जुळून येती रेशीमगाठी... भाग 5 अंतिम

Ek anokhi premkath

जुळून येती रेशीमगाठी...भाग 5 अंतिम

वाढदिवस साजरा केल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत जातात... नित्या पण तिच्या खोलीत जाते... 

चिन्मय : उत्तर दिलेले नाही तू अजून.... 
"उत्तर? "कशाचे उत्तर ..... 

"अच्छा मी तुला आय लव यु म्हणालो, पण तू काहीच बोलली नाहीस ....नित्या गप्प असते ती स्वतःच्या आवरण्यात माझं काही लक्षच नाही असं दाखवून खोलीतून निघून जाते, येईपर्यंत चिन्मय झोपलेला असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी... 

" चिन्मय ,लवकर तयारी कर... आपल्याला बाहेर जायचे आहे..." 

" कुठे ..? 
"मी सांगते , तू आधी तयार हो..." 

चिन्मय तयार होतो , नित्या कॅब बुक करते आणि त्याला घेऊन जाते... चिन्मयला कुठल्याच गोष्टीची कल्पना नसते... गाडी एका हॉटेल समोर येऊन थांबते नित्या चिन्मयच्या डोळ्याला पट्टी बांधते... 

" हे काय केरतेस...." 

" काही नाही , काल तू मला सरप्राईज केलंस ना मग आज मी करते त्यामुळे गप्प बस आणि निमुट माझा हात पकड आणि चल.... ती त्याला हॉटेलच्या बाजूला तलावाकाठी नेते त्याला नाव मध्ये बसवते आणि घेऊन जाते दुसऱ्या किनारीवर आल्यावर चिन्मयच्या डोळ्याची पट्टी उघडते पाहतो तर काय समोर मोकळ्या आकाशात एक सुंदर टेंट तयार केलेला असतो ,त्याला फुलांनी सजावट केलेली असते, खूप सुंदर दिसते ...चिन्मयला खूप भारी वाटतं आज,समोर जातात तर एक छान टेबल डेकोरेट केलेला असतं टेबलवर केक ठेवलेला असतो आणि त्यावर ठळक अक्षरात "आय लव यु चिन्मय" असे लिहिलेले असते चिन्मय खुश होऊन.... 

" नित्या , हे सगळं काय आहे ...अग मी हे सगळं करायला हवं तर हे सगळं तू केलस थँक्यू नित्या म्हणून तिचा हात पकडतो ...." 

"नाही चिन्मय.... माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला त्याच्यासाठी कदाचित तुझा जीव गेला असता मला माहिती आहे मी माफीच्या लायक नाही पण तरीही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी...." 

" इट्स ओके,  तू वारंवार तेच बोलू नकोस... पण हे तू खूप छान अरेंज केलेस आय एम सो हॅपी.... 
नित्यानी  जेवणाची व्यवस्था केलेली असते , जेवण केल्यानंतर पुन्हा चिन्मय साठी एक सरप्राईज असतं , नित्या चिन्मयचा हात पकडते,  पडदा बाजूला सरकवते समोर एक बेड सजवलेला असतो.... बेडशीट वर हार्ट आकारात गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला आणि ठळक अक्षरात आय लव यू चे अल्फाबेट्स बनवलेले असतात ....चिन्मय खूप खुश होतो त्याला खूप भारी वाटतं म्हणजे हे सगळं मी करायला हवं असं त्याला वाटतं... नित्या चिन्मयचा हात पकडत डोळ्यात डोळे टाकत 

"आय लव यू " असं म्हणते 
"चिन्मय मी पूर्णपणे मनाने आणि शरीराने तुला स्वीकारले रिअली आय लव यू ..." 

"आय लव यु टू .."त्यांची आज खरी सुहागरात झाली मनाने जुळले आणि शरीरानेही जुळले,  घरी परतल्यानंतर बघतात तर काय... आई-बाबा समोर वाट बघत बसलेले दोघांना वाटलं  आता आल्याआल्या आपल्याला ओरडा खायला मिळेल, पण तसं होत नाही ...चिन्मय- नित्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून त्यांना ओरडा नाही तर आशीर्वाद मिळतात.... दुसऱ्या दिवशी निर्मलाने सत्यनारायणाची पूजा ठेवलेली असते दोघांना पूजेवर बसवतात दोघे अगदी खुश असतात,, आता हळूहळू सगळं स्थिर होत चाललंय चिन्मयनी ऑफिस जॉईन केलं आणि नित्या पण  बुटीकला जायला लागली..... तीन-चार महिने आनंदाने भरभर निघून गेले... 


नित्याला दिवस गेलेत ,तिच्या प्रेग्नेंसीबद्दल ऐकून घरात सगळे खूप खुश होतात.... तिचे लाड कौतुक सुरू होते, निर्मला आणि गायत्री छोट्या छोट्या गोष्टी पासून तिची काळजी घेतात, तिच्या खाण्यापिण्याची, डॉक्टरकडे नेण्याची सर्व व्यवस्थित काळजी घेतल्या जाते,  भरभर सात महिने निघून गेले.... नित्याची गोदभराई आली...निर्मला आणि गायत्री खूप छान तयारी करतात....
पाळणा सजावट करण्यापासून ते अगदी नित्याला तयार करण्यापर्यंत गायत्रीच सगळं करते...  घरातले सगळे खुश असतात... कार्यक्रम पार पडतो ...पण अचानक दुसऱ्या दिवशी नित्याची तब्बेत बिघडते... तिला ऍडमिट करावं लागतं.... डॉक्टर क्रिटिकल कंडिशन सांगतात... सिझेरियन करावं लागेल .... घरातलं पहिलच बाळ आणि हे असं झालं, सर्वांना खूप टेन्शन येत... पन निर्णय तर घ्यावा लागणार होता...सिझर झालं आणि नित्या आणि चिन्मय च्या घरी लक्ष्मी आली .....

नित्या आणि चिन्मयच्या प्रेमाच्या वेलीवर एक अंकुर आलं.... लक्ष्मीचं स्वागत ही कुंकवाच्या पावलांनी झालं....
बाराव्या दिवशी नामकरण विधी झाला... प्रेमाच्या वेलीवर आलेल्या अंकुराला" दुर्वा " असं नाव दिल....

समाप्त:

आताच्या काळात , मूल- मुली लवमॅरेज ला प्राधान्य देतात, समाजाला झुगारून... स्वतःच्या कुटुंबाला झुगारून , स्वतःच्या मनानी लग्न करतात... अनोळखी व्यक्तीशी लग्न करण किंवा लग्नानंतर प्रेम होणं या गोष्टी वर त्यांचा विश्वासच नसतो...लव्ह मॅरेज चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही , हे प्रत्येकाच व्ययक्तीत मत असू शकत.....पण  लग्नाआधी प्रेम झालाच पाहिजे असं नाही ,लग्नानंतरही प्रेम होऊ शकत, आणि छान संसार होऊ शकतो... मी या कथेतून प्रेमाने माणूस जिंकता येतो, माणसाचं मन परिवर्तन होऊ शकत... हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ...

धन्यवाद

🎭 Series Post

View all