Jan 26, 2022
नारीवादी

ज्वलंत.....6( अग्निदिव्य स्त्रित्वाच)

Read Later
ज्वलंत.....6( अग्निदिव्य स्त्रित्वाच)


डोळे मिटून शांत पडून होती ती आणि त्या केंव्हा च्या तिला निहळत होत्या . पण तिला याची जराही भणक न्हवती ,त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या हातातल्या बेड्या काढू लागल्या ...

तिच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली तिने डोळे न उघडता च त्यांचा हात पकडला कपाळावर आठ्या पडल्या होत्या तिच्या ......

तिने एका सेकंदाचा ही वेळ घेतला नाही की दुसऱ्या क्षणाला तिचा हात त्यांच्या गळ्या जवळ होता तिने इतक्या पटाईने  इतकं सगळ केलं होत की त्यांना सावरायला ही वेळ भेटला नाही ......

तिचा चेहरा रागाने थामथमला होता आर्य च्या आईने डोळे गच्च मिटून घेतले तिचा एक हात त्यांच्या गळ्यावर आणि एका हाताची मूठ सरळ त्यांच्या चेहऱ्यावर अश्या पोझिशन मध्ये होती होती ती ........

"आई ssss........." आर्य मोठ्याने ओरडला तो धावत पुढे येणारच की त्यांनी हात दाखवूनच त्याला दारातच थांबायचा इशारा केला .

आर्य चा राग सातव्या असमान वर होता ,कारण त्याच्या रागात त्याच्या आईची काळजी जास्त होती .डोळे रागाने थामथमले होते .......

तिने एक नजर त्याच्यावर टाकली आणि एक नजर आर्य च्या आईवर , आर्य च्या तोंडून आई शब्द ऐकून ती बिथरली आणि तिच्या हाताची पकड सैल झाली .तिने त्यांच्याकडे पाहिले तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू चा थेंब घरंगळत येऊन तिच्या हातावर पडला त्यांना व्यवस्थित श्वासही घेता येईना .........

आर्य ला त्याच्या आईची अवस्था पाहवेना तो पुढे येणार तितक्यात........

"धनू जा इथून .."त्या मोठमोठ्याने श्वास घेत ओरडल्या आर्य जागीच थांबला

"पण आई......." त्याला त्यांचा त्रास पाहवत नव्हता

"सांगितल ना जा म्हणून जा.ssss..."त्या पुन्हा ओरडल्या आर्य च्या मुठी आवळल्या त्याने रागाने एकदा तिच्याकडे पाहिले आणि तिथून निघून गेला .

ती फक्त त्यांना एकटक पाहत होती त्या मोठ्याने श्वास घेऊ लागल्या ,तिला कसतरीच झाल त्यांची अवस्था पाहून तिने इकडे पाहिलं तर बेडच्या बाजूला पाण्याचा जार दिसला तिला ती धावत तिकडे गेली आणि तो पाण्याचा जार आणून सरळ त्यांच्या तोंडाला लावला .......

आर्य च्या आईने एकदा तिच्याकडे पाहिले आणि घटाघटा पाणी पिऊ लागल्या ,तिला त्यांची अवस्था पाहून कदाचित वाईट वाटले असेल तिने आपली नजर झुकवलि ती बेडच्या मागे पोटात पाय घेऊन अंग आकसून बसली . आर्य च्या आईला आधी समजलच नाही की ती काय करतेय पण तिच्याकडे पाहिल्यावर त्यांना समजल की ती घाबरली आहे तिला वाईट वाटलं आहे .......

आज पहिल्यांदा त्यांनी तिच्या नजरेत स्वतःबद्दल काळजी पहिली होती ,आणि तिच्या अश्या कृतीने तिच्यातल्या हिमतीची आणि शक्तीची अनुभूती ही त्यांना आली .त्यांना समाधान वाटलं या गोष्टीचं ,त्यांनी दीर्घ श्वास घेतला त्या हळूहळू चालत तिच्याजवळ आल्या पायाची जखम अजून ताजी होती . पण तिला सावरन गरजेचं होतं ....


त्या तिच्यासमोर खाली बसल्या ती गुडघ्यात मान बसली होती ,त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिच्या छोट्याश्या कृतीने तिच्या सामर्थ्याची जाणीव झाली होती .मग ती अशी का ..? आताही हा का त्यांच्याही समोर प्रश्न बनून उभा होता......

रणरागिणी होती ज्वलंत ज्वालामुखी होती ती .....

"अग्नी ........." त्यांनी मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिने हळूच मान वरकरून त्यांच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात अश्रू होते .

आज पहिल्यांदा त्यांनी तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाहीतर भावनाशून्य चेहराच पाहिला होता तिचा त्यांनी ,तिने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असेल कदाचित तिच्या नजरेत दिसत होत ते..

त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि एक बॉक्स तिच्यासमोर धरला ,ती एकदा त्या बॉक्स कडे आणि एकदा त्यांच्याकडे गोंधळून पाहू लागली .....

"घे...." आर्य ची आई

तिने थरथरत तो बॉक्स घेतला ....

"ओपन कर ...."

तिने तो बॉक्स ओपन केला आणि ती आणखीन गोंधळली  .......

" ते काय आहे माहिती आहे तुला ..?"

"इंजिक्शन आहे ते जे माणसाला फक्त पुढच्या 5 मिनिटात कायमची झोप देत........ ,याचा अँटी डोट एकाच ठिकाणी मिळतो .........,ते पण भारतात नाही भेटत... फक्त पाच मिनिटात माणसाच्या शरीरातले सगळे अवयव संपतात......... आणि त्याला समजत ही नाही तो केंव्हा मेला......... त्यालाच काय डॉक्टरला ही समजणार नाही तू कश्यामुळे मेली........... किंमत खूप महाग याची करोडोंच्या किमतीत मिळत हे इंजिक्शन , पण तुझ्यासाठी खास मागवून घेतल आहे .घे आणि झोपून जा ....." त्या बोलत तर होत्या पण आवाज खूप जड झाला होता त्यांचा .

ती फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती ......

"आणि हो ते इथे व्हेन मध्ये घ्यायचं काहीच त्रास होणार नाही शांत झोपशिल तू कायमची ......आणि आम्ही मुक्त होऊ तुझ्या जबाबदारीतून ....तुला रोज असं मारताना नाही पाहू शकत मी ......रोज स्वतःच्या हातांनी ज्या जखमा तू देतेय ना स्वतःला त्या नाही पाहू शकत मी .......खरतर तुला काहीच हक्क नाही स्वतःच काही करायचा कारण तुझ हे आयुष्य माझ्या धनुने दिलेलं आहे ....... पण रोज तुझी होणारी फरफट नाही पाहू शकत मी .....त्यापेक्षा संपव तू स्वतःला आणि करून टाक शेवट स्वतःचा ....." त्या बोलता बोलता तिच्याकडे पाहत होत्या तिच्या चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होत्या .

" पण ते इंजिक्शन घेण्याआधी तुझ्या त्या आई बाबांचा विचार नक्की कर जे तू परतण्याची आतुरतेने वाट पाहत असतील.........ज्यांचा अजुनही विश्वास आहे की तू जिवंत आहेस ........... त्यांच्याबद्दल विचार कर ज्यांनी तुझी अशी अवस्था केली आहे आणि ते नीच नराधम आता मोकाट सुटले आहेत ......तुझ्यासारख्या च कळ्यांच भक्षण करत ........त्यांना असच मोकाट सोडून पळपुट्या सारखं अस भेकडाच मरण ओढवून मुक्त व्हायचं .........विचार कर एकदा त्या निर्भयांच ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपली लढाई सोडली नाही त्या पापींशी तरीही त्या वाचल्या नाहीत ...ती दिल्लीची निर्भया, हैदराबाद ची निर्भया,ती 6 वर्षाची चिमुकली आणि आता हल्ली झालेली मुंबईची निर्भया अश्या कितीतरी मुली..... पण तुला जीवनदान भेटलं आहे अश्या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी ........आणि तू पावलोपावली स्वतःला संपवायचे नवीन खेळ खेळतेस....!!..."     त्यांचे शब्द कदाचित तिच्या मनापर्यंत जात होते कारण तिच्या कपाळावर आता आठ्या जमा होत होत्या

" पण काही हरकत नाही तू संपव तुझ आयुष्य ..........त्यांचं काय...... आज तू....... उद्या आणि दुसरी कुणी असेल तुझ्या जागी ........आणि तुझ्यासारख्या पळपुट्या मुलींनी जगूनही काही फायदा नाही .........तू गेली की ते लांडगे प्रत्येक मुलीची शिकार असेच करतील .......रोज एक दावत असेल त्यांच्यासाठी......कॉलेज,ऑफिस,रस्ते , जिकडे दिसतील तिथून उचलतील ते मुलींना....... पण तुला काय फरक पडणार आहे ......तुला तर तुझ हे दुःख कवटाळून बसायचं आहे .......तसही आजकालच्या मुली फक्त शॉपिंग, मकेपिंग, आणि मोबाईल वर वेगवेगळ्या पोझ देऊन सेल्फी काढण्यात दंग असतात त्यातलीच तूही एक असशील .........आणि तू मेली तरी कुणाला फरक पडणार आहे तुझ असं अस्तित्व आहे तरी काय ......". त्या तिला होईल तितके उकसविण्याचा प्रयत्न करत होत्या

"स्त्री म्हणजे आता प्रत्येकाच्या पायातली धूळ बनली आहे ,पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी असूनही अजुनही दुय्यमच आहोत आपण ....अजुनही आपण दलालांच्या हाती विकल्या जातो , अजुनही हुंड्याच्या नावाखाली जाळल्या जातो, अजुनही वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या   किळसवाण्या हाताखाली दाबल्या जातो , अजुनही काही ठिकाणी मुलासाठी निष्पाप कळींच्या जीवाशी खेळल्या जातो ,आजही लाखो नजरेंचे बलात्कार झेलतो आपण ...कारण ....कारण का माहिती आहे ....." त्या तिच्याकडे पाहून खिन्न हसल्या

"कारण आताच्या मुली त्या रणरागिणी राहिल्या नाहीत ज्यांनी एकेकाळी इतिहास घडवला , आपल्यावर नजर टाकणाऱ्या पापिंचे डोळे काढले त्या आता आहेत कुठे आपल्यात आणि त्या होऊ ही शकत नाहीत आता .....आता फक्त व्हॉटसअप वर प्रेमाचे शेरो शायरी असतात ....एकान धोका दिला की त्याच्या विरहात आत्महत्या करायची .......आपल्या मनासारखं नाही झाल की आपल्याच जन्म दात्याना डावलून काहीच विचार न करता पळून जायचं ...... माँ साहेब जिजाऊ ,झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, यांच्यासारखे होणे नाही ....... पण इथे फरक कुणाला पडतो तू कर तुझ काम तू दे जीव ......" तिच्या चेहरा काहीच रिअॅक्ट करत नव्हता ती फक्त ऐकत होती .

" तू तुझ्या शरीरावर च्या घावाना पाहून इतकी बिथरते मग त्यांनी काय करावं ज्यांच्या गुप्तांग मध्ये हत्यार घुसवली त्या नीच लांडग्यांनी ... त्यांना झाल्या नसतील का वेदना ?...जिला जिवंत जाळली तिला झाला नसेल का त्रास...? ज्यांना हजारोंच्या मध्ये नग्न अवस्थेत फेकून बारी बारिने जिच्यावर अत्याचार होतो तिने काय केलं पाहिजे तिला होत नसेल का त्रास ......? आज तुझा शेवट झाला ना अग्नी तर पूर्ण स्त्रीत्वाचा शेवट होईल आज .....आज ती स्त्री हरेल जिने नऊ महिने पोटात वाढवून तुला जन्म दिला तुला लहानच मोठं केलं ती आई हरेल आज......एक मुलगी जिने आपल्या बाबांची स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनाला बाळगून धाडसाने बाहेर पडायचा निर्णय घेतला ती मुलगी हारेल आज ......एका भावाची लाडकी बहीण हारेल आज .........."   तिला कसं समजवाव तेच कळत नव्हतं त्यांना पण आज तिला सत्यात आणण गरजेचं होतं.

उद्या मूर्ती स्थापना होती आणि मूर्तीची स्थापना आणि तिला परत आणायचं होत त्यांना , आता तिच्यासमोर ती फक्त एक स्त्री होती ..........

"मी तुला का सांगतेय तुला तर जगायचं नाही ना ....जाऊदे तू घे ते इंजिक्शन म्हणजे तुझ काम निपटून उद्या मूर्ती पुजवायला बर पडेल आम्हाला .... निघते मी ...." त्या तिथून जायला उठल्या ...

"आणि हो . प्लीज आवाज नको करू बाहेर उद्याची तयारी चालू आहे  तुझ्या तोंडातून एक शब्द ही आला नाही पाहिजे ...." त्यांच्या आवाजात जरब होती त्या निघून गेल्या .

ती अजुनही तशीच बसून होती टकमक त्या बॉक्स मधल्या इंजिक्शन ला पाहत ....


तिने डोळे घट्ट मिटून घेतले .........

आजूबाजूला आरडाओरडा ऐकू येत होता,कुणाच्यातरी किंकाळ्या ऐकू येत होत्या शरीराला आगीची दाहकता भासत होती .तिच्या कानावर फक्त आवाज ऐकू येत होते डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती, पण कुणीतरी खूप मोठं मोठ्याने हसत होत तिच्यासमोर ......डोळ्यासमोर पुसट श्या आकृत्या दिसत होत्या ..........तरीही तिने डोळे उघडण्य चा प्रयत्न केला ..........

तर समोर आगीचे लोट वाहत होते त्या आगीतून किंकाळ्या ऐकू येत होत्या , त्याच्यातून कुणीतरी मदतीसाठी ओरडत होत .आणि तो नीच तिच्यासमोर दात बिचकुन हसत होता .......

अगदी क्रूर हसू होत त्याच ....कुणीतरी त्याला विणवत होत तर कुणीतरी त्याच्यापुढे भांडत होत...... हीच्यासमोर फक्त ते आगीचे लोट आणि त्यातल्या किंकाळ्या च ऐकू येत होत्या ..........

आता तीच डोकं दुखायला लागलं तिने झपकरून डोळे उघडले ..अंग थरथरत होत तीच ...तिने पुन्हा एक नजर त्या इंजिक्शन कडे पाहिलं......


****--*******-----*******-------*******-------*******------


हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे , माझ्यासाठी तरी कारण ही सत्यपरस्थीती आहे .कथा लिहिताना माझं काही चुकतं असेल तर सांभाळून घ्या ....आणि राहिला प्रश्न तुमच्या cmt चा तर होय हव्यात मला cmt या स्टोरी साठी ....कारण मला तुमची मत समजतील तुमच्या cmt मला एनर्जी समान आहेत .जे पुढे लिहिण्यासाठी मला प्रोत्साहन देतात .


म्हणून हक्कान मागते मी cmt म्हणजे मला समजेल तुमचे विचार ,मांडा आपली मतं फक्त छान आहे किंवा फक्त सुंदर लिखाण ही cmt नकोच मला मी ही कथा खूप विचार करून लिहायला घेतली आहे. या कथेच्या खऱ्या पर्वाला सुरू करायचं आहे मला त्या आधी तुमची मत जाणून घ्यायची आहेत plz नक्की सांगा मला आणि तुम्हाला पण काही सुचत असेल तर नक्की सांगा मी स्टोरी मध्ये nkki add करेन....

मला स्त्री रूपातली नवदुर्गा दाखवायची आहे त्यासाठी तुमचे प्रोत्साहन खूप महत्त्वाचे आहे ......???????

तुमच्या समिक्षांवर कथेचा पुढचा भाग ठरवला जाईल ,

माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..?☘️☘️☘️❤️???????


क्रमशः...........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Gaytri Kamble