मी नवीन आहे तुमचा प्रतिसाद तुमचे प्रोत्साहन माझ्यासाठी महत्वाचं आहे प्लीज 100 च्या वर तरी कमेंट यायला पाहिजे ...तुमचे प्रोत्साहन माझ्यासाठी एनर्जी स्टिक च काम करते ....कमेंट...स्टिकर... रेटिंग....
आय सी यू च्या बाहेर एकटक तिला बघत उभा होता तो ,खूप सारे प्रश्न होते , या सहा महिन्यांत ती एक शब्द बोलली नव्हती . जेंव्हा नॉर्मल असायची तेंव्हा शून्यात नजर लावून बसलेली असायची ,खूप प्रयत्न केले होते त्याने तिला बोलतं करण्यासाठी पण पदरी निराशाच .
त्याचे सगळे सोर्सेस लावले होते त्याने ,तिच्या कुटुंबाची माहिती मिळवण्यासाठी पण सगळ व्यर्थ ,अजुनही हाती काहीच लागले नव्हते त्याच्या .तिची रोज रोज होणारी घुसमट सहनच होत नव्हती त्याला ती घाव स्वतःला करून घ्यायची पण त्याच्या वेदना त्याला व्हायच्या ,अस का ..? याच उत्तर त्याच्याकडे ही न्हवत ,तिच्या शरीरावरचा प्रत्येक घाव त्याला त्याच्या पुरुषार्थ पणाची कीव आणून द्यायचा .कारण तिच्यासोबत जे काही झालं आहे ते पण एका पुरुषाने च केलं आहे ना ..!
'आजही स्त्री सुरक्षित नाही ...कुणामुळे..? माझ्यामुळे ....आजही घरातल्या मुली बायाना बाहेर पडताना सगळ्यात आधी स्वतः च्या सुरक्षेचा प्रश्न पडतो ...कुणामुळे..? माझ्यामुळे .मला माझ्या बहिणी विरूद्ध कुणी एक अपशब्द काढला तर सहन होत नाही ..तिथे मी माझ्याच मित्रांसोबत ग्रुप मध्ये बसून दुसऱ्यांच्या बहिणींवर कमेंट पास करतो .'
'आणि चूकून एखादिने परत फिरून मला त्याचा जाब विचारला ,किंवा त्याबद्दल माझ्या कानाखाली मारली तर ..तेंव्हा माझ्यातला अहंकार नावाचा राक्षस बाहेर येतो .ज्याच्या डोक्यात त्या मुलीने कानाखाली मारली इतकंच दिसत , पण ती का ..मारली ..?? हे दिसत नाही.मग मनात निर्माण होते ती बदलेची अढी जी त्या मुलीला बरबाद तर करतेच पण तिच्यासोबत माझ्याही आयुष्याला सुरुंग लावून जाते .कधी संपणार स्त्री च्या आयुष्याशी होणारा खेळ ,आणि त्याला फक्त मी जबाबदार आहे......! '
'हो मीच कारण मी ही पुरुषच आहे ,आज ज्या पवित्र मंदिरात आपण तिला पुजतो त्याच मंदिरात आपणच तिला निवस्त्र करतो ,किती लज्जास्पद गोष्ट आहे ना ही.....!'
तिच्या निपचित पडलेल्या देहाकडे बघून एक ना हजार विचार डोक्यात येत होते त्याला साधं तीच नाव ही माहीत नसलेली ती आज सहा महिन्यापासून त्याच्या सोबत त्याच्या घरात होती ,अनोळखी कोण..? कुठली..? काहीच माहिती नाही . पण तिच्यासाठी त्याच्या मनात खोल कुठेतरी सॉफ्ट अशी जागा निर्माण झाली होती. न्हवता तो असा एकदम शांत होता .वरून शांत पण आतून मात्र धगधगता ज्वालामुखी
"आर्य..." डॉक्टर च्या आवाजाने त्याची शृंखला तुटली त्याने मागे वळून पाहिलं तर त्याचा मित्र डॉक्टर मान उभा होता .
"कशी आहे ती आता ..?" आर्य
"ह्म्म्म इंजेक्शन दिलं आहे आता स्टेबल आहे ती येईल शुद्ध थोड्या वेळात" डॉ.मान
"आर्य मला तुझ्याशी थोड बोलायचं आहे तिच्याबद्दल आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया चल " डॉ.मान
"मान एनीथिंग सीरियस...?" आर्य
"केबिन मध्ये चल मग सांगतो " मान ने त्याला खांद्यावर थोपटत केबिन मध्ये निघून गेला
आर्य ने एक नजर आय सी यू कडे टाकली आणि तो मान च्या केबिन मध्ये गेला.
"ये बस .."मान
"काय झालं मान ..? काही काळजी करण्यासारखं आहे का ..? ती ठीक आहे ना ...? काही प्रोब्लेम आहे का...? " त्याचे एक नाही हजार प्रश्न
"अरे.. हो..हो..शांत हो आधी किती प्रश्न विचारशील .." मान
"मग सांग लवकर इतका सस्पेन्स का क्रिएट करत आहेस " तो चिडून बोलला
" अक्टुली आर्य तिची मनस्थिती पाहता मला नाही वाटत ती लवकर ठीक होईल " मान थोड चिंतेने बोलला
" मला कळेल असं बोलशील का तू मान " आर्य
"ओके मी स्पष्टच बोलतो तिला शॉक ट्रीटमेंट ची गरज आहे ..." मान ने एका दमात बोलून टाकले कारण समोर बसलेला शांत समुद्र कधी स्तूनामित बदलेल याची शाश्वती नव्हती त्याला .
"काय...??? शॉक ट्रीटमेंट ..? मान तू काय बोलतोय कळतंय का तुला ..? " मान चे शब्द ऐकून त्याच्या रागाचा परा च चढला
" आर्य माझं एकदा शांतपणे ऐकून घे मग तुला हवं ते कर " मान ने त्याला समजावत
" काय समजून घेऊ मान ..??.सांग ना ...???काय समजून घेऊ ...तू जे बोलत आहेस ते तुला तरी पटत आहे का ..?? तू ...तू...तिला शॉक ट्रीटमेंट देण्याबद्दल बोलत आहेस आणि मी शांत ऐकून घेऊ ..इथे तिच्या जखमा पाहून ..तिला होणारा त्रास पाहून मला असहाय होतय आणि तू तिला इतकी भयानक वेदना द्यायचं म्हणतोय ..." तो मान वर चिडून
" मग काय करणार आहेस हा..?? सांग ना काय करणार आहेस तू ..? कसं ठीक करणार आहेस तिला ..? या सहा महिन्यांत काही तरी बदल झाला आहे का तिच्यात ...? बोल ..झाला का बदल ..? ती नॉर्मल असली तरी बोलत नाही ...रोज तिला इंजेक्शन दिल्याशिवाय झोप येत नाही ....एकदा आउट ऑफ कंट्रोल झाली की कुणाचं ऐकत नाही ....किती आक्रमक होते पाहिलास ना तू .... असं किती दिवस चालणार हे आर्य ..... तिच्याबद्दल कोणतीच माहिती नसताना तू तिला इथे घेऊन आलास .....तिच्या शरीरावरचा प्रत्येक घाव सांगतो की प्रकरण दिसत तितकं सोपं नाही ....आणि तिला रोज अशी तडफडत ना बघायचं आहे का तुला ..?? तीच ब्रेन स्टेबल करन खूप महत्वाचं आहे आर्य ...." आर्य ची तळमळ कळतं होती त्याला पण त्याच्याकडे पण काही पर्याय नव्हता म्हणून आता तो ही चिडला मान चा चिडलेला चेहरा पाहून आर्य चा आवाज थोडा कमी झाला
" मान आणखी कोणताच दुसरा ऑप्शन नाही का रे ..? " त्याचा आवाज जड झाला होता
त्याची ही हळवी बाजू मान पहिल्यांदा पाहत होता कुणासाठी इतका इतका सेन्सिटिव्ह तो कधीच झाला न्हवता पण आज गोष्ट वेगळी होती ,तो इतका हळवा फक्त त्याच्या फॅमिली साठीच व्हायचा नाहीतर त्याची डार्क साईड पाहून पाहणारा जागीच जीव सोडायचा तो काय होता आणि आता काय आहे हे फक्त मोजक्याच व्यक्तींना माहीत होत ,त्यात मान चा पण समावेश होता .
"एक ऑप्शन आहे .." मान
"कोणता..? मी तिच्यासाठी जे पॉसिबल असेल ते करेन सांग फक्त " आर्य ला काहीही करून तिला ठीक करायचं होत
"तिचे आई बाबा ..??" मान च्या बोलण्यावर त्याने गोंधळून त्याच्याकडे पाहिले
"हो तिचे आई बाबा ..तेच एक होप्स आहेत तिच्या ठीक होण्याचे ... अटलिस्ट तिने बोलायला हवं .." मान काही तरी विचार करून
"मान पण हे कसं शक्य आहे ...तू पाहिलास ना आपण सगळे प्रयत्न केलेत तिच्या घरच्यांना शोधायचे ...मग आता हे कसं शक्य आहे ...??" त्याला समजत नव्हत मान असा का बोलत आहे ते
" आय नो ...पण हे फक्त आपल्याला माहिती आहे ...तिला आपण फक्त तिच्या आई बाबा ची आठवण करून द्यायची ..." मान त्याला समजावत
" म्हणजे ..? तू काय बोलतोय काहीच समजत नाही ...स्पष्ट काय ते बोल ना ..." आर्य ला त्याच कोड्यात बोलण समजत नव्हत
"अरे म्हणजे ती जेंव्हा पासून शुध्दीवर आली आहे तेंव्हापासून तिने तिच्या आई बाबांची आठवणच काढली नाही रादर तिला आली नाही. .मग आपण तीच आठवण करून दिली तर ...?? " मान बोलून मोकळा झाला
" समजेल अस बोल मान .." आर्य वैतागून
"तू बिझनेस मॅन कशाला झाला रे ...प्रत्येक गोष्ट सांगावी लागते.." मान वैतागून
"झालं तुझं..! तर बोल पटकन..." आर्य ने डोळे फिरवले
" तिला तिच्या आई बाबांची आठवण करून द्यायची ...तू एकदा त्यांचं नाव तिच्यापुढे बोलून बघ म्हणजे आपल्याला कळेल ती कशी रिअँक्ट करते त्यावर .." मान आपलं बोलण आर्य ला पटवून देत होता
"आयडिया वाईट नाही ... पण याचा काही वाईट परिणाम होणार नाही ना ..? म्हणजे ती जास्त हायपर तर नाही होणार ना ...?"त्याला खूप काळजी वाटत होती तिची
"तेच तर बघायचं आहे आपल्याला की ती कशी प्रतिक्रिया देते .." मान
"हो तू बोलतोय ते पटतय मला असच करून बघायला हवं " आर्य ने आपल्या मनाशी काहीतरी पक्क केलं.
"म्हणजे आम्हाला विसरलात ना तुम्ही ...?" आर्य ची आई केबिन मध्ये येत.
"आई तू .." मान खुर्चीतून उठत
"हो मीच ..आता कशी आहे ती ..?" आई
"आता टेंपरी तिला इंजेक्शन दिलं आहे ..येईल थोड्या वेळाने शुध्दीवर.." मान
" काय अवस्था झाली आहे रे तिची..काळीज पिळवटून निघत तिच्या त्या वेदना पाहून ..."आईचे डोळे पाणावले
" किती आणि काय काय सहन केलं असेल रे तिने..? असा एकही दिवस किंवा रात्र गेली नसेल ज्या दिवशी तिची किंकाळी आमच्या कानात गुंजली नसेल ...तिला त्या साखळदंडात बांधताना खूप वाईट वाटायचं राग यायचा स्वतः चा ...पण ते करणं गरजेचं होतं नाहीतर ती स्वतःला इजा पोहचवायचे एक संधी सोडत न्हवती ..." त्यांना आठवून च अंगावर काटा आला .
" तिच्या शरीरावर चा प्रत्येक घाव जणू माझ्याच शरीरावर झालाय असच वाटतंय मला..तिच्या शरीरावर ची गोंदण पाहून हृदय पिळवटून जात ..कधीच न मिटणारी जखम दिली आहे रे त्या नराधमांनी तिला....तिच्या शरीरावर ते शब्द त्यांनी ज्या शस्त्रांनी कोरले असतील ना ती हत्यार पण नसानसात थरथरली असतील रे....तिने कसं सहन केलं असेल हे सर्व ...." आर्य च्या आईला हुंदका अनावर झाला
"आई ...सावर स्वतःला ..." आर्य
"कशी सावरू धनू अरे माझ्या रमासारखी आहे रे ती ..नाजूक कळी पण रोज मृत्यू च्या पायारित जायचा अट्टाहास तिचा.....! नाही रे पाहवत तिला असं......! कर काहीतरी धनू...कर काहीतरी....." आई ने आर्य च्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली
"हो आई मी करेन काहीतरी तुझा विश्वास आहे ना माझ्यावर ..मी सर्व ठीक करेन तू नको काळजी करू..." आर्य आईला समजावत होता पण त्यालाच माहिती न्हवत की तो हे करू शकेल की नाही .
" मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा आर्य...आजच्या घृणीत जगात तुझ्यासारखे पण लोक आहेत ...म्हणून थोडी तरी माणुसकी जिवंत आहे ..नाहीतर आजकाल वखवखलेल्या नजरेचे पुजारी आहेत इथे.....खरच मला खूप गर्व वाटतो की तुझ्यासारखा खरा सोना माझा मित्र आहे ....." मान चे ही डोळे पाणावले होते . आर्य ने त्याला एक हलकी स्माईल दिली
" आजपर्यंत मी अश्याच बेवारस हवस ची शिकार झालेल्या मुली ,सासारकडून अन्याय झालेल्या मुली ,नवऱ्याने मारहाण करून तिला सोडून दिलेल्या मुली ज्यांचा त्यांच्या घरचे नंतर साधा विचार ही करत नाहीत अश्या मी भरपूर केसेस हॅण्डल केल्यात,जिथे त्यांची स्वतःची हक्काची माणसं त्यांची साथ सोडून देतात... पण तुम्ही कोण कुठली ?.. जिची कसलीच ओळख नाही ...जिच्या अस्तित्वाची कोणतीच खानखून नाही ...त्या परक्या मुलीला तुम्ही असरा दिला ...तिच्यावर ट्रीटमेंट केली ..जी क्षणात आग तर क्षणात बर्फ होते ..तिला तुम्ही तुमच्या घरी ठेऊन तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं वागवताय ...हे माहीत असूनही की तिच्यापासून तुम्हाला तुमच्या घरच्यांना धोका आहे तरीही तिच्या घरच्यांचा शोध घेण्यासाठी धडपडत आहात ....तिला न्याय देण्यासाठी अशी तडफड ....मी पहिल्यांदा पाहतोय.....!खरच मी धन्य झालो मला तुमच्यासारखी निस्वार्थ प्रेम करणारी माणसं भेटली ...आणि हा असा जीवाला जीव देणारा जिवलग मित्र .... माऊ तू खरचं ग्रेट आहेस ...नाहीतर इथे स्वतःचे आई वडील साथ देत नाहीत ..तिथे तू तिची काहीच माहिती नसताना इतकी मोठी रिस्क घेत आहेस...." मान ला आर्य च्याआईचा गर्व वाटत होता एका अनोळखी मुलीसाठी इतकी तडफड ...!नाहीतर रस्त्यावर एखादा मुलीची छेड जरी काढत असेल तर आम्ही पाहून ही न पाहिल्यासारखे करतो तिथे या माऊलीने त्या मुलीला आपल्या घरी ठेवले जिची मानसिक कंडीशन बरोबर नाही,जी केंव्हा ही त्यांच्यावर अटॅक करू शकते ...
नाहीतर अश्या मुलीला कोण आपल्या घरी ठेवेल म्हणून त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ही पाठवू शकले असते , पण त्यांनी तसे केले नाही ....खरच खूप हेवा वाटत होता त्याला आणि आनंद ही की असे लोक त्याच्या आयुष्यात आहेत.
"माझी पूर्ण फॅमिली आहेच ग्रेट आणि म्हणून मी माझ्या फॅमिली वर सगळ्यात जास्त प्रेम करतो..." तो आईकडे भरलेल्या डोळ्याने पाहत होता
"धनू......"आर्य च्य आईने भानावर येऊन त्याला हाक मारली त्यांनी डोळे पुसले मनाशी काहीतरी विचार पक्का केला.
"धनू तुझ्याकडे पुढची 45 मिनट आहेत ...या 45 मिनिटात तुला तुझ्या परिवाराला जितकं मन भरून बघायचं आहे तितकं पाहून घे ....." आर्य ची आई एकदम कडक शब्दात .
"म्हणजे...? मला काही समजल नाही ...? तू असं का बोलत आहेस ...?" आर्य ला त्याच्या आईच बोलणं समजत नव्हत ती अशी का बोलतेय ...? तेच कळत नव्हतं
" कारण इथून पुढे तू आमच्यापैकी कुणालाही पाहू शकणार नाहीस ..." ती माऊली बोलत होती पण तिच्या आवाजात खूप मोठे दुःख होते
"आई ..हे..हे...काय बोलत आहेस तू ...? तुम्हाला पाहू शकणार नाही म्हणजे...? तुझ्या बोलण्याचा अर्थ काय...? सांग ना तू अस का बोलत आहेस ...? बोल ना ग काय आहे तुझ्या मना...." आणि त्याचे शब्द तोंडातच राहिले त्याला त्याचा आईच्या बोलण्याचा अर्थ उमजला आणि त्याचे डोळे विस्फारले .
त्याने त्याच्या आईकडे पाहिले तर त्या माऊलीचा चेहरा निर्विकार होता .चेहऱ्यावर दिसत होता तो फक्त राग ज्याची सगळ्यात जास्त भीती आर्य ला वाटायची ....
"आई ...." त्याने हाक मारली पण आर्य च्या आईच्या चेहऱ्यावरची रेष ही हलली नाही .
" आज एक आई म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून सांगते ...आज ,आता ,या क्षणापासून मी तुला माझ्या वाचनातून मुक्त करते ....आज त्या मुलीला च न्याय नाही हवा तर आज एक आई तिच्या मुलाकडून तिच्या स्त्रीत्वाचा न्याय मागते ...बाकी तू हुशार आहेस ...तुझ्याकडे 45 मिनिट आहेत ...." आर्य ची आई ने आपलं मन कठोर. केलं होत .त्या केबिन मधून बाहेर पडणार
" ही तुझ्या आईच्या मातृत्वाची परीक्षा आहे ,ही तुझ्या पुरुषार्थ ची परीक्षा आहे .....ज्या रक्तरंजित अंधारा पासून दूर राहण्याची तुझ्याकडून शप्पत घेतली होती ...आज त्याच अंधाराला तुझ्यात सामावून घेतलेलं मला पहायचं आहे ...!आज तुझ्यातल्या संयमाची खरी परीक्षा आहे ....! या अविचारी हावसने बरबटलेल्या चांगुलपणाचा मुखवटा लावून वावरणाऱ्या ...ढोंगी लोकांपेक्षा तुझा क्रूर ,निर्दयी आणि रक्तरंजित चेहरा पाहायला आवडेल मला ....." इतकं बोलून त्या निघून गेल्या .
आणि तो त्याची आई काय बोलून गेली याचा विचार करू लागला,जिने त्या डार्क दूनियेपासून दूर राहण्यासाठी गेली पाच वर्षे तिची शप्पत घालून त्याला बंधनात बांधून ठेवलं होत ,आज त्याच त्याच्या माऊलीने ते बंधन तोडून टाकलं ...का..? कारण तिच्या स्त्रित्वाच रक्षण करण्यासाठी .......
त्याने एक दीर्घ श्वास घेतला ,हाताच्या मुठी आवळल्या आणि एक नजर मान वर टाकली .....मान ला त्याच्या डोळ्यात जी ज्वाला दिसत होती ,ती आता कुणाकुणाला जाळून राख करणार कुणाला ठाऊक ....
ज्याच्या नुसत्या अस्तित्वाने अख्खं माफिया वर्ल्ड जीव सोडायचं आज खुंखार जखमी श्र्वापद जागा झाला होता ...ज्याची शिकार होणारा प्रत्येक जण मृत्यू ची भीक मागायला मजबूर होणार ....अशी आता कधीच न विझणारी ज्वलंत ..... आग त्याच्या नसानसात पेटली होती ....
***************************************************************************************
plz cmt
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा