Oct 27, 2020
स्पर्धा

जुळून येती रेशीमगाठी...(एक अनोखी प्रेमकथा) भाग 1

Read Later
जुळून येती रेशीमगाठी...(एक अनोखी प्रेमकथा) भाग 1

आज चिन्मयच्या घरी बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो.... जनरली हा कार्यक्रम मुलीकडे होतो पण इथे जरा उलट आहे.....

सो घरी कार्यक्रम ठरलेला असतो ,बारा वाजता पाहुणेमंडळी येणार होती.... चिन्मयच्या आईने, वहिनीने सगळी तयारी करून ठेवलेली ,अगदी साफसफाई पासून ते पडदे बदलण्यात पर्यंत सगळे करून झालेले असत... मुद्दा काय तर मुलीला घर आवडायला हवं, आता राहिला खाण्यापिण्याचं कांदेपोहे नेहमीच होतात म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं ....समोसे , कचोरी, कॉफी, अप्पल ज्युस एवढे सगळा मेनू तयार झालेला होता.....

11 वाजले तरी चिन्मय महाशय झोपलेले ......

"चिन्मय उठ बाळा....उठ रे लवकर ....पाहुणे यायची वेळ झाली" नर्मदानी ( चिन्मयची आई ) आवाज देते....

त्याची रूम अत्यंत विस्कटलेली असते...

" बापरे चिन्मय, हे काय आहे? किती हा पसारा......"

" अरे मुलीकडचे येतायेत, तुझ्या रूम मध्ये जर आले ,तर हा काय पसारा दाखवणार आहेस त्यांना ....."

आईची बडबड सुरू होती पण चिन्मयची झोप काही उघडली नाही ...
नर्मदा गायत्रीला ( चिन्मयची वहिनी )ला आवाज देते "गायत्री... गायत्री... ये इकडे,

काय आई, बोलावलंत तुम्ही? गायत्री रूम मध्ये येते

नर्मदा चिन्मय कडे बोट दाखवत,

" हा बघ ,तुझा लाडला अजून उठलेला नाही.... तू आणि मंदारनी (चिन्मय चा मोठा भाऊ)  त्याला लाडवून ठेवलंय त्याला उठव आणि हा पसारा आवरून घे....

गायत्री त्याच्याजवळ जाऊन बसते ,त्याच्या डोक्यावर हात फिरवत "
"चिन्मय उठ"  ,आज सुट्टी आहे म्हणून झोपून राहणार आहेस का?

ये वहिनी, पाच मिनिटे झोपू दे ग?

" पाच मिनिट वगैरे काही नाही, लवकर उठ ....."

"मी हे सगळं आवरून घेते, तू फ्रेश हो.... पाहुणे यायची वेळ झाली आहे...."


"काय ग वहिनी, तू पण आईसारखीच करतेस....

" हो मी पण तुझी दुसरी आईच आहे... त्याचं नाक पकडत,

लबाडडडड ...चल उठ ... चिन्मय उठतो फ्रेश होतो 11:45 सगळे तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसतात, पाच मिनिटांनी दारासमोर एक भली मोठी गाडी घेऊन थांबते..... नवरा बायको आणि मुलगी असा त्रिकोणी कुटुंब उतरत....नित्याचे आई-बाबा उतरून समोर निघतात ..... आणि नित्या मागेहून उतरते ....थोडया समोर येऊन गोट्याला अडकून पडनारच तेवढ्यात चिन्मय तिला पकडतो....
ही त्यांची पहिली भेट ,दोघे एकमेकांकडे बघतात,

सॉरी... सॉरी म्हणत नित्या आत जाते, मागेमागे चिन्मय जातो...
पाहुणे आत आल्यावर,
" नमस्कार ,रमाकांत राव या या....
नलिनी वहिनी या.... बसा... मी सगळ्यांची ओळख करून देतो...
मी प्रभाकर शिंदे .. मला तर तुम्ही ओळखताच, ते एकेकाकडे बघत, ही माझी पत्नी "नर्मदा", हा माझा मुलगा "मंदार", आणि ही माझी सुन "गायत्री", हा माझा लहान मुलगा "चिन्मय", सॉफ्टवेअर इंजिनियर आहे...


"ही आमची मुलगी नित्या... फॅशन डिझायनर आहे...  रमाकांत रावांनी  त्यांच्या मुलीबद्दल सांगितलं...

बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला, सगळ्यांचं बोलणं झालं चहा नाश्ता पाणी झाला, दोन्ही घरच्यानीं आपली पसंती दर्शवली, मुला-मुलीला पण विचारण्यात आलं, दोघांनी मान हलवून होकार दिला....

प्रभाकरराव:  मुला, मुलीला जर एकांतात बोलायचं असेल तर बोलू शकता , आमची काहीच हरकत नाही.....

"हो... हो आमची पण काहीच हरकत नाही आहे....

नित्या पटकन.....

"नाही नाही, बोलायची काहीच गरज नाही आहे", सगळे तिच्या कडे आश्चर्याने बघतात, तिच्या लक्षात येत, ती गोस्ट सावरण्यासाठी

" नाही, म्हणजे मला काहीच बोलायचं नाही आहे, बाकी as you wish.... असं बोलून ती गप्प बसते...
   
प्रभाकरराव हुश...करत, चला तर मग आपण आता हे पक्क समजुया....  नर्मदा सगळ्यांच तोंड गोड करते ,लग्न जमल,  आठ दिवसानी साखरपुडा होतो, साखरपुड्यानंतर एक दिवस नित्याचा चिन्मयला फोन येतो...
"hello.. मी नित्या बोलतीय..."

नंबर save आहे माझ्याकडे.... बोलना...

"मला तुम्हाला भेटायचं होत"

ok, कुठे ..कधी...

"मी massage करते तुम्हाला ..."
नित्या massage करून venue कळवते....

दोघे बाहेर हॉटेलमध्ये भेटतात ...हाय... हेलो ...पासून सुरुवात होते ,दोघेही कमी बोलणारे असल्यामुळे ,बोलायला लवकर सुरुवात होत नाही... दहा मिनिट तर इकडेतिकडे बघण्यातच जातात ....चिन्मय बोलायला सुरुवात करतो....

" हाय.... तुला तर माहीतच आहे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे  आणि मी I Tech Solution  मध्ये जॉबला आहे...."

"हाय ... मी फॅशन डिझायनर ,माझा स्वतःचा बुटीक आहे ....

"ओह ..छान "

वेटर मेनू कार्ड घेऊन येतो

"काय घेणार तु... चहा ,कॉफी ,जूस .....

"जूस "

"ओके, दोन juice.... चिन्मय वेटर ला ऑर्डर देतो....

तुम्ही.... ती समोर बोलणार तो मधातच

"excuse me, मला चिन्मय म्हंटल तरी चालेल .....उगाच तुम्ही वगैरे म्हणू नकोस ....मीच बोलतोय तू काही बोलतच नाही आहेस.... एक विचारू का ?

"विचार ..."
"तू आनंदात नाही आहेस का?

" म्हणजे?"

" आपल लग्न जमलं याचा तुला आनंद नाही आहे क?"

"नाही तस  काही नाही", तू विषय काढलास म्हणून मी बोलते, मी खरच आनंदात नाहीये ,actually मला तुला काही सांगायचं आहे....."

हं.. बोल....

"माझे एका मुलावर प्रेम होतं, त्याचं नाव जतीन .....बोलता बोलता ती स्तब्ध झाली....

"होत ..म्हणजे?

तिच्या डोळ्यात पाणी आलं...

"he is no more...."

"what? how?

एक वर्ष आम्ही सोबत होतो....एकमेकांवर प्रेम होतं आमचं, लग्न करण्याचा विचार सुरू होता, आपापल्या घरी सांगण्याचं ठरवलं होतं......

माझ्या birthday ला त्यानी हॉटेल मध्ये मोठी पार्टी ठेवली होती .... माझ्यासाठी cake आणायला गेला, तो परतलाच नाही, आली ती त्याची deadbody....

त्याच्या  कार एक्सीडेंट झाला आणि तो मला सोडून निघून गेला ....

"sorry .....sorry,  i m extremely sorry...."

No... no , you dont ,actually i m sorry,


तू आनंदात आहेस आणि  मी माझंच घेऊन बसले ...पण तू मनाला लावून घेऊ नकोस.... मी कुणाच्या दबावाखाली वगैरे लग्न करत नाहीये... मी स्वेच्छेने तुझ्याशी लग्न करतीय.....
आणि मी आपलं नात प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करेल......

क्रमशः

Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing