फक्त तुझ्यासाठी!!- भाग ३

This part is in continuation with earlier series.

सूर्याचा निरोप कळताच रुचिरा तातडीने पोलिस स्टेशनमध्ये येण्यासाठी धावली होती.. आज काही करून तिला सूर्याची दाहकता कमी करायची होती.. आपल्या चुकांची कबुली देत; सुर्याची माफी मागण्याचा चान्स तिला गमवायचा नव्हता.. सुर्या देईल ती शिक्षा पुर्ण करण्याचे तिने ठरवले होते..

                        ------------------

रुचिरा धावतच पोलिस स्टेशनला पोहचली.. निशांत तिथे आधीच येऊन बसला होता.. रागिणी मॅडमच्या विशेष परवानगीने दोघांनाही लॉकअपमध्ये प्रवेश दिला होता..

'हवालदार माटे, तुम्हीं आज तर त्या शर्माकडे नोटिस घेऊन जाणार होतात ना?? मग इकडे लॉकअपच्या आसपास का घुटमळत आहात??'- इन्स्पेक्टर सावंतांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला हटकले तसे आतील तिघांच्या नजरा त्या दिशेने गेल्या होत्या..

सुर्या अन सावंतांचीं नजरानजर झाली होती.. सुर्याने डोळ्यांनी इशारा करताच सावंतांनी हवालदार माटेला बोलण्यात गुंतवत तिकडून दूर नेलं होतं..

'सुर्या..'- रुचिराचा कंठ दाटून आला होता..

'येस.. मिसेस रुचिरा आरव सुर्वे.. काय दुर्दैव आमचं की आम्हांला पुन्हा एकदा विषाची परीक्षा घेण्याची वेळ आली आहे..'- सुर्या नजर दुसरीकडे फिरवत म्हणाला..

'सुर्या.. मानलं मी भरकटली होती.. तुझ्या प्रेमाशी धोका करत; मी आरवचा हात पकडला होता.. तेव्हा मला ऐषोआरामाची स्वप्न पडत होती, मला लक्जरी लाईफ जगायची होती.. आणि त्याच स्वार्थीपणात मी तुझं प्रेम, तुझ्या फिलिंग्ज चिरडून आरवचं प्रपोजल स्वीकारले होते.. पण मला माझी चूक खूप लवकर कळली रे.. बट तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. तु कॉलेज मधून पास आऊट झाला होतास.. खूप शोधलं मी तुला पण नाही भेटलास तु.. तुला माहीत नसेल बट त्या दिवसापासून मी फक्त आणि फक्त तुझ्या माफीसाठी जगतेय.. मला माफ कर पिट्टू...'- रुचिने हात जोडले होते..

'खबरदार मला पिट्टू बोललात तर!! मेला पिट्टू.. आता समोर आहे तो पिंट्या किंवा सुर्या.. आणि माफी?? ती ही तुम्हांला?? या जन्मात तरी शक्य नाहीच.. '- सूर्या मोठया आवाजात बोलला तसे पोलिस स्टेशनमधील साऱ्यांचे कान टवकारले गेले होते..

'मॅडम, इथे आम्ही तुम्हांला आमच्या केससाठी बोलवलं आहे.. आणि हा आम्ही त्यासाठी तुम्हाला फी देणार आहोत.. ती ही कमी पडत असेल तर प्लीज गद्दारी करू नकात.. मी स्वतःला विकेन बट तुम्हाला हवे तितके पैसे मिळतील.. फक्त आम्हांला धोका देऊ नका..'- सूर्याचे शब्द रुचिराच्या जखमांवर तिखटासारखे पडत होते.. 

'मी.. मी प्रॉमिस करते तुला सुर्या.. मी माझा जीव गेला तरी बेहत्तर बट तुला या केसमधून सहीसलामत बाहेर काढेन..'- रुचिराने आपले अश्रू फुसत म्हटलं..

'मॅडम दोन गोष्टी- एक हि केस मला निर्दोष सादर करण्याची नव्हे तर अनघावर झालेला बलात्कार सिद्ध करून तिवारीच्या मुलावरचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आहे.. आणि दुसरं म्हणजे प्रॉमिस अँड ऑल अशा गोष्टी तुम्ही न बोललेल्याच बऱ्या ना?? हो की नाही?? त्याच काय आहे ना; खोटी वचनं देणं अन दिलेली वचनं तोडणं हा तर आपला आवडता छंद आहे..'- सूर्याने रागात रुचिकडे पाहत म्हटलं तशी तिने मान खाली घातली..

'एक दिवस तुला नक्कीच कळेल की माझा पश्चाताप खरा होता, माझे अश्रू खरेच होते..'- रुचि स्वतःला सावरून बसली होती..

'सो गाईज.. ऑल वेल?? मी आत येऊ शकतो का??'- लॉकअपमध्ये एक भारदस्त आवाज घुमला होता..

त्या व्यक्तीला पाहताच रुचि, सुर्या ताडकन उभे राहीले होते.. रुचि-सूर्याचं बोलणं ऐकून आधीच गोंधळलेला निशांत नवीन व्यक्तीला पाहून हैराण झाला होता..

'काका, तुम्हीं?? आय कान्ट बिलिव्ह.. बट तुम्हीं तर काकींसोबत फ्रान्समध्ये सेटल झाला होतात ना??'- सुर्या अजूनही चकीत होता..

'हो.. अरे आम्हीं ठरवलं होतं की आमच्या मोनिकासोबतच आयुष्य काढायचं.. त्या दिवशी अचानक आमच्या शैतान लेकीचा फोन आला आणि आम्हीं इथे आलो..'- त्या व्यक्तीनें म्हटलं..

'ओह माय गॉड.. मि. साटम तुम्हीं??'- रागिणी मॅडम आत येताच शॉक झाल्या होत्या..

'हो.. काय करणार.. लेकीच्या आणि बायकोच्या हट्टापुढे कोणाचं चालतं का??'- आशिषने हसत म्हटले..

'म्हणजे?? तुम्ही तर फॉरेनला सेटल??'- रागिणी मॅडमना अजूनही आशिष साटमला समोर बघून विश्वास बसत नव्हता..

'हो.. मि आणि माझी बायको; आमच्या एका मुलीसोबत फ्रान्सलाच असतो.. पण काही दिवसांपूर्वी या रुचिराने; आमच्या  कनिष्ठ लेकीकडे; संध्याकडे या केससाठी मदत मागितली होती.. बट तिला आठवा महिना सुरू असल्याने तिला ही केस लढणं शक्य नव्हतं मग तिने मला फोन करून गळ घातली अँड हिअर आय एम !!'- आशिषने हसून खुलासा केला..

'चला म्हणजे आता तुमच्या प्रवेशाने या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे चान्सेस नक्कीच वाढतील.. तुम्ही केस लढवणार हे ऐकूनच समोरचा वकील गर्भगळीत होईल..'- रागिणी मॅडम खुश झाल्या होत्या..

'बट राणे मॅडम;  केस मी लढवणार नाहीये.. केस रुचिराच लढेल.. मी फक्त कृष्ण बनून तिचं सारथ्य करेन..'- आशिषने रुचिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं तसा सूर्याचा काही वेळापूर्वी खुललेला चेहरा पुन्हा पडला होता.. रुचिला ते कळलं तसं तिला मनातून दुःख झालं होतं..

'डोन्ट वरी सुर्या.. या वेळी रुचिने ठरवलं तरी ती आपल्याला धोका देऊ शकत नाही.. आणि दुसरं म्हणजे तु इथल्या शिक्षेतून वाचलास तरी त्या जल्लादापासून तुला कोण वाचवेल?? तो जल्लाद कोण ते तुला कळलंच असेल की नाही??'- आशिष अधिकच जोरात हसला..

'सॉरी काका.. मी स्वतःच्या भावनांना आवर नाही घालू शकलो.. रवी बाबांनी माझ्यावर केलेल्या खर्चाचा मी चुराडा केला.. माझ्या भावासारख्या आशिषचं मला वकिली कोटात पाहण्याचे स्वप्न मला पुर्ण करता आलं नाही.. प्रेमभंगाने मी माझं शिक्षण तर अर्धवट सोडलंच पण त्या रागात वाईट मार्गाला लागून टपोरीगीरी सुरू करून मी त्यांना अधिकच दुःखी केलं.. आता तर मी तुरुंगात असल्याचे ऐकून त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही..'- सूर्याने मान खाली घालत सांगितलं तसा रुचिराला प्रचंड धक्का बसला.. तिच्या डोळयातून पुन्हा अश्रुधारा वाहू लागल्या होत्या..

'बट मी ज्या जल्लादाबद्दल बोलतोय ते तुला कळलेलं दिसत नाही.. तुझ्यामुळे तुझ्या रवी बाबाच्या डोळयातून पाणी आलंय आणि तुला माहीत नसेल की त्याचा एक बॉडीगार्ड आहे.. आणि तो तिवारीपेक्षाही जास्त क्रूर आहे बरं का.. तो तुला इथून बाहेर काढेलच कारण त्याने रवीला तसं वचन दिलंय बट त्याच्यापासून तुला कोण वाचवणार??'- आशिषने काहीसं गंभीर होत म्हटले तसे सुर्या सोडून बाकी सगळे चक्रावले होते..

'म्हणजे?? शरयू आत्याला कळलं हे सर्व??'- सूर्याने भीतीने आवंढा गिळला..

'येस डिअर.. सो बेस्ट ऑफ लक बरं का तुला..'- आशिषने सूर्याला अधिकच घाबरवलं..

'आत्या कुठे आहे काका??'- सूर्याने विचारलं..

'सध्यातरी ती तिच्या नातीसोबत आहे.. बट ती लवकरच येईल तुला भेटायला.. काय उत्तरं द्यायची ती आतापासूनच तयार कर.. तु फक्त तेवढी काळजी घे.. या केसची आता कोणी चिंता करायची गरज नाही.. तिने रवीला प्रॉमिस केलंय म्हटल्यावर विषयच संपला..'- आशिषने एकवार सगळ्यांकडे पाहत म्हटलं..

'कोण आहेत या शरयू, सर??'- रागिणी मॅडमनी न राहवून विचारलं..

'तशी तर ती माझी पत्नी आहे.. बट या केसच्या निमित्ताने ती साऱ्या खेळाची सूत्रधार असेल.. आता ती यांत किती आत शिरते यावर सारं काही अवलंबून आहे..'- आशिषने सांगितलं...

'बाय द वे निशांत; तिला सर्वात आधी तुझ्याशी आणि अनघाशी एकत्र बोलायचं आहे.. रुचिरा तुला त्यांच्यासोबत राहायचं आहे.. आज संध्याकाळी शार्प पाच वाजता.. अनघाच्या घरी..'- आशिषने निशांत अन रुचिला सूचना केली होती..

निशांत अन रुचि त्या अनुषंगाने बाहेर निघणार तोच बाहेर एका स्त्रीच्या येण्याची चाहूल लागताच जागीच थांबले होते..

'तु इथे??'- आशिष शरयुला पोलिस स्टेशनमध्ये पाहून चकीत झाला होता..

'रागिणी; हाऊ आर यु? तुला तुझं स्वप्न पुर्ण केलेलं पाहून छान वाटलं.. सो यु आर डीसीपी हिअर?? '- शरयूने थेट रागिणी मॅडमच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं तसे उपस्थित सारे जण जवळपास उडालेच..

'मि. साटम? तुम्ही म्हणत होतात ती ही शरयू?? शरयू देशपांडे??'- रागिणी मॅडमच्या चेहऱ्यावर आनंदमिश्रित आश्चर्य होते..

'हो.. कदाचित तुमची शरयू देशपांडे असेल.. बट ती माझी शरयू आशिष साटम आहे.. माझी बायको.. माझी ताकद..'- आशिषने शरयुकडे पाहत म्हटलं तशी शरयू मनातून खुश झाली होती.. आशिषने तिच्यावर असा हक्क दाखवलेला पाहून ती सुखावली होती..

'शरयू, तु काय करतेस सध्या?? आय रिमेम्बर तुला शेफ बनायचं होतं ना??'- रागिणी मॅडमनीं विचारलं तशी शरयू हलकी हसली..

'नाही मी एक गृहिणी आहे.. '- शरयूने हसत म्हटलं..

न जाणे आशिषला तिच्या हसण्यात एक प्रकारची खिन्नता जाणवली होती.. मग त्यानेही मनोमन काहीतरी ठरवलं होतं..

'खरंच?? आय कान्ट बिलिव्ह? तु तुझ्या ड्रीम बाबत किती सीरिअस होतीस? अँड ?? मि. साटम; आम्ही दोघी कॉलेजमध्ये एकाच वर्गात होतो.. फ्रेंड्स नसलो तरी एकमेकींना चांगलं ओळखत होतो.. मला आठवतं; ही मुद्दाम खाण्याची स्पर्धा भरवायला भाग पाडायची आणि मग ती एकहाती जिंकायची.. बट ती आता फक्त एक हाऊसवाईफ?? अनबिलिव्हेबल..' - रागिणी मॅडम जुने दिवस आठवून बोलल्या..

'बलिदान.. असंच बोलू शकतो मी मॅडम.. माझ्या सुखासाठी; माझ्या व्यावसायिक प्रगतीसाठी तिने आपल्या स्वप्नांचा दिलेला बळी तिने कधीच कोणाला जाणवू दिला नाही.. आशिष साटम एक मोठा वकील आहे असं लोक म्हणतात पण कोणामुळे?? या शरयूच्या कुर्बानीमुळे.. आमच्या तिन्ही मुली आज कर्तृत्ववान झाल्यात.. कोणामुळे?? माझ्या शरयुमुळे..'- आशिषने बायकोचा हात हाती घेत म्हटलं..

'तु फक्त गृहिणी नाहीस शरू.. माझ्यासाठी गृहलक्ष्मी आहेस.. मेणबत्ती बनून माझ्या आयुष्यात उभी राहिलीस.. स्वतः झिजत गेलीस पण माझं आयुष्य उजळून टाकलंस.. थँक्स डिअर..'- आशिषने हळुवारपणे शरयूच्या डोळ्यांत आलेले पाणी फुसलं आणि तिचे गाल लाडीकपणे ओढले तसे तिच्याही चेहऱ्यावर हसू खुललं.. चारचौघांत नवऱ्याने केलेलं कौतुक तिला अत्यानंद देऊन गेला होता..

'पुरे आशु.. मी इथे वेगळ्या कारणासाठी आली आहे..'- शरयूने आशूला एकवार मिठी मारत बाजूला केलं होतं..

तिने एकदा सुर्या, रुचि आणि निशांतकडे नजर फिरवली आणि तिने रागिणी मॅडमच्या कानात काहीतरी म्हटलं होतं.. पुढे मॅडमच्या सूचनेनुसार लॉकअपच्या आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना तिथून दूर केले गेले होते..

'रुचिरा, तुझी आणि सूर्याची ओळख काय??'- शरयूने बेसावध रुचिला प्रश्न केला तशी ती गडबडली..

'ती काय सांगेल..'- सूर्याने बोलायला सुरूच केलं होतं की शरयूची धारदार नजर पाहून त्याने लागलीच आपलं बोलणं थांबवलं होतं..

'हम्म.. बोल तु..'- शरयूने डोळ्यांनी रुचिराला धीर दिला..

'मी आणि सुर्या रिलेशनशिपमध्ये होतो.. अगदी लॉ च्या पहिल्या वर्षीपासून.. सुर्या माझ्याबाबत खूप सिरिअस होता.. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तरी आपलं मिळालं असं तो मला सारखं सांगायचा.. खूप आनंदी असायचा तो.. लेक्चर संपलं की माझ्यासाठी तासंतास थांबून राहायचा.. बट.. बट त्याच प्रेम जितकं उत्कट होत तितकंच माझं  प्रेम बेगडी होतं.. मला त्यावेळी नव्हती त्याच्या प्रेमाची कदर! सुर्या दिसायला राजबिंडा होता; त्यामुळे माझ्यासाठी तो फक्त एक  स्टेट्स सिम्बॉल होता.. बाकी काही नाही.. हळूहळू मी त्याच्या प्रेमाला बोअर होऊ लागली होती.. अशातच एक दिवस त्याने मला सांगितलं की तो अनाथ आहे; त्याच्या शिक्षणाचा सारा खर्च कोणती तरी संस्था करतेय म्हणून.. बास.. मला तर निमित्त भेटलं.. मी मुद्दाम त्याच्याकडे गिफ्ट्स मागू लागले.. त्याला जबरदस्ती महागड्या हॉटेलमध्ये नेण्यास भाग पाडू लागले.. मला त्याच्यापासून लवकरात लवकर सुटका हवी होती.. पण याच प्रेम कमालीचे चिवट होते.. तो काही करून माझ्या मागण्या पुर्ण करतच होता.. आणि एक दिवस माझा बर्थडे जवळ आला होता.. सुर्या खूप खुश होता.. त्याने मित्रांबरोबर माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं.. त्याच्या मित्रांनी कॉलेजचा हॉल सजवून ठेवला होता.. सूर्याने स्वतःच्या हाताने प्रेमसंदेश लिहिले होते.. तो त्या दिवशी मला लग्नाची मागणी घालणार होता.. अँड... मी..'- मघासपासून न थांबता बोलणाऱ्या रुचिला नकळत हुंदका आवरता आला नाही आणि तिला रडू कोसळलं होतं..

'रुचि पुढे??'- शरयूने तितक्याच थंडपणे तिला विचारलं..

'मला बोलण्यात गुंतवून हॉल मध्ये आणलं गेलं होतं.. साऱ्यांनी टाळ्या वाजवून मला शुभेच्छा दिल्या होत्या.... समोरच टेबलावर एक साधा केक होता.. त्यावेळी तो केक बघूनच माझा सारा मूड ऑफ झाला होता.. '

'इतकी वाईट चॉईस सुर्याचीच असणार.. शीट.. आता हा मला खावा लागू नये म्हणजे झालं.. हे गॉड सेव्ह मी..'- मी मनाशीच प्रार्थना करत होती..

'हेय ब्युटीफूल..'- आरव आणि त्याच्या ग्रुपची हॉलमध्ये एन्ट्री झाली होती.. 

आरव एक श्रीमंत घराण्यातील मुलगा होता.. लुकला यथातथाच असला तरी त्याचे राहणीमान आलिशान होते अन त्यामुळेच कित्येक मुली त्याच्या मागे दिवान्या होत्या.. सूर्याचं सत्य कळून मी त्याला टाळाटाळ करायला अन आरवने माझ्याशी फ्लर्ट करायला एकत्रच सुरुवात झाली होती.. मी ही मग त्याच्याकडे हळूहळू ओढली जात होती.. सूर्याच्या अपरोक्ष आमच्या भेटी वाढू लागल्या होत्या.. 

माझ्या बर्थडे दिवशी आरवने माझ्यासाठी थ्री लेयर केक आणला होता.. केक बघून मिच काय सारेजण हरखून गेले होते.. त्याच्या मित्रांनी टेबलावरचा; सूर्याने आणलेला केक उचलून बाहेर फेकला होता.. आणि मीही त्यांना अडवलं नव्हतं.. उलट मी खूप खुश होते..

'विल यु मॅरी मी?? आय लव्ह यु रुचिरा!!'- आरवने अचानक हातात डायमंड रिंग घेऊन; गुडघ्यात बसून मला प्रपोज केलं होतं..

झाल्या प्रकाराने मी फक्त पागल व्हायची बाकी होती.. तिथे असलेल्या लोकांनाही हा एक मोठा धक्का होता..

'रुचिरा, विल यु मॅरी मी??'- आरवने हसत पुन्हा एकदा विचारलं..

'येस.. येस.. येस..'- मी आनंदाने वेडी झाली होती..

आरवने माझ्या हातात रिंग घातली आणि माझ्या हाताच चुंबन घेत त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.. त्यानंतर आम्ही केक कटिंग केली होती.. आरवने माझ्यासाठी भरपूर सारे गिफ्ट्स आणले होते.. ते पाहून मी इतकी भारावून गेली होती की मी तिथेच त्याला सगळ्यांसमोर मिठी मारली होती.. 

'मॅम, त्या वेळेस मी स्वार्थीपणाने इतकी आंधळी झाली होती की मला एकदाही सूर्याची आठवण झाली नव्हती..'

'त्या दिवसापासून सुर्या एकदाही माझ्यासमोर आला नव्हता किंवा तो क्लास अटेंड करत नव्हता.. पण मला आता त्याची फिकीर नव्हती.. उलट त्याच्यासारख्या दारिद्र्यवान माणसापासून पिच्छा सुटल्याने मी समाधानी होती..'

'अशीच एकदा मी आरवसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती.. सुर्या आणि तुमची मुलगी संध्या एकत्र गप्पा मारत बसले होते.. सूर्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते पण तरीही तो संध्याशी बोलत होता.. त्या दिवशी त्याला रडताना पाहून प्रथमच त्याची किव येत होती.. पण मी तेव्हा स्वतःला बिल्कुल चुकीची समजत नव्हती..'

'रुचिरा!!'- एक दिवस सकाळीच संध्याने माझा रस्ता अडवला होता..

फट्ट.. मी तिला गुड मॉर्निंग बोलायच्या आतच तिने सर्वांसमोर माझ्या कानशिलात लगावली होती.. अख्ख कॉलेज माझ्याकडे बघू लागलं होतं..

'तुझ्या आयुष्यात लवकरच पाश्चातापाचे क्षण येतील.. सूर्याच्या सच्च्या प्रेमाला ठोकर मारून तु भंपकपणाला जवळ केलं आहेस ना?? त्याचा फोलपणा लवकरच तुझ्या समोर येईल.. आणि त्या दिवशी तु इतकी रडशील ना की बास रे बास!! लाख जण जरी तुझे अश्रू फुसायला उभे राहिले तरी ते फुसले जाणार नाहीत.. आज जितकं दुःख सुर्या भोगतोय ना त्याच्यापेक्षा जास्त वेदना तुझ्या आयुष्यात येतील.. लक्षात ठेव..'- संध्या तावातावाने बोलून तिकडून निघून गेली होती.. 

'त्यावेळेस वाटलं नव्हतं की तिचं बोलणं इतकं खरे ठरेल'- रुचिच्या रडण्याचा आवेग वाढून ती शांत झाली होती..


क्रमशः

© मयुरेश तांबे

कथेचे सारे अधिकार लेखकाच्या अधीन असून; कथा नावासाहित प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही.. 

सादर कथा ही काल्पनिक असून;   एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी सबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती..

धन्यवाद..

🎭 Series Post

View all