जुळून येती रेशीमगाठी (एक अनोखी प्रेम कथा)
भाग 7 अंतिम
आधीच्या भागात, नित्यानी चिन्मयसाठी छान सरप्राइज प्लान तयार केला होता, ती त्याला त्या ठिकाणी घेऊन जाते... दोघे खूप एन्जॉय करतात दोघेही आपल्या प्रेमाची कबुली देतात ....घरात पण सगळ्यांना बरं वाटतं या दोघांना हॅपी बघून, आता दोघाचं रुटीन सुरू झालं... चिन्मयनी ऑफिस जॉईन केलं, नित्या पण बुटीक ला जायला लागली, तीन- चार महिने असेच भरभर निघून गेले.....
आता पुढे,
नित्याला दिवस गेलेत ,तिच्या प्रेग्नेंसीबद्दल ऐकून घरात सगळे खूप खुश होतात.... तिचे लाड कौतुक सुरू होते, निर्मला आणि गायत्री छोट्या छोट्या गोष्टी पासून तिची काळजी घेतात, तिच्या खाण्यापिण्याची, डॉक्टरकडे नेण्याची सर्व व्यवस्थित काळजी घेतल्या जाते, भरभर सात महिने निघून गेले.... नित्याची गोदभराई आली...निर्मला आणि गायत्री खूप छान तयारी करतात....
पाळणा सजावट करण्यापासून ते अगदी नित्याला तयार करण्यापर्यंत गायत्रीच सगळं करते... घरातले सगळे खुश असतात... कार्यक्रम पार पडतो ...पण अचानक दुसऱ्या दिवशी नित्याची तब्बेत बिघडते... तिला ऍडमिट करावं लागतं.... डॉक्टर क्रिटिकल कंडिशन सांगतात... सिझेरियन करावं लागेल .... घरातलं पहिलच बाळ आणि हे असं झालं, सर्वांना खूप टेन्शन येत... पन निर्णय तर घ्यावा लागणार होता...सिझर झालं आणि नित्या आणि चिन्मय च्या घरी लक्ष्मी आली .....
नित्या आणि चिन्मयच्या प्रेमाच्या वेलीवर एक अंकुर आलं.... लक्ष्मीचं स्वागत ही कुंकवाच्या पावलांनी झालं....
बाराव्या दिवशी नामकरण विधी झाला... प्रेमाच्या वेलीवर आलेल्या अंकुराला" दुर्वा " असं नाव दिल....
समाप्त:
आताच्या काळात , मूल- मुली लवमॅरेज ला प्राधान्य देतात, समाजाला झुगारून... स्वतःच्या कुटुंबाला झुगारून , स्वतःच्या मनानी लग्न करतात... अनोळखी व्यक्तीशी लग्न करण किंवा लग्नानंतर प्रेम होणं या गोष्टी वर त्यांचा विश्वासच नसतो...लव्ह मॅरेज चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही , हे प्रत्येकाच व्ययक्तीत मत असू शकत.....पण लग्नाआधी प्रेम झालाच पाहिजे असं नाही ,लग्नानंतरही प्रेम होऊ शकत, आणि छान संसार होऊ शकतो... मी या कथेतून प्रेमाने माणूस जिंकता येतो, माणसाचं मन परिवर्तन होऊ शकत... हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ..... माझे या कथेचे संपूर्ण भाग तुम्हला कशे वाटले नक्की कळवा, तुमचा अभिप्राय माझ्यासाठी मोलाचा आहे...
धन्यवाद????????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा