Jan 26, 2022
नारीवादी

ज्वलंत.........1

Read Later
ज्वलंत.........1
( या कथेच्या माध्यमातून मला कोणाच्याही आंतरिक भावना दुखाण्याचा हेतू नाही ,आणि तसे काही आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा )अन्यायाला वाचा फोडण्याचा   नादात स्वतःला गमावून बसलेल्या तिची आणि ती जळत असलेल्या आगीत होरपळून जाणाऱ्या त्याची एक धगधगती कहाणी .......


खूप इंपॉर्टनट मीटिंग मध्ये होता तो तितक्यात त्याचा फोन खणानला ,त्याने तो न पाहताच कट केला .पण फोन सारखा वाइब्रेट होत होता. ती मीटिंग त्याच्यासाठी खूप महत्वाची होती .म्हणून त्याने वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष केलं .

तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी आत मध्ये आला .
"बॉस मॅम कॉलिंग .. इट्स  अर्जंट.." त्याच्या सेक्रेटरी ने त्याच्यासमोर फोन देत म्हणाला ..

" एक्स क्युज मी .. सॉरी आय  एम  पाऊसिंग थीस मीटिंग फॉर व्हील आय हॅव  रिसिव्ह  अन् इंपॉर्टन्ट कॉल  कॅन आय  ??"  त्याने ती मीटिंग मध्येच स्टॉप केली आणि तिथून बाहेर पडला .मीटिंग रूम मधले सगळे क्लाईंत आवसून तो गेला त्या दिशेने पाहत राहिले .

त्याने बाहेर येऊन फोन कानाला लावला .

" धनू...लवकर ..घरी ये ती ..ऐकत नाही आहे कुणाचं ..तिला सांभाळणं मुश्किल झालं आहे .....आता फक्त दरवाजा तुटायचा बाकी राहिला आहे...आम्ही जीव मुठीत घेऊन.बसलोय लवकर ये ..." पलीकडून त्याची आई घाबाऱ्या आवाजात हळू फोन वर त्याला सांगत होती .

" मी 10 मिनिटात पोहचतो तुम्ही अजिबात रूम मधून बाहेर येऊ नका " तो 

"हो तू ये लवकर " 

"तेज ... प्लीज हँडेल इट...." त्याने त्याच्या मित्राकडे आशेने पाहिलं

"आय विल हँडेल .. यू कॅन  गो..." त्याने त्याला खांद्यावर थोपटून शास्वत केलं.

तो धावत ऑफिस मधून बाहेर पडला त्याच्या अश्या धावत येण्याने त्याचे बॉडीगार्ड अलर्ट झाले ,तो गाडीत जाऊन बसला .तसे त्याचे बॉडीगार्ड ही लागोपाठ गाडीत बसले .

" पीटर.. लेट्स हरी.. ड्राईव्ह  फास्ट....." तो जोरात ड्रायव्हर ला ओरडला त्याचा तो अवतार पाहून ड्रायव्हर सकट त्याच्या बॉडीगार्ड ना ही दरदरून घाम सुटला .त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडी पळवली.

घरी पोहचेर्यंत त्याच्या मनात नको नको ते विचार येत होते ,पण रस्ताच संपत नव्हता त्याला त्याच्या परिवाराची सगळ्यात जास्त काळजी होती. डोकं शांत ठेवायचा कितीही प्रयत्न केला तरी काहीच सुचत नव्हतं .मनातून खूप हादरला होता तो .

अगदी काही मिनिटातच तो एका आलिशान मेंशन समोर त्याची गाडी थांबली ,पण तो गाडी थांबायचा आधीच चलत्या गाडीतून उतरून धावतच वाऱ्याच्या वेगाने .आतमध्ये पळाला तेवढे पेशनस न्हवते आता त्याच्यात . त्याने घराचा मेन दरवाजा हलकाच ढकलला आणि...

खाळ..............अगदी त्याच्या पायात काचा विखुरल्या होत्या ,तो एकदम स्तब्ध झाला .त्याने समोर पाहिलं तर ती पूर्ण रक्ताने माखली होती .पूर्ण घराचा कबाड खाना झाला होता पूर्ण हॉल मध्ये काचांचा खच पडला .आणि त्या काचांमधे बसून ती बेफाम होऊन ओरडत होती,किंचाळत होती.

तिचे हात,तिचे पाय आणि अंगावर जागोजागी झालेल्या जखमा जणू रक्ताचा अभिषेक केला होता तिने .इतकं चित्तथरारक दृश्य होत ते . पाहणाऱ्याला हार्ट अटॅक येईल, त्याने पूर्ण हॉल वर नजर फिरवली तर हॉल मधले सगळे वास फुटले होते ,सोफ्याचा तर तिने अक्षरशः खून केला होता.फिश स्टँड मधले मासे जमिनीवर तडफडत होते.

तिच्याच....रक्ताच्या ....रंगात....रंगली ...होती...ती......!!
आणि त्याच्या वेदनाही तिला होत असतील ? की नाही ? हे फक्त तिला माहित .

पण ती खाली पडलेल्या काचा मुठीत आवळून मोठं मोठ्याने ओरडत होती,हसत होती मध्येच रडत होती ,पण पूर्ण आऊट ऑफ कंट्रोल झाली होती ती आज .

तो फक्त श्वास रोखून तिचा भयानक रुद्रावतार अविश्र्वासाने बघत होता ,कारण ती एका खुंखार ,जखमी वाघिणी सारखी दिसत होती त्याला .केस विस्कटले होते,पूर्ण चेहऱ्यावर रक्त,अंगात हॉस्पिटल चा ड्रेस जो जागोजागी फाटला होता .

पण तिला तमा नव्हती कशाची ना त्या जखमांचा त्रास होत होता तिला ,तिच्या वागण्यावरून ती तो असहनिय त्रास एन्जॉय करत आहे .असच दिसून येत होत ,तो मात्र खिन्न होऊन तिचा तो महा अवतार पाहत होता.

तिने हसत हसत तिच्या बाजूला पडलेली काच गळ्याला लावली आणि इतका वेळ तिचा चित्तथरारक खेळ पाहणारा तो झटक्यात भानावर आला .आणि क्षणाचाही विलंब न करता हवेच्या वेगाने तिच्या जवळ पोहचला ,त्याने तिला मागून विळखा घातला आणि तिच्या गळ्यावरचा हात पकडून तिचे दोन्ही हात मागे त्याच्या हातात लॉक केले.

त्याच्या मजबूत हाताच्या पकडीने तिच्या हातातली काच गळून पडली ,पण ती त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली जे तिला जमत नव्हते .ती त्याही स्थितीत हसत होती,रडत होती आणि रागाने त्याला प्रतिकार करत होती .

"सोड मला मी **** आहे हाहाहा ....हो मी **** आहे.......हाहाहाहा .......!!!" 

तिचे एक एक शब्द त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे करत होते ,पण तो काहीच करू शकत नव्हता . कारण त्यालाच त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती .त्याने तिच्या कानाच्या मागे एका पॉइंट वर दोन बोटांनी जोरात प्रेस केले तशी ती मागच्या मागे त्याच्या मिठीत विसावली .

त्याने तडक तिला हातावर उचलली आणि तसाच तिला घेऊन बाहेर धावला ,आपण एखादा रक्ताचा सखाळलेला गोळा हातात घेतल्यासारख वाटू लागलं होतं त्याला, कारण तिच्या पायातून ,हातातून रक्त टपकत होत आणि तोही त्यात भिजत होता.


त्याने तिला उचलून बाहेर आणले तर बाहेर असलेले त्याचे बॉडीगार्ड आणि त्याचा ड्रायव्हर त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते . 

" पीटर गाडी हॉस्पिटल कडे घे फास्ट " तो गाडीजवळ पोचला पीटर ने घाईघाईत पाठीमागचा दरवाजा उघडला तसा तो तिला घेऊन आत बसला ,पीटर ने त्याचा पवित्रा पाहून गाडीला वेग दिला .

तीच डोकं स्वतः च्या मांडीवर घेऊन बसला आपल्या खिशातून रुमाल काढून त्याने  तिच्या हाताला बांधले ,आणि कोट काढून तिच्या अंगावर पांघरून दिला .

" मान इट्स इमेर्जन्सी ताबडतोब हॉस्पिटल मध्ये ये " इतकंच बोलून त्याने फोन कट केला.

एक नजर तिच्यावर टाकली तर ती निपचित पडली होती ,चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता तिच्या .फक्त होत ते दुःख कधीच न संपणार..........!!

या सहा महिन्यांत त्याने तिला फक्त स्वतः ला असच जखमी करताना पाहिलं आहे . नॉर्मल कधी वागलीच नाही ती तिच्याकडे पाहून मृत्यू लाही स्वतः ची लाज वाटावी अशी अवस्था झाली होती तिची .

पण तिची अवस्था अशी का होती ?हा प्रश्न त्याला  सहा महिन्यापासून पडला होता ,आणि त्याला सहा महिन्यापूर्वी ची रात्र आठवली ज्या दिवशी ती त्याला खूपच भयानक अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली....!!

* सहा महिन्यापूर्वी........*

"धनू..बाळा किती उशीर.?...कुठे आहेस तू अजून .?..." त्याची आई काळजीने त्याला 

"अग.. हो..हो..आधी श्वास तरी घे....मी पोहचतो थोड्यावेळात ...." तो

"हे मी गेली वीस मिनिटं पासून ऐकते आहे ......अरे वातावरण पण आज खराब आहे...त्यात तू ड्रायव्हर न घेताच गेला आहेस....आणि तुझे बॉडीगार्ड पण सोबत नाहीत तुझ्या....नुसती काळजी लाऊन ठेवतोस जीवाला माझ्या...." त्याची आई काळजीत होती .

आणि तो त्याच्या आईची बडबड ऐकत मस्त गालात हसत गाडी चालवत होता, सोबतच आजूबाजूच्या त्याच्यासोबत पाळणाऱ्या निसर्गाचा आनंद घेत घराच्या दिशेने जात होता.

" आई...आई...अग किती ती बडबड ...आणि तुला माहिती आहे ना...!! तिथे जाताना मला माझ्या सोबत कुणी आलेल नाही आवडत ...मग का काळजी करते इतकी पोहाचेन मी लवकर" त्याला त्याच्या आईची काळजी कळतं होती.


"हो..ते पण आहेच... पण लवकर ये ..आणि गाडी हळू चालव ...." आई त्याला सूचना देत होती.

"हो मांसाहेब जशी तुमची अज्ञा......" तो

" नाटकी पुरे...मी तुझ्या काळजी पोटीच बोलतेय ना...!" आई

" नुसती काळजी नाही...अती काळजी म्हण ..."तो गालात हसत ब्लूटूथ वर बोलत बाहेरच्या रात्रीच्या धुंद वातावरणाचा आनंद घेत आपल्या आईशी बोलत होता .

आणि अचानक..... 


त्याने गाडीला ब्रेक मारला ,त्याला काहीतरी क्लिक झालं .त्याला त्याच्या आईची बडबड ऐकूच येत न्हवती त्याने तशीच गाडी मागे घेतली ,तर रस्त्याच्या बाजूला काहीतरी असल्याचा भास झाला . त्याने त्या अंधारात निरखून पाहण्याचा प्रयत्न केला ,पण खूप अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं .

त्याने गाडी आणखी जरा मागे घेतली आणि गाडीची हेडलाईट रस्त्याच्या बाजूला मारली .तर तिथे कुणीतरी पालथी पडल्यासारखं दिसल त्याला .

"अरे धनू ऐकतो आहेस का ?...कुठे लक्ष आहे तुझ..? मी केंव्हाच बडबडत आहे .धना......." आई मोठ्याने ओरडली तसा तो लगेच भानावर आला .

"शिट फोन चालूच आहे...."तो स्वतःशीच 

"आई मी आहे इथेच ..मी तुला करेन थोड्या वेळाने फोन ..." त्याला रस्त्याच्या बाजूला कुणीतरी जखमी अवस्थेत पडलेलं दिसलं.

" धनू अरे काय झालं...?तू असा घाई घाई ने फोन का ठेवतोय सांगशील का मला ??..." त्याची गडबड बघून आई बोलली 

" आई मी करतो थोड्या वेळात फोन तुला बाय...." त्याने ब्लूटूथ कानातून काढून सीट वर टाकले आणि तडक गाडीतून उतरला.

तो झपाझप पावलं टाकत त्या दिशेने चालू लागला जिथे ती व्यक्ती जखमी अवस्थेत पडली होती. तो त्या व्यक्तीजवळ पोचला तर कुणीतरी रक्ताच्या थारोळ्यात पालथी पडलं होतं ती व्यक्ती पूर्ण रक्ताने माखली होती त्याने आपल्या मोबाईल ची बॅटरी ऑन केली आणि निरखून पाहिलं आणि.....

त्याचे डोळे विस्फारले त्याने लागलीच आपला चेहरा वळवला ........

कारण ती जखमी व्यक्ती एक मुलगी होती जी निवस्त्र होती .ती पूर्ण रक्ताने भरली होती ज्यामुळे दुरून कोण आहे हे ओळखणे कठीणच .....!!


त्याने आपल्या अंगावरचा शर्ट काढला आणि तिच्या अंगात घालून दिला पण तो शर्ट घालताना तिला कुठेच स्पर्श होणार नाही ,याची दक्षता त्याने घेतली . शर्ट घालताना त्याने एक नजर ही तिच्यावर टाकली नाही .तो तसाच धावत गाडीकडे आला आणि गाडीला त्याचा कोटही आणून तिला घातला .त्याने आजूबाजूला पाहिलं पण तिथे त्या दोघां व्यतिरिक्त कोणीच दिसत न्हवत .

त्याला त्या लोकांची इतकी चीड येत होती की ...!जर ते आता त्याच्या समोर असते तर कदाचित त्याने त्या नराधमाना यामलोक पाठवलं असत.

त्याने मागचा पुढचा कसलाच विचार न करता तिला उचलून गाडीत ठेवलं, शिट बेल्ट लावून त्याने गाडी स्टार्ट केली .आणि तडक गाडी हॉस्पिटल कडे वळवली .

"किती नीच विकृती आहे त्या नालायकानाची किती नीच कृत्य केलं आहे त्यांनी ..ते असं करूच कसं शकतात ..? एका मुलीच्या बाबतीत इतकं घृणीत कृत्य करताना ...त्यांचा आत्मा कसा कापला नाही .....हिच्या आई बाबंची काय अवस्था झाली असेल.???.. ....ते कुठे कुठे शोधत असतील हिला ..?? खरचं असे नामर्द पण आपल्या समाजात आहेत याचाच जास्त राग येतोय मला ..." त्याने रागात जोरात हात स्टेअरिंग वर मारला .

त्याचे हात रक्ताने माखलेले होते त्याच्या उघड्या अंगावर ही रक्त लागलं होतं .....

"बॉस पोहचलो आम्ही हॉस्पिटल ला" पीटर  ने त्याची तन्द्रि भंग केली .

त्याने घाईने तिला हातावर उचलले आणि पळत हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला .तो जायच्या आधी सगळी तयारी आधीच केली होती पीटर ने कल्पना दिली होती .तिला तडक ओ .टी मध्ये नेण्यात आले .

त्याचा मित्र मान आधीच तिथे हजर होता ,त्याने तिला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाताना एकदा त्याच्या खांद्यावर आश्वासक रित्या थोपटले आणि तडक आत मध्ये गेला .

(तर हा आहे आपल्या कथेचा नायक आर्य द्विजा निंबाळकर द द्विजा एम्पायर चा  सर्वे सर्वा 6.2 फूट उंची ,नितळ गोरा रंग, अंबर कलर गहिरे डोळे एका धगधगत्या आगीसारखे , परफेक्ट ज्वा लाईन, थंड भेदक नजर ,लाल ओठ , वेल मेन्टेन बॉडी , एकदम शांत ,समजूतदार ,गूढ पर्सनालिटी , डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर नेहमी, संयमी  अस म्हणतात ना नाण्याच्या दोन बाजू असतात तसच काहीस याच पण आहे .त्याच्या आई साठी धनू तर जगासाठी आर्य .घरी आई ,मामा मामी , काका काकू,त्याचे चुलत दोन भाऊ ,इतकी फॅमिली होती , हळू हळू उलगडेल )

**-------****-------*******-------*******--------*******--------******------******-------******-------*****

कोण आहे ती ...? तिची अवस्था का झाली आहे ..? काय झालं होत तिच्या आयुष्यात सहा महिन्यापूर्वी ? 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble