Jan 26, 2022
नारीवादी

ज्वलंत.....8( आखणी खेळाची)

Read Later
ज्वलंत.....8( आखणी खेळाची)"तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं ? तो जेल मधून सुटावा अशी अपेक्षा आहे की ..? त्याला काठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे तुमची ....? " ऑफिसर समर समोर बसलेल्या वयस्कर जोडप्याला विचारत होता .आणि त्याचा मागे किंग खुर्चीत बसला होता तो ,एकदम निर्विकार चेहऱ्याने भावनाशून्य .आणि त्याच्या समोर काही लोकांना आणून बसविण्यात आल होत ,लोक म्हण्यापेक्षा काही परिवार होते ते गुन्हेगारांचे परिवार .ज्यांना त्यांच्या परवानगीसाठी त्याने बोलवून घेतल होत . आणि समर त्या काही प्रश्न विचारत होता ." बोला ना काका तुम्हाला अश्या मुलाची सुटका करायची आहे का ज्याने आतापर्यंत 5 मर्डर,स्मग्लींग , हाप मर्डर,आणि सगळ्यात खालच्या पातळीला जाऊन 6 मुलींचा बलात्कार करून अतिशय भयानक रित्या त्यांचा खून केला .......आणि ताई तू.....तू माझ्या बहिणी सारखी आहेस माझ्यासाठी.... तुझ्या नीच भावानं तुझ्यासारख्या च निरागस निष्पाप मुलींचा बळी घेतला .....त्या पण कुणाच्यातरी बहिणी होत्या ना .....आणि तुझा अगदी जिवलग मित्र होता ना तो त्याच्या आईसमान असलेल्या स्त्रियांना इतक्या विकृत रित्या मारलं आणि याची तुला किंचितशी ही खबर नसावी ........ तुमच्याबद्दल काय सांगावं तुमच्या पतीन तर आता जन्माला आलेल्या कळ्यांचच भक्षण केलं ..... काय दोष होता हो त्या इवल्याश्या चिमण्यांचा .....? सांगा ना काय दोष होता ....? ........" समर अगदी त्वेषाने बोलत होता.आणि तो अजुनही शांत होता.
आज त्याच्यासमोर ती लोक होती ज्यांच्या घरी गुन्हेगार जन्मला आले होते ,ज्यामधे कुणाचा मुलगा ,कुणाचा भाऊ,कुणाचा नवरा,तर कुणाचा मित्र यांचा समावेश होता .ज्यांनी एक न अनेक बलात्कार करून प्रत्येकवेळी जेल मधुन सुटले आहेत .आज त्यांच्या प्रत्येकाच्या घरातले लोक त्याच्यासमोर हजर होते ." तुम्हाला अजुनही अश्या लोकांना अश्या नीच लांडग्याना वाचवायचं आहे का ....?.." त्याचा भारदस्त आवाज त्या हॉल मध्ये अक्षरशः सिंहाच्या डरकाळी सरशी घुमला ."अश्याना ज्यांना एखाद्याची बहीण ,एखाद्याची आई,एखाद्याची मुलगी,मैत्रीण, दिसली नाही जे आपली हवस मिटवण्यासाठी त्या नीच पापिणी न उमललेल्या कळ्यांचा ही विचार केला नाही अश्याना वाचवण्यासाठी धडपडत आहेत तुम्ही.....?आणि स्पेशल यात स्त्रीचा खूप मोठा वाटा ....वा तुम्हाला माझा सलाम....." तो खुर्चीतून उठून टाळ्या वाजवत अगदी रागात बोलला त्याच्या शब्दांनी तिथे असणाऱ्या प्रत्येक स्त्रीची मान खाली झुकली ........." मला असा भाऊ नको जो दुसऱ्यांच्या बहिणीच्या अब्रूची कदर करत नाही....तुम्ही त्याला शिक्षा द्या दादा......"  अखेर त्यांच्यातल कुणीतरी बोललं ती एक 22 वर्षाची मुलगी होती जीचा भाऊ अश्याच मुलींवर रेप केस मध्ये जेल मध्ये बंद होता पण कितीही झालं तरी बहिणीची माया ती म्हणून ती मुलगी तिच्या भावाला सोडवण्याचा प्रयत्न करत होती,त्याच्या सगळ्या चुका पाठीशी मारून पण आता तिच्यातली स्त्री जागी झाली होती." हो मलाही असा मुलगा नको ज्याने माझ्या मुली समान मुलींची अब्रू देशोधडीला लावली नको असा मुलगा मला ....." एका वयस्कर व्यक्तीने ही आपली हामी भरली" हो नको मला असा मुलगा ज्याला स्त्रीच्या चारित्र्य ची जाणीव नाही तिच्या इज्जतीची कदर नाही .....तो आम्हाला असण्यापेक्षा नसलेला बरा ...." त्या वयस्कर व्यक्तीच्या बायकोने डोळे मिटून आपले अश्रू मोकळे केले कारण कितीही झालं तरी तो मुलगा होता त्यांचा पण तो आता गुन्हेगार ही होता .आर्य ने सगळ्यांच्या कडे एकदा पाहिलं तर तिथे असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर दुःख झळकत होत.सगळ्यांनी हमी भरली होती .त्याने समर कडे एकदा सूचक नजरेनं पाहिलं आणि समर ने ही त्याला मान हलवून होकार दिला .तो तिथून निघून गेला.


**************************************************************************************"दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारीं जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥


जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥


त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥

साही विवाद करितां पडिले प्रवाही ।

ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥


प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥

अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।

नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥


आज दिवसभर वातावरण खूप प्रसन्न होत कारणही तसे होते ,आज नवरात्रीचा पहिला दिवस देवीची स्थापना ,होती  वातावरणात ही एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती आज .जिकडे तिकडे देवीच्या आरती ऐकू येत होत्या .


आज आर्य च्या घरीही मूर्तीची स्थापना झाली होती , आर्य ला त्याच्याशी काहीच देणं घेणं न्हवत पण तो निव्वळ त्याच्या आईसाठी त्या कार्यक्रमात भाग घेत होता .त्यांचा रमा विला आज उजळून निघाला होता .अगदी नव्या नवरीसारखा नटाला होता ....


त्यांना घरी मूर्तीची स्थापना करून दुर्ग मंदिरामध्ये ही हवन साठी जायचं होत ..या सगळ्या धावपळीत दिवसाची संध्या कधी झाली समजलच नाही .......या सगळ्यात ती मात्र कुठेच न्हवती खरतर आर्य नेच तिला मुद्दाम बोलावलं न्हवत ...


"आर्य चला निघायचं ...."आर्य ची आई .


"अं ..हो िनघुया चला ..." त्याने एकदा वरच्या रूम कडे पाहिलं त्याला फक्त एक नजर तिला पहायचं होत .


" इतकीच घालमेल होतेय तर घे ना सोबत तिला ...." त्याच्या आईला त्याची तळमळ पाहवत नव्हती.


"नक्कीच आजच्या दिवसांनंतर ती कायम आपल्याच सोबत असेल ..." तो अजुनही तिच्या रूम कडे पाहत होता .


"धनू..." आईने खांद्यावर हात ठेवला.


"काळजी नको करू आई ... सगळ ठीक होईल ......" त्याने आईला आश्वासन दिलं तर होत पण त्यात किती तथ्य होत हे फक्त त्यालाच माहिती होत .


तिने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतल होत , पण त्यानंतर तिने एकदाही पुन्हा स्वतःला इजा पोहचवली नव्हती तिच्या समोर ते इंजिक्शन अजुनही होत . आज ती शांत होती .तिला आझाद करण्यात आले होते . कसलंच बंधन न्हवत आज तिला ,ना हातात बेड्या होत्या आणि नाही तिच्या पायात .आज फक्त ती शांत होती ,मिसेस द्विजा निंबाळकर ने बोलले एक एक शब्द तिच्या हृदयाच्या पार टप्प्यापर्यंत पोहचले होते ,त्यांच्या शब्दांनी तिच्या मनावर खोलपर्यंत कोरून गेले होते ...........


तिने आज कसलाच दंगा केला नाही ,दिलेलं जेवणही तिने थोड खाल्ल होत आता ते तिने मनाने खाल्ल होत ...? की आर्याच्या आईच्या कृपेने ते तिलाच माहिती .


###############################"तेज. ऑल डन? " त्याने फोन करून तेज ला विचारलं


"येस बॉस सगळी तयारी झाली आहे .. आता फक्त प्लॅन वर्कआऊट करायचा बाकी आहे ........" तेज पलीकडून.


"होणार वर्कआऊट ... सिक्युरिटी वाढव डॉक्टरांची टीम रेडी ठेव , समर असेलच सोबत ...... जोपर्यंत आतून येणारे आवाज थांबत नाहीत तोपर्यंत कुणीच आतमध्ये जायचं नाही ...."त्याने आपल्या जबर आवाजात  ऑर्डर सोडली.


"पण बॉस मॅम ....त्यांच्या जीवाला ...." तेज बोलत होता त्याला मध्येच थांबवत .


"तिची चिंता नको करू तू ..तिच्या केसाला ही धक्का लागणार नाही आणि मला माझ्या टीम वर विश्वास आहे ......." त्याच्या बोलण्यात एक विश्वास होता .


सगळे मूर्तीची स्थापना करून आरती करून दुर्ग मंदिरामध्ये हवन साठी गेले ,जाताना ही आर्य च्या आईचे डोळे पाणावले होते कारण आज नंतर तिच्या आयुष्यात कसे आणि कोणते बदल होणार याची कल्पना कुणालाच न्हवती...


आज न्याय होणार होता ,कधीही कुणीही न पाहिलेला न्याय . तोही तिच्या हातून आज नरसंहार होणार हे निश्चिंत होत ........


पण तरीही तो एक खूप मोठा टास्क होता त्याच्यासाठी ,क्षणात पाणी तर क्षणात आग होती ती .समोरच्याला जाळून स्वतःलाही भस्म करून मोकळी होईल अशी होती ती ..........


##############################

##############################


तुमची उस्तुकता खूप जास्त वाढवत आहे न मी ..? पण काय करू सवयीचा परिणाम हळू हळू खाल्ल की खूप टेस्टी लागत अन्न असं म्हणतात...?? तसच कथेचं पण आहे न ... सोल्ली...???


क्रमशः.....ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble