.?????????????????????????????
तिच्या त्या गहिऱ्या टपोरी डोळ्यातून अश्रू चा एक थेंब घरंगळत येऊन तिच्या मनगटावर पडला ,तसे तिचे लक्ष हाताकडे गेले .तिच्या हातात बेड्या होत्या ,अश्रू पडलेल्या जागी जखम झाली होती.इतक्या दिवसातून तिने स्वतःकडे पाहिलच न्हवत व्यवस्थित ,तिने तशीच तिची भिरभिरती नजर पूर्ण हातावर टाकली तर तिचे पूर्ण हात बँडेज ने कव्हर केले होते .
आता पुढे..........
तिने इकडे तिकडे नजर फिरवली आणि एका ठिकाणी तिची नजर थांबली समोर तिच्या आरसा होता ,ती तशीच चालत आरश्या पाशी आली .खूपच विद्रूप अवस्था झाली होती तिची . मानेपासून पायाच्या नखा पर्यंत तिला पॅक केलं गेलं होत, जसं एखाद्या मेलेल्या मड्याला पॅक करतात तसे , मानेपासून खांद्यापर्यंत ड्रेसिंग होत ,दोन्ही हात ड्रेसिंग ने झाकले होते अंगात हॉस्पिटल चा लाँग गाऊन होता पायांना ढोपरपर्यंत सोक्स घातले होते .जेणेकरून तिला तिच्या जखमा दिसू नयेत .
पण म्हणतात ना शरीरावरचे घाव जरी मिटत गेले तरी त्याच्या खुणा मिटता मिटत नाहीत ,त्या दिसतातच आणि तिच्या जखमा अश्या सहज मिटणाऱ्या न्हवत्याच.
तिने तिचा ड्रेस खालून वर केला ,तर ती थोडी गोंधळली च कारण तिच्या कमरेपर्यंत फक्त ड्रेसिंग होते.तिने तसाच ड्रेस आणखी थोडा पोटापर्यंत वर केला ,तिथे थोडीशी जागा रिकामी होती. पण त्या जागेवर काहीतरी होत ,तिला त्या हार्ड ड्रेसिंग मुळे जास्त वाकता येत न्हवत म्हणून तिने आरश्यात पाहिलं ,तर त्या जागेवर काहीतरी कोरलेल जाणवलं तिला तिने ,अलगद त्या जागेवर हात ठेवला तर खूप खोल काहीतरी कोरल गेलं आहे . असं वाटलं तिला .
तिने आरश्यात पाहिलं आणि तिथेच समोर एक मिनी आरसा तिला दिसला तिने तो हातात घेतला आणि त्या जखमेच्या जवळ घेऊन आली ,काहीतरी लिहिलं होतं .. पण काय तेच समजत नव्हत...त्या आरश्यात ती अक्षर उलटी दिसत होती .तिने निरखून पाहिलं तर दोन शब्दी अक्षर होत ते .तिने तशीच आपली बोट त्याच्यावरून फिरवली आणि......
ती तशीच गोठून थांबली त्या अक्षरासर्शी ती हायपर होऊ लागली ,तिच्या श्र्वासांची गती वाढली चेहऱ्यावर घाम जमा झाला .डोळे रक्तासारखे लाल झाले ,तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले .
ती आता खूपच पॅनिक झाली ती बेड्याचे हात झटकू लागली ,वेड्यासारखी करू लागली तिने आजूबाजूला पाहिलं तर तिच्या बेडच्या बाजूला टेबल लंप तिला दिसला ,ती धावत तिकडे गेली आणि तो लॅम्प वायर सकट उपसून काढला आणि तितक्याच ताकतीने तिने समोरच्या अर्श्यावर तो लॅम्प फेकला .तसा आरसा हजार तुकड्यात विखुरला ......
"आssssssssssssssssss........?
आता पुन्हा ती आउट ऑफ कंट्रोल झाली ,पूर्ण रूम अस्ताव्यस्त करू लागली ,जमिनीवर हात आपटून हातातल्या बेड्या तोडण्याचा प्रयत्न करू लागली, पण खाली पडलेल्या काचा खचाखच तिच्या हातात घुसू लागल्या , पण तिला पर्वा नव्हती त्याची ,तिने तशीच खाली पडली काच उचलली आणि हातावरच्या ड्रेसिंग फाडून टाकले ,तसेच मानेवरचे ही .तिने पूर्ण ड्रेसिंग ओरबाडून काढले आणि..........?
तिच्या जखमा उघड्या पडल्या तिची नजर हातावर गेली तर ,पुन्हा तीच अक्षर दोन्ही हात भरले होते तिचे ,तसेच तिने पायाचे सोक्स काढून तेही ड्रेसिंग फाडून टाकले तर तिथेही सेम ,आता ती थरथरत होती ,तिने रागाच्या भरात तिच्या अंगावरचा ड्रेस फाडून टाकला आणि वेड्यासारखी पूर्ण शरीर चाचपडून पाहू लागली तर तीच पूर्ण शरीरावर ड्रेसिंग केलं गेलं होतं .
ती तशीच ओरडत ,किंचाळत ते फाडू लागली .
"मॅडम ..मॅडम....." एक मुलगी धावत त्यांच्याजवळ आली .
"अग काय झालं... इतकी का धापा टाकत आलीस ..?" त्या बोलल्या
" मॅडम...ते..ते....तिथे रू...रूम...मध्ये... त..त्या..." ती मुलगी अजुनही धापा टाकत होती .
"अग हो हो शांत हो आधी आणि नीट सांग काय झालं ते ..." एक वयस्कर गृहस्थ
"सर..त्या मॅडम ..त्या... अग्नी मॅडम ..त्या पुन्हा कंट्रोल च्या बाहेर गेल्या आहेत ...." त्या मुलीने सांगितल तसे डाईनिग टेबलवर बसलेले सगळेच ताडकन उठले.
"कंट्रोल च्या बाहेर गेल्यात म्हणजे .." त्या काळजीने
"ते..ते..."ती मुलगी इकडे तिकडे पाहत
"अग बोल पटकन ...." त्या जोरात ओरडल्या तिच्यावर
"त्यांनी पूर्ण रूम अस्ताव्यस्त केली आहे ,आणि ..आणि "त्या मुलीला कसं सांगावं तेच कळत नव्हतं .
"अग ये मूर्ख मुली बोल..." त्यांना आता सहनच होत नव्हत
" ते त्या...त्यांनी.. आ..अंगावरचे... क..कपडे..आणि ड्रेसिंग पण फाडून टाकले आहे ....आणि एकदम वेड्या सारख्या ओरडत आहेत ...." ती मुलगी घाबरत बोलून गेली पण इतकं ऐकायला त्या तिथे होत्याच कुठे .
त्या धावत तिच्या रूम कडे आल्या तिची रूम साऊंड प्रूफ असल्याने कुणाला तिचे ओरडणे ऐकूच आले नाही , त्यांच्या मागे त्यांचा परिवारही धावत आला ,त्यांनी धावत येऊन त्यांच्याकडच्या चवीने रूमचा दरवाजा उघडला आणि........
त्या जागीच थबकल्या समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली .डोळे मोठे झाले त्यांचं अंग थरथरत होतं . ती जमिनीवर बसून तीच पूर्ण अंग ओरबडत होती .त्यामुळे तिची नखं त्या जखमा आणखी चिघळत होत्या , तिने सगळे कपडे फाडून टाकले होते .एकही कपडा अंगावर नव्हता तिच्या ,त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं .
"आंहssssssssssss..........
त्यांनी कपाळाला हात लावला तर तिने छोटा आरसा त्यांना फेकून मारला होता ,त्यांनी कपाळावरचा हात काढला तर छोटी जखम होऊन त्यातून थोड रक्त येत होत. पण तिच्या त्या विदारक जखमेपुढे त्यांची ती छोटी जखम काहीच नव्हती.
"अरे देवा...." त्यांच्यासोबत आलेली जेमतेम त्यांच्याच वयाची स्त्री ओरडली .तीच तर समोरच दृश्य पाहून रक्तच अटल.
"नीलम पटकन धनुला कॉल कर मी तिला सांभाळते ,आणि मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत कुणालाच आतमध्ये पाठवू नको ." त्या रूम मध्ये गेल्या आणि दरवाजा लावणार तितक्यात
"ताई पण तुम्ही एकट्या आतमध्ये...? मी पण येते बघा किती चवताळले आहे ती ..तुम्हाला एकटीला नाही सावरणार .." दुसऱ्या महिला
आर्य च्या आईने एकदा तिच्यावर नजर टाकली ,जी वेड्यासारखी स्वतःच्या शरीराला ओरबडत होती .त्यांचं हृदय पिळवटून निघत होत .एका कळीच असं कुसकरन सहनच होत नव्हत त्यांना .
"नको काळजी करू मी घेईन सांभाळून तू लवकर धनू आणि मान ला पण बोलावून घे आपल्याला तिला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाव लागेल जा लवकर .." त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसले आणि दरवाजा बंद केला .आणि तिथेच थांबून त्या तिच्याकडे पाहू लागल्या .
ती सैरभैर झाली होती रडत नव्हती ती फक्त ओरडत होती,किंचाळत होती .तिची नजर दरवाजात थांबलेल्या आर्य च्या आईवर गेली आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून गेले ....आता ती मोठमोठ्याने हसू लागली खूप मोठ्याने .....ज्यामध्ये अखंड वेदना होत्या ....तिने आपला जबडा घट्ट केला आणि खाली पडलेली काच घेऊन हसत हसत पुन्हा डाव्या हाताच्या मनगटावर ठेवली ....
"तुम्ही नाही वाचवू शकणार मला ....मी ....**** आहे ...हाहाहा......मी....******आहे......?.." मोठ्याने हसत तिने काच हातावर खोलवर रुतवलीच होती की .
कुणीतरी येऊन तिला घट्ट मिठी मारली ,ती ती मिठी सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यांनी तिला हृदयाशी एकदम घट्ट पकडून ठेवलं होतं ,त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते .पूर्ण रक्ताने ओलीचिंब झाली होती ती ,तिला सावरण खूप कठीण जात होत त्यांच्यासाठी .आपल्या डोळ्यासमोर एका नाजूक कोवळ्या कळीची अशी अवस्था ..खूप यातना होत होत्या त्यांना .
ती खूप धडपडत होती पण त्या तिला सोडायला तयारच न्हवत्या ,एका आईने आपल्या वासराला कुशीत घेतलं होतं .
अगदी घट्ट बिलगून ,जणू तिचा त्रास ,तिच्या यातना,तिच्या किंकाळ्या ,तिच्या जखमा सर्व काही स्वतःमध्ये सामावून घेत होत्या ...............
एक नवजात शिशू जन्माला आल्यावर जसं आई त्याला बिलगते अगदी तशी ..........
त्रास ती स्वतः ला करून घेत होती पण त्याचे घाव त्यांच्या मनावर होत होते.......
काही क्षणासाठी त्यांच्या मनात आल की संपवावी तिची ही तडफड कायमची मुक्त करावं तिला या वेदनादायी आयुष्यातून मासळी सारखी तडफडत होती ती त्यांच्या कुशीत ......
पण शेवटी एका स्त्रीचं काळीज होत ते तिला मुक्त केलं तर तिच्या अवस्थेला कारणीभूत असलेले लांडगे असेच मोकाट फिरतील ..आणि पुन्हा एखादी अशीच नाजूक कळी त्या भ्याड लांडग्यांची शिकार होईल .. आणि तेच त्यांना पुन्हा होऊ द्यायचं न्हवत .
तिचं डोकं त्यांनी त्यांच्या हृदयाशी घट्ट पकडून ठेवलं होतं ,तिथलीच बेडवरचि ब्लँकेट ओढून त्यांनी तिच्या भोवती गुंडाळली , आता बऱ्यापैकी शांत झाली होती ती कारण.....
ती एका आईच्या कुशीत होती ,तिच्या अगदी जवळ ....अगदी हृदयाजवळ होती ती .त्यांच्या हृदयाचे ठोके तिला एका मधूर संगीता सारखे जाणवतं होते एकदम........
धक....धक....धक....धक..........
#आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटते...#
#निर्दयी या जगापासून खरचं दूर जावेसे वाटते..!!
जे तिची अवस्था पाहून खूपच स्पीड ने वाढले होते , तिची हालचाल मंदावली ...होणारच ना..! कारणच तसे होते किती दिवसांनी ती ही मिठी अनुभवत होती ....त्या माऊलीचे एका लयीत चालणारे काळजाचे ठोके ऐकण्यात किती सुकून मिळत होता तिला .
#काय करु आई आज तुझी खूप आठवण येते… मला #प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते.!
त्या तिची हालचाल थांबली म्हणून काळजीने तिला पाहण्यासाठी थोड हलल्या तशी अजून घट्ट बिलगली त्यांना ,त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं हे .त्या माऊलीचा तर उर दाटून आला .तिला घरी अनल्यापासून पहिल्यांदा ती त्यांना अशी कोकरा सारखी घट्ट बिलगली होती.
इथे त्यांचं कठोर स्त्रीत्व थोडंसं पडद्या आड गेलं आणि मतृत्वाने त्याची मखमली चादर पसरली ,त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते .
एका कठोर पाषाणाची कठोर माऊली म्हणून ओळखली जाणारी ती देवी आज पुन्हा एकदा आई बनली होती ...........
एक कोमल आई जिच मातृत्व उदार होत ..........
अमर होत,अनंत होत............
आईविना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा .......
आपल्याच मुलाला एकेकाळी वचनात बांधून स्वतःच स्त्रीत्व गमावलेली आई , एका गहिऱ्या काळया जगापासून जिथे फक्त मृत्यू अनिवार्य होता त्या जगापासून दूर राहण्याचे वचन घेणारी आई ,पोटच्या गोळ्याला स्वतःच्या परिवारासाठी मजबुरीने दुष्मनाच्या दावणीला बांधणारी आई, आणि आता एका कळीच स्त्रीत्व ,तिचा आत्मसन्मान परत मिळवून देण्यासाठी त्याच पोटच्या गोळ्याला पुन्हा त्याच काळया मृत्यूच्या दाढेत लोटणारी कठोर काळजाची आई ..............
किती किती उपमा होत्या ना त्या माऊलीला ......
पण
पण
पण आज एक मातृत्वाने तुटुंब भरलेली माऊली होती तिच्यासमोर ..........
"आई..............
बास्स कान तृप्त झाले त्या माऊलीचे तिची अस्पश्ट साद ...........
आणि .......
पुन्हा एकदा जन्म झाला त्या माऊलीचा न गवसलेल्या आईच्या रूपात ...........
त्यांच्या डोक्याला लागलं होत ,तिच्यासोबत त्याही जखमी झाल्या होत्या ,तिला वाचवण्याच्या नादात पायातल्या काचाही दिसल्या नाहीत त्या माऊलीला ...........
त्या आईचे पाय रक्ताने माखले होते पण त्याची जाणीव व्हायला त्या भानावर तरी असायला हव्यात ना ............
तिच्या आई हाकेने हळूच फुंकर घातली होती त्यांच्या जखमेवर ..........
होती एक आई एका मुलाची आई ,ज्याच्यावर कधी तीच मातृत्व बहाल उदार करताच आल नाही ,ज्याच लहानपण कधी त्यांना अनुभवता आले नाही ..ज्याच्यावर मनभरून आईची माया कधी बरसवता आलीच नाही ........
पण आज एका कळीन पुन्हा बहाल केलं होत त्यांचं मातृत्व ............
भूतकाळातल्या कितीतरी कडू आठवणीं होत्या त्यांच्या ज्यांच्यामुळे स्वतःला कठोर बनवून ठेवलं होतं त्या माऊलीने...............
त्यांनी पुन्हा घट्ट कवटाळून घेतल तिला आपल्या उराशी ......
त्यांच्या अश्रूचा एक थेंब तिच्या मानेवर पडला आणि सहज लक्ष गेलं त्यांचं त्या जागेवर आणि...........
आणि रागाने त्यांचे डोळे लाल झाले ,कारण पुन्हा त्यांचं स्त्रीत्व जागे झाले होते ..........
तिच्या नाजुक शरीरावर कोरलेल्या त्या दोन अक्षरांनी त्यांचीच काय प्रत्येक स्त्रीच्या तळपायाची आग मस्तकात गेली असती ........
कारण तसे शब्द होतेच तिच्या शरीरावर ,तिच्या शरीराचा असा कोणताच भाग शिल्लक नव्हता जिथे ते गलिच्छ शब्द कोरले गेले नव्हते ,ज्याच्यामुळे ती इतकी सैरभैर झाली होती.............
त्यांना हुंदका अनावर झाला ..............
" क... कसे सहन ..केले असतील ...हे घाव या लेकराने.......किती ओरडली असेल ही........इतका त्रास असूनही चेहऱ्यावर या त्रासाची हलकी लकेरही नसावी.. .....!..चेहऱ्यावरचं तेज त्या ज्वलंत अग्निसमान आहे .........म्हणूनच तर नाव माहीत नसताना अग्नी नाव ठेवलं मी तुझं ........ज्याच्या दाहक ज्वाळामधे तुला त्या पापीना भस्म करायचं आहे ......... असं भस्म करायचं आहे की पुन्हा कोणत्या लांडग्याची हिम्मत नाही झाली पाहिजे ...आणखी कोणत्या कळीसोबत अस खेळायची....."
"बाळा तुला जगावं लागेल ....तुला जगावं लागेल तुझ्या परिवारासाठी ......तुला जगावं लागेल .....तुझ्या अस्तित्वासाठी.......तुला जगावं लागेल तुझ्यातल्या माझ्या स्त्रित्वासाठी ........आणि हा हट्ट आहे एका आईचा .......हरलेल्या स्त्रीचा जिला फक्त तू जिंकवू शकतेस .......आणि तुला काहीच होऊ देणार नाही हे वचन आहे तुला तुझ्या आईच .........
"माझं वचन आहे तुला...... तुझ्या सांडलेल्या प्रत्येक रक्तासारखा त्या नराधमांच्या श्र्वासाचा एक एक कणा तोडला जाईल ......आणि त्याच्या तुटणाऱ्या श्वासांना पाहण्यासाठी तुला जिवंत राहावं लागेल........"
त्यांच्या प्रत्येक शब्दासरशी त्यांच्या रागाचा पारा चढत होता .......
पाहिलं तरी काळजाचं पाणी होत होते आणि इथे तर ते तिच्या शरीरावर कोरले गेले होते .तेही आयुष्यभर न मिटण्यासाठी ...........
दोनच अक्षरी नाव होत ते *रंडी......* जे तिच्या संपूर्ण शरीरावर अगदी खोलवर कोरल होत उध्दवस्त झाली होती ती, ज्याचा उच्चार सामान्य माणसात होत नसे ....ज्या नावाने आपल्याकडे पाहिल्या जाणाऱ्या नजराही बदलून जातात......
धाडकन दरवाजा उघडला आणि त्या भानावर आल्या ....
तर तो थरथरत्या नजरेने आईच्या कुशीत लपून बसलेल्या तिला पाहत होता आणि आज पुन्हा एकदा त्याला हारल्याची जाणीव झाली ..........
तो तसाच मटकन खाली बसला समोर रक्ताने माखलेली पांढऱ्या चादरीत गुंडाळलेली ती आणि तिच्यासोबत जखमी अवस्थेत तिला उराशी कवटाळून बसलेल्या त्याच्या आईकडे भरलेल्या नजरेने पाहत बसला तिथेच .......
तिची मान त्यांच्या हातात कलांडली ...........
"धनू..sssss...............
****------****------****-------********--------******----*****---++****------*****------*****------******
????? खूप भयानक मनस्थिती झाली होती हा पार्ट लिहिताना ....लिहू की नको असच वाटतं होत .....तिचा त्रास लिहिताना असं वाटतं होत ...तो त्रास मला होतोय .....मला नाही माहित मी कसा लिहिला आहे पार्ट .....
क्रमशः.........