Jan 26, 2022
नारीवादी

ज्वलंत......4

Read Later
ज्वलंत......4
शू शू...पार्टनर ऑल क्लिअर आहे ना ..?" ती दरवाजाच्या आड उभी राहून बाहेरून आतमध्ये डोकावून तिच्या पार्टनर ला एकदम हळू आवाजात विचारत होती.

" दिसत तर तसेच आहे ..बाकी किचन मध्ये वातावरण अजुनही हाय आहे. ..आज किचन मधली सगळी भांडी चक्कचुर होणार बहुतेक..." ते ही तितक्याच हळू आवाजात तिला बोलत होते .

"मग काय तिच्या वडीलाकडून भांड्यांचा दुसरा सेट मागून घेऊ आपण तू काळजी नको करू....." ती इकडे तिकडे पाहत बोलली.

" ह्म्म्म तिच्या घरच्यांच्या बद्दल एक जास्तीचा शब्द ऐकून घेत नाही ती आणि भांड्यांचा सेट ..... हंन! त्यापेक्षा तुझी पण चूप आणि माझी पण चूप ..." ते किचन कडे पाहत बोलले 

" किती घाबरता तुम्ही जगदंब ला .......कधी कधी मला प्रश्न पडतो की तू माझाच बाबा आहेस का ..? " ती दात विचकत

तिच्या या पी जे वर तिच्या बाबांनी तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला.

"नाही मी तुझा बाबा नाही तर तू कुंभमेळ्यात सापडली होती मला मग काय नाईलाज झाला ना माझा म्हणून घेऊन आलो ," ते पण काही कमी न्हवते शेवटी तिचे वडिलच ना ते .

"हीहीही..... पांचट विनोद होता " तिने डोळे फिरवले .

" बरं आता मी अशीच बाहेर उभी राहू का..? अश्या अवतारात म्हणजे तुमचं रसायन येऊन ,त्याच केमिकल माझ्यावर शिंपडायची वाट पाहत..." ती वैतागत 

" तिने केमिकल शिंपडलं तर तुझा कोणता फॉर्म्युला तयार होईल..? बघायला लागेल ." ते तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हते.

" मग माझ्यासोबत तुझाही फॉर्म्युला तयार होईल " तिने भुंवयी उंचावली 

"बरं बरं जास्त नको चिवचिव करू विसरू नको  तुला अश्या अवतारात पाहिलं ना तर तुझी धुलाई होईल .." ते अजुनही किचन कडे पाहत होते.

"आणि माझ्यासोबत तुझीही ...! तेवढाच त्या बिचाऱ्या लाईफ बॉय ला तुझ्या जाचातून सुटका ..." तिने डोळे फिरवले .

" अग ये मी तुझा बाप आहे तू माझा नाही ....कोणत्या मनहुस दिवशी तुझ्या आईला भेटलो आणि तुझ्यासारखा नमुना पदरात पडला ..." ते डोक्याला हात मारत म्हणाले.

"अजुनही वेळ गेली नाही आपल्या शेजारी नवीन टवका आला आहे ,करूया का तुमची सेटिंग..?"तिने त्यांना डोळा मारला

"तुझ्या जिभेला काही हाड .... अग तुझ्या बापसमोर असं बोलतेस याच भान ठेव जरा ..हे जर तुझ्या तूफान मेल ने ऐकले ना तर त्या टवक्यासोबत मलाही अग्निदहन करेल ती ..."  ते आवंढा गिळून बोलले

" पण मला एक सांगा हा जळता निखारा तुमच्या अंगावर पडलाच कसा ..? " 

" नशिबाचे भोग सारे दुसर काय ...सगळी त्या लाल साडीची मोहमाया ....धोक्याचा रंग लाल असतो माहीत असूनही तिच्या लाल रंगाच्या साडीतल्या रुपावर भाळलो आणि.....आणि आता असा रोज बायकोवास सहन करतो ..." ते हताश होऊन 

" बायकोवास..? मी तर ऐकलय सासुरवास असतो माहेर वास असतो ...हे बायकोवास काय प्रकरण आहे...? " ती हनुवटीला एक बोट लावून .

" जसा तुमचा सासुरवास असतो तसाच आमच्यासारख्या गरीब पुरुषांचा बायकोवास असतो ..." 

"गरीब....! आणि तुम्ही ..."तिने डोळे मोठे केले हसूच येत होत तिला .


"बरं ..बर तुझ बायकोवास पुराण बंद कर आणि मला लवकर यातून बाहेर काढ ,खूप थंडी वाजते आहे मला .आणि इच्चिंग पण होतंय बॉडी ला ..." ती मानेला खाजवत म्हणाली 
तसे त्यांनी तिच्याकडे निरखून पाहिले.

डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखा पर्यंत चिखलाने माखली होती ती, फक्त डोळे आणि हसल्यावर दातच काय ते दिसत होते . स्पोर्ट च्या टीशर्ट आणि शॉर्ट वर होती ती ,पायातले वूडल्यंड चे शूज तर अक्षशः चिखलाची लादी झाले होते .खूप वैतागली होती ती ,हे तीच रोजचं होत सकाळी पहाटे 3 च्या ठोक्याला जी घरातून बाहेर पडायची ते डायरेक्ट 7 नाहीतर 8 लाच दर्शन व्हायचं तीच , त्यांनतर कॉलेज आणि कॉलेज मधून आल्यावरही खूप काही गोष्टी होत्या ज्या ती करायची,

तिच्या पार्टनर ला तिला अस पाहून हसायलाच आले , पण तोंडातून साधी वाफ जरी आली तर शप्पत .त्यांचीच मुलगी असून घाबरत होते ते तिला होतीच तशी ती आणि त्यांनी संस्कार व धडेच असे दिले होते की ,बाबाची जरी चूक झाली तरी तू चुकतोय म्हणून डायरेक्ट सांगायची .अगदी रोख ठोक,एक घाव शंभर तुकडे ,घाई गडबडीने कोणताच निर्णय घ्यायची नाही ती .

ते तिच्याकडे पाहून गालात हसत होते ,तीच लक्ष गेलं आणि झालं काम मॅडम चा राग सातव्या असमान वर गेला .तिने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्यावर टाकला .

" खूप हसायला येत आहे ना तुला ..घे हसून तू सकाळी जॉगिंग च्या नावावर गार्डन मध्ये ,त्या नवीन आलेल्या योगा टीचर ला पाहायला जातो ही आनंदाची बातमी तुझ्या महामायेला द्यावीच लागेल ना..." तिच्या चेहऱ्यावर एक डेव्हि ल वाली स्माईल आली.

आणि तिच्या बोलण्यावर त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला जणू त्यांनी भीतीने आवंढा गिळला , एक वेळ त्यांनाच प्रश्न पडला हा घातक बॉम्ब त्यांचाच आहे का ..? त्यांनी चेहऱ्यावरचा घाम पुसत...

" अरे माझी काजुकतली मी..मी..तुला नव्हतो हसत ..ते ..ते..हा..ते मला..एक जोक आठवला ना म्हणून .."  तिच्या बोलण्याचा भलताच परिणाम झाला होता त्यांच्यावर .

" कळला मला तुझा पांचट जोक आता जर मला इथून सेफ आतमध्ये प्रवेश करायला दिला नाहीस ना तर ,तुमच्या वन साईड लव्ह ची बारात निघालीच म्हणून समजा .." तिने थोड मोठ्या आवाजात बजावले .

तिच्या बोलण्यावर त्यांनी अक्षरशः डोळे मोठे केले ,तिला चांगलचं माहिती होत की कोणती नस कधी दाबायची .

"हे परमेश्वरा माझ्यावरच असा अत्याचार का ..? तुला आणखी कोणातच मटेरियल भेटल नाही का ..? माझ्या पदरात टाकायला जे तू हा अणुबॉम्ब टाकलास अश्या माझ्या हसत्या खेळत्या हरियाळीवर ..." ते वर हात करून नाराजीच्या सुरात .

" आता काहीच उपयोग नाही ...तो तुमची कसलीच मदत करू शकणार नाही ...सध्या तो मिराबाईंच्या पुढच्या ..संकटाची तयारी करत आहेत ....आणि त्या वादळाच नाव शिवराज आहे ... सो त्यांना डिस्टर्ब करू नका ..नाहीतर तो शिवराज ..मिरा च्या आधी तुमचाच गेम करायचा ..." ती आपलं हसू दाबत .

" झालं बोलून तुला आतमध्ये यायचं आहे ना ..? " त्यांनी भुवाई उंचावली .

"हो लवकर कर ना काहीतरी खूप इच्चिंग होतंय अंगाला ..." ती अंग खाजवत म्हणाली .

" बरं तू अशी मागच्या बाजूने गॅलरीतून आत मध्ये ये मी तितक्यात गॅलरी चा दरवाजा ओपन करतो ..ठीक आहे.." ते बोलले 

"हो हो पटकन तुझी महामाया यायच्या आधी मला रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली यावं लागेल नाहीतर पुन्हा महाभारत घडेल ..." ती म्हणाली

"हो ये पटकन .." 

ती घरच्या मागच्या बाजूने जाण्यासाठी मागे वळली आणि तेवढ्यात .........
तिच्या अंगावर कुणीतरी पाणी टाकलं ती तशीच स्तब्ध झाली ,तिने भीतीने आवंढा गिळला,भीतीने डोळे मिटून घेतले .कारण तिला माहिती होत की तिच्या मागे कोणत वादळ थांबल आहे .ती काही विचार करणार तितक्यात पुन्हा तिच्या अंगावर पाणी पडलं ..ती तशीच थरथरत पाठमोरी उभी होती ..

" एक पाऊलही पुढे टाकलास ना तर पाय तोडून गळ्यात लटकवेन तुझ्या..." ती हळूहळू मागे वळली तर हातात पाण्याची बादली आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन थांबलेली एक 45/50 वर्षाची होती .त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर राग ओसंडून वाहत होता.रागाने डोळे लाल बूँद झाले होते .तिचा तो अवतार पाहून तिने मान खाली घातली.

" अग हे काय केलंस भिजवलस ना तिला ,..." तिच्या पार्टनर ने तिची बाजू सावरण्यासाठी .
तशी ती स्त्री नजर रोखून त्यांच्याकडे पाहू लागली.

" मग काय आरती उतरवू हीची ..अशी अपेक्षा आहे का तुमची " अजुनही तिची मान खालीच होती .कितीही केलं तरी समोर चंडिका उभी होती ना मग तिच्यासमोर तोंड उचकटायची काय बिशाद .

" आधी शांत हो तू आणि तिला येऊ दे आत अशी राहिली तर आजारी पडेल आणि मग तुझ काम आणखी वाढेल ..तुला माहित आहे ना तिला थंडी सहन होत नाही लवकर सर्दी होते .." तिचा पार्टनर त्या स्त्री ला समजावत होता .

" लाडू जा तू वर आणि तयार होऊन ये पटकन पळ.." ते बोलले आणि इतका उशीर मान खाली घालून माठासारखी थांबलेली ती तिने एक नजर त्या स्त्री वर टाकली आणि पटकन तिथून सटकली .

"अग ये थांब कुठे पळते.." ती स्त्री .

"हे सगळे तुमचे लाड आहेत ... ..म्हणून ती इतकी हेकेखोर झाली आहे ..माझं काहीच ऐकत नाही ...फक्त तुमच्या लाडामुळे ..काय गरज आहे तिला अस मुलांसारखी कुस्ती वगेरे खेळण्याची .... मुलींसरखा एकही गुण नाही तिच्यात .... मेकअप तर दूर साधी टिकली लावत नाही ...चालण्यात रांगडी पणा ..वागण्यात जिद्दिपणा .....मुलींनी कसं नाजूक असावं ... पण नाही ..... मुलीचा नावाला पैलवान जन्माला घातला आहे मी ...." त्या स्त्रीच्या बोलण्याच हसूच येत होत त्यांना ते गालात हसत होते त्या स्त्रीची नजर त्यांच्यावर पडली .

"घ्या हसून... दुसर येत तरी काय म्हणा ....अशी काय पुण्य केली होती मी म्हणून माझ्याच पदरी अशी पात्र घातले आहेत त्या परमेश्वराने काय माहीत ...." त्या डोक्याला हात मारत मोप ने लादिवरचा चिखल पुसत बडबडत होत्या .

" अग देवू किती वैतागशील अजून लहान आहे ती...आणि  या वयात ती या सर्व गोष्टी करणार नाही तर तुझ्या आणि माझ्या वयात असताना करेल का .." ते तिच्या मागे मागे फिरत होते

" हेच ..हेच पटत नाही मला तुमचं ....प्रत्येकवेळी तिला पाठीशी घालता तुम्ही .....लहान म्हणे आता लग्नाच्या वयाची झाली आहे ती .....आणि ते तिच्या सुरक्षेसाठी ...ते काय ते... मरामारीच शिकवलं आहे ना..." त्या स्त्रीला पटकन नाव सुचत नव्हतं.

"कराटे मार्शल आर्ट.." त्यांनी  त्यांचं वाक्य पूर्ण केलं

" हो..हो तेच ते ...मार्शल आर्ट काय फर्ट...ते पुरेस होत ना ...ते त्या बारीक डोळ्या वाल्यांच पण शिकवायची काय गरज होती ....." लादी पुसत पुटपुटन चालूच होत तीच.

" अग अस बोलायचं नाही ते कुंफू असत जे चीन लोक खेळतात .." ते हसत बोलले 

" हो कु.. कु..काय बाई मेल बोलायलाच येत नाही ..ते शिकवलं ते शिकवलं ...बाकी काय ते झाडू ...झाडू ते कशाला शिकवायला पाहिजे होत..." त्या स्त्रीच्या बोलण्यावर ते फक्त डोक बडवून घ्यायचे राहिले होते ...

" अग माझ्या अनारकली ते झाडू नसत काही जुडो बोलतात त्याला..विना शस्त्र खेळले जाते ते ..जेंव्हा आपल्या हातामधे समोरच्यावर वार करण्यासाठी काहीच नसत तेंव्हा आपण ही टेक्निक वापरू शकतो ....आणि आपली वाघीण ऑल राऊंडर आहे... काय येत नाही तिला ...बाहेरच्या कामापासून घरातल्या कमा पर्यंत सगळ करते ...तलवारबाजी,तिरंदाजी,घोडदौड,शर्यत,मल्लखांब, बुद्धिबळ, बंदुकबाजी,सगळ्यात अगदी सगळ्यात पटाईत आहे ...बाकीच्या मुलींसरखी मकेअप आणि शॉपिंग मध्ये वेळ घालवत नाही ती.... आणि मला तिला कुठेच कमी पडू द्यायचं नाही ...." त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहून ती स्त्री भारावून गेली. 

" अहो मग कुस्तीपण का...! बाकी सगळ ठीक आहे हा खेळ शोभतो का मुलींना ...?" त्या बोलल्या .

" त्यात काय गौण आहे ..मला माझ्या मुलीला पुरुषाच्या बरोबरीने चालायला शिकवायच नाही तर ..तीच स्वतःच असं वेगळं जग निर्माण करायला आल पाहिजे तिला..जी पुरुष्या पेक्षा पुढे जाईल ...तिला कधीच माझ्या कुबड्यांची गरज पडू नये ....तिला माझ्या नावाने नाही तर मला तिच्या नावाने ओळखलं पाहिजे या जगाने..." त्या प्रत्येक शब्दासर्शी त्यांच्या डोळ्यातली चमक अजूनच वाढत होती .पण त्यांच्या डोळ्यातली चमक ती दुरून पाहत होती .

तिच्या त्या गहिऱ्या टपोरी डोळ्यातून अश्रू चा एक थेंब घरंगळत येऊन तिच्या मनगटावर पडला ,तसे तिचे लक्ष हाताकडे गेले .तिच्या हातात बेड्या होत्या ,अश्रू पडलेल्या जागी जखम झाली होती.इतक्या दिवसातून तिने स्वतःकडे पाहिलच न्हवत व्यवस्थित ,तिने तशीच तिची भिरभिरती नजर पूर्ण हातावर टाकली तर तिचे पूर्ण हात बँडेज ने कव्हर केले होते .

***--------******-------*******--------******------***-
Cmt plz .....

क्रमशः.......


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble