जुळून येती रेशीमगाठी...(एक अनोखी प्रेमकथा) भाग 5

Nitya chinmay kade baghun, " bolana... re... chinmay mazyashi, i m realy sorry...

जुळून येती रेशीमगाठी...( एक अनोखी प्रेमकथा )
भाग 5 ,
आधीच्या भागात,
चिन्मय आणि नित्या उटीला फिरायला गेलेले असतात.... सगळे छान फिरून झाल्यानंतर परतीच्या दिवशी चिन्मय नित्याची बॅग आवरायला घेतो... नित्या बॉक्स वरून त्याच्यावर खुप चिडते, त्याच्यावर ओरडते.... तो तसाच रूममधून बाहेर जातो आणि चिन्मयचा एक्सीडेंट होतो.... हॉस्पिटल ला जाते तेव्हा चिन्मय शुद्धीवर नसतो जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा ती त्याला सॉरी म्हणते पण तो काहीही बोलत नाही शांत डोळे मिटून राहतो ....

आता पुढे,
नित्या चिन्मय कडे बघून,
"  बोलना ...रे ....चिन्मय माझ्याशी , आय ॲम रियली सॉरी..... बोल ना प्लीज ....तुला माहिती आहे ना माझा काही past आहे i mean होता , त्याच्या आठवणी होत्या त्या बॉक्समध्ये आणि तो बॉक्स तुझ्या हातात बघून मी पॅनिक झाले..…

" सॉरी... चिन्मय, पण मी ह्या नंतर असं नाही करणार.. प्रॉमिस... तो काही बोलणार त्याआधी डॉक्टर आले.. ते चिन्मयला चेक करतात,  नित्याकडे बघून..

" आता यांना बरं आहे ,अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज नाही आहे... तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता..."

"ok, thank you doctor,  नित्या खाली जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून येते .....

"आपल्याला जायचं आहे...."
" ह...."
ती त्याला हळूच आधार देऊन कॅब पर्यंत नेते, दोघे हॉटेलच्या रूमवर येतात.... पूर्ण दोन दिवस आराम केल्यानंतर दोघे मुंबईला परत येतात .....घरी गेल्यागेल्या आईच त्याला बिलगून रडणं सुरू होतं ,नित्या पण आईला बिलगून रडते.... तिला तिची चूक जाणवते आणि ती सगळ्यांसमोर कबूलही करते....

" कसा आहे रे माझ्या राजा, माझ्या सोन्या?.."

" मी बरा आहे ग..." मला थोडा वेळ आराम करायचा आहे.....

दोघेही ट्रॅव्हलिंग मध्ये थकले असल्यामुळे आराम करायला रूममध्ये जातात..... दुसऱ्या दिवशी सकाळी  नित्या साडी नेसून अगदी पारंपरिक वेशभूषेत खाली येते, किचन मध्ये चिन्मय साठी सूप बनवायला जाते, सूप बनवून येईपर्यंत चिन्मय जागा होतो..... राग अजून गेला नाही आहे...
" चिन्मय सूप आणलंय, हे  ब्रश घे फ्रेश होउन घे, ती बेडवर त्याला सगळं करून देते आणि मग सूप पाजुन देते.... ती त्याचा राग घालवायचा खूप प्रयत्न करते पण त्याचा राग काही जात नाही, तिचे रोजचे प्रयत्न सुरू असतात ....त्याच्यासाठी हेल्दी रेसिपी बनवते, त्याला काय हवं नको ते सगळं बघते , दिवस-रात्र त्याचा राग कसा घालवायचा याचाच विचार करत असते.... नित्याचा वाढदिवस जवळ येणार होता , सगळे वाढदिवसाच सेलिब्रेशन प्लॅनिंग करतात त्यात चिन्मय देखील सामील असतो..... वाढदिवसाचा दिवस येतो.... नित्या सकाळी उठून अंघोळ करुन पूजा वगैरे करते, सगळ्यांसाठी नाश्ता बनवते ....डायनिंग वर प्लेट तयार करून सगळ्यांना आवाज येते ....

"आई... बाबा.... या, नाश्ता रेडी आहे.... नित्याला वाटतं आल्या आल्या सगळे आपल्याला wish करतील.... ती खूप एक्सायटेड असते ....सगळे नाश्त्याला येतात, डायनिंग वर नाश्ता करतात इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात , नित्याला वाटतं की आता विश करतील....  आत्ता विश करतील पण तसं काहीच होत नाही.... ती दिवसभर सगळ्यांच्या जवळ जाऊन जाऊन गप्पा मारते या अपेक्षेने की कोणीतरी मला विश करेल, कुणाला तरी आठवेल.... पूर्ण दिवस जातो पण काही होत नाही...

संध्याकाळी नित्याच्या आईचा फोन येतो...

"हॅलो आई ,बोल ग... आता आठवण आली तुला, सकाळपासून आत्ता फोन करतेस तू मला,,,,"

" अग नित्या मी काय म्हणते, मी..ना.. इथे तुझ्या घराच्या बाजूच्या मॉलमध्ये आली आहे, तू येतेस का थोड्या वेळासाठी?.."
"अग आई...."

" ये ना नित्या प्लीज..."

" ओके...येते मी....
नित्या घराबाहेर जाते, तसेच सगळे हॉलमध्ये जमा होतात आणि नित्याच्या सरप्राईज बर्थ डे पार्टी ची प्लॅनिंग करतात, एका तासाने नित्या घरी येते... सोबत तिची आई पण असते... घरी येते ,हॉलच दार उघडते तर हॉलमध्ये सगळा अंधार असतो.... अंधार बघून...

" नित्या:  अरे घरातली सगळी मंडळी कुठे दिसत नाहीयेत?  आणि लाईटही ऑफ आहेत.....

" आई... वहिनी....ती आवाज देते, पण कुणाचाही response येत नाही.... ती थोडया समोर येते तेवढ्यात लाइट्स on होतात... फॅन सुरू होतो, वरच्या गुलाबाच्या पाकळ्या नित्याच्या अंगावर पडतात नित्या आनंदून दोन्ही हात बाजूला पसरून गोल गोल फिरते ....
सगळेजण .
हॅपी बर्थडे टू यू....
हॅपी बर्थडे टू यू ...
हॅपी बर्थडे टू यू डिअर नित्या....
हॅपी बर्थडे टू यू

चिन्मय हातात गिफ्ट घेऊन तिच्यासमोर उभा राहून तिला गुडघ्यावर वाकून" हॅपी बर्थडे माय डियर नित्या "  ,"आय लव यू " म्हणत स्माईल करतो ..... नित्या फक्त तोंडावर हात ठेवून आश्चयव्यक्त करते......एक एक करून सगळे तिला विश करत छान छान गिफ्ट देतात आणि नित्याच्या डोळ्यात पाणी येतं,....
नर्मदा:- ये येडा-बाई काय  ग...असं वाढदिवसाच्या दिवशी रडत का कुणी तर डोळे पूस आणि बसिते औषध करते करते तिला भरभरून आशीर्वाद देते तिला खूप खूप खुश होते तिच्या ध्यानी मनी नसताना तिचा बर्थडे इतका सुंदर सेलिब्रेट केल्या याचा तिला खूप आनंद होतो पुन्हा तिचे डोळे भरून येतात ......

क्रमश;



 

🎭 Series Post

View all