिवस आलाच मला नौकरी मिळाली .काय करू आणि काय नाहीँ अस झाल होत .कधी एकदा घरी जातो आणि आई -बाबांना ही गोड बातमी संगतो अस झाल होते ..एक किलो पेढे घेतले आणि तडक घरी आलो.
पाहतो तर काय दोन्ही वाहिनी आणि भाऊ यांचे आई -बाबांन बरोबर कडाक्याच भांडन सुरु होते.आमचे तिघांचे समान बांधून आम्हांला घराबाहेर काढायची तयारी सुरु होती .मी गेल्यामुळे तर अजूनच भांडण वाढले.
मी तडक आई -बाबा व माझे समान घेऊन घरा बाहेर पडलो.रिक्षात बसलो आणि माळी रोड अस सांगितल.माळी रोडला एका मोठया गेट जवळ रिक्षा थांबवली .आम्ही तिघं रिक्षातून उतरलो .वडील रिटायर प्राथमिक शिक्षक आणि आई अशिक्षित बाबांनी तो गेट वरचा मोठा बोर्ड वाचला. कै .भाऊ वर्तक वृदधाआश्रम. तो बोर्ड वाचत असताना मी त्यांचे चेहऱ्यावरील भाव पहात होतो .त्यांचे लपलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते .कसले कसले विचार आले असतील त्यांच्या मनात.
मी समान उचलले आणि गेट जवळ गेलो वॉचमन ने मला सलाम केला व गेट उघडला .आम्ही आत प्रवेश केला .आश्रम तसा खूप मोठा होता .समोर मोठी बाग होती बागेत बऱ्याच बांका वर म्हातारी मानस बसली होती .कोण एकटा कोण जोड़ीने कोणी ग्रूप मधे .... आई अशिक्षित होती पण हा अनाथ आश्रम आहे हे न समजण्याइतपत नक्कीच खुळी नव्हती. बाकांवर बसलेल्या त्या सगळ्यांची नजर काही ना काही शोधत होती.कुणी आपले नातवंडचे चेहरे ,कुणी विदेशी असलेला आपल्या मुलाचा चेहरा,तर कुणी आपल्याला या आश्रमात सोडून गेलेल्या आपल्या मुलाचा लहानपणी चा चेहरा.. खरंच वरून सर्व सामान्य ...पण आतुन? ..तेथुन चलाताना आई -बाबांना काय-काय वीचार येत असतील ? पण माझा नाईलाज होता.
आम्ही चालत -चालत आवारातच आश्रमाच्या बाजुला असलेल्या एका सुंदर बंगलो घराजवळ आलो.अधीक्षक निवास अशी मोठी पाटी तेथे लावली होती आणि बाजुच्या मोठ्या इमारतीत खाली कार्यालय.मी समान बाहेर ठेउन आई बाबाना घेऊन कार्यालयात शिरलो .तिथं एक सुंदर गोंडस मुलगी बसली होती तिच्या टेबल वर अधीक्षिका अशी लकड़ी पाटी होती.आणि आत मधील केबिन मुख्यअधीक्षक यांची होती .
आम्हांला पाहिल्या बरोबर त्या मुलीला खुप आनंद झाला जणूकाही ती आमचीच वाट पाहत होती. लगेच खुर्चीतून उठली आणि आई -बाबांच्या पाया पडली.आई बाबांना तेव्हा तश्याही परीस्थितीत बर वाटलं .चला मुख्य अधीक्षक येई पर्यंत आपण त्या घरात बसु ! ती म्हणाली .
लगेचच ती मुलगी आम्हांला ऑफिस मधून बाजूच्या .मुख्य अधीक्षकांच्या निवासात घेऊन गेली.
अतिशय मोठ घर होत घरात सजावट देखिल छान होती बाहेर सुंदर अशी बाग होती.आम्ही सोफ्यावर आरामात बसलो होतो .त्या मुलीने लगेचच चहा भिस्किट आणली .बराच वेळ शांतता होती.शेवटी मला राहवले नाही व
मी आई -बाबांना म्हणालो ही मीरा आणि तुमची होणारी सुन ! माझ हे बोलणं ऐकून दोघही माझ्याकडे निशब्द होऊन पहातच राहिले हो! मीरा चेआई वडिल लहान पाणीच गेले आजी ने संभाळ तीचा.मीरा चांगली शिकलेली आणि नौकरी ला देखिल आहे.कॉलेज पासुन आम्ही एकमेकांवर प्रेम करतो.आई -बाबांना आज सकाळ पासून धक्यावर धक्के बसले होते. त्यांत हा आणखीन एक.पण काहीही असो मात्र आश्रमात राहण्याचा धक्का त्यांच्या साठी फार मोठा होता हे त्यांचे चेहऱ्यावर मात्र स्पष्ट दिसत होते.
शेवटी बळ एकवटुन बाबांनी विचारले कधी येतील मुख्य अधीक्षक ?
बाबांच्या या प्रश्न वर मी आणि मीरा खळखळून हसलो .आई -बाबांना मात्र काही समजले नाहीँ .मग मीच म्हणालो ..बाबा! तो मुख्य अधीक्षक म्हणजे मीच!.मला आजच ही नौकरी मिळाली आणि हे घर सुद्दा ...मीरा गंमत करत होती तुमची .आपण येण्याची तिला आधिच कल्पना होती.आणि हो तुम्ही आश्रमात नाहीँ तर या आपल्या घरी रहायचे !
मला आई -बाबांच्या चेहऱ्यावर आताचे भाव पहायचे होते म्हणुन मी त्यांना गेटवर काही संगितले नाही.किती - किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि तोच आनंद मला पहायचा होता. तो पाहताना माझे अश्रू थांबत नव्हते. ...फक्त ते अश्रू आश्रमातील इतर अश्रू पेक्षा वेगळे होते.

(सदर कथा काल्पनिक असुन या कथेतील स्थळ नावे यांच्यात यांच्यात काही समानता असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..)
- चंद्रकांत घाटाळ
मो.७३५०१३१४८०