जुळून येती रेशीमगाठी ( एक अनोखी प्रेमकथा )
भाग चार
आधीच्या भागात,
चिन्मय आणि नित्या उटीला फिरायला गेलेले असतात, सकाळी चिन्मय पाय मोकळे करायला गेलेला असतो
नित्याला चिन्मय कुठेच दिसत नाही म्हणून ती पॅनिक होते, चिन्मय आल्यावर त्याला hug करून खूप रडते …. चिन्मय तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करतो..... आता पुढे,
नित्या अग रडू नकोस मी इथेच आहे, पाय मोकळे करायला गेलो होतो.. तुला उठवणार होतो पण तू साखरझोपेत होतीस .... नित्या शांत होते हळूच स्वतःला चिन्मय पासून दूर करते....
" चल... चल... तयार हो.. ब्रेकफास्ट करू आणि फिरायला निघू"
दोघेही ब्रेकफास्ट झाल्यानंतर सर्वात आधी "निलगिरी पर्वत" ला जातात... निलगिरी पर्वत खूप आकर्षक आहे तिथल्या पहाडी तर मन मोहून घेतात, नित्याला पण सगळं खूप आवडतं.....त्यानंतर थोडं फिरून, खाऊन पिऊन ते "वनस्पती उद्यान" ला जातात.… वनस्पती उद्यान हा खूप मोठा बगीचा आहे इथे फळझाडे फुलझाडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींची प्रजाती आहेत, सगळं खूप छान पाहण्यासारखा आहे.... संध्याकाळपर्यंत दोघेही थकतात हॉटेलवर जाऊन आराम करतात ...दुसऱ्या दिवशी ते "झिल" ला जातात तिथे बोटिंग वगैरे करतात तोही दिवस छान जातो ....दोन-तीन दिवस पुन्हा इकडे तिकडे फिरल्यानंतर त्यांचा परत येण्याचा दिवस येतो..
चिन्मय निघायचं म्हणून लवकर फ्रेश होऊन येतो, नित्या अंघोळीला गेली असताना हा तिला मदत म्हणून तिची बॅग आवरायला घेतो तिच्या बॅगमध्ये याला बॉक्स दिसतो तो काय आहे म्हणून उघडणार तितक्यात नित्या जोरात ओरडते...
" चिन्मय, तू माझ्या बॅगला हात कसा लावलास? मला आवडत नाही कुणी माझ्या सामनाला हात लावलेला.... माझ्या सामानाला हात लावायचा नाही..."
" अगं मी मुद्दाम नाही केलं ,मी तुझी बॅग आवरायला घेतली होती ...त्यात हा बॉक्स..." तो काही बोलणार तितक्यात नित्या ..
"जस्ट shutup चिन्मय, यानंतर माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही ...."
चिन्मय खूप हर्ट होतो त्याच्या अख्ख्या आयुष्यात ह्या लँग्वेज मध्ये त्याच्याशी कुणीही बोललेलं नव्हतं ...त्याला हर्ड झाल्यामुळे तो रूमच्या बाहेर निघून जातो ... विचारांच्या गोंधळात तो चालत चालत रस्त्यावर आला हेही त्याला कळलं नाही. रस्त्यावर चालत तर होता पण मन थाऱ्यावर नव्हतं... तिकडे नित्या खूप वेळ झाला म्हणून चिन्मयला फोन करते पण तो फोन उचलत नाही... थोड्या वेळाने नित्याच्या फोन वाजतो बघते तर चिन्मय चा कॉल
"हॅलो... हॅलो... चिन्मय कुठे आहेस तू ? किती वेळची फोन करते मी ...फोनही उचलत नाही आहेस..."
"हॅलो... समोरून एक अनोळखी आवाज ऐकून..
" नित्या : कोण बोलताय तुम्ही?
" हा ज्यांचा मोबाईल आहे त्यांच्या एक्सीडेंट झालाय त्यांना विजया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय तुम्ही लवकर या " असं म्हणून तो माणूस फोन ठेवतो ....इकडे मात्र नित्या हे ऐकून बिथरते... तशीच धावत पळत हॉस्पिटलला जाते तिथे गेल्यावर..
" एक्सक्युज मी, इथे कोणी चिन्मय शिंदे नावाच्या व्यक्तीला ऍडमिट केलंय का?"
"एक मिनिट चेक करते, हो ...वरच्या फ्लोअरला रूम नंबर 4...
" ओके, थँक्यू.... ती आत जाते ....तेव्हा चिन्मय बेहोश असतो त्याच्या डोक्याला बँडेज केलेलं असतं हाताला पायाला खर्चटलेल असतं....नित्या तिथे उभ्या असलेल्या नर्सला विचारते,
" सिस्टर, हा शुद्धीवर कधी येईल....
" दोन-तीन तास लागतील, त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे थोडं ब्लीडिंग झालाय त्यांना अजून तीन दिवस येथे ठेवण्यात येईल..."
" ओके.."
नित्याला स्वतःचा खूप राग येतो, तिला जाणवत हे सगळं तिच्यामुळे घडलं पण आत्ता घरी काय सांगायचं या विचाराने ती गोंधळते तिला आणखी रडू येते ती गायत्रीला फोन करते ....
"हॅलो... हॅलो वहिनी.."
" हा बोल नित्या, काय ग निघालात तुम्ही?
"नाही वहिनी, आम्ही दोन-तीन दिवसांनी येणार आहोत.... का गं काय झालं तुमची तर आजची फ्लाईट होती ना?
नित्याला अगदी रडूच येत....
गायत्री : नित्या काय झालं? अग रडतेस का? चिन्मय काही बोलला का तुला?.... अग बोल ना..."
" वहिनी चिन्मयचा एक्सीडेंट झालाय....."
" नित्या, तू हे काय बोलतेस... कसा आहे चिन्मय.…. कुठे लागलंय त्याला ,कसा झाला...."
" सध्या शुद्धीवर नाही आहे डॉक्टर म्हणाले दोन तीन तासात शुद्ध येईल त्याला ...."
"नित्या कसं झालं हे सगळं.....?
" वहिनी, माझीच चूक आहे... मी खूप बोलले त्याला म्हणून तो हॉटेल मधून निघून गेला आणि एका गाडीने त्याला टक्कर दिली.... मी काय करू मला समजत नाही आहे.... माझ्यात आईला सांगण्याची हिम्मत नव्हती म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्ही सांगाल का आईला प्लीज.....
" नित्या अग धर्मसंकटात टाकते आहेस तू मला, मी आईला कसं सांगू ....आईला तर धक्काच बसेल... बरं तू फोन ठेव , चिन्मय ची काळजी घे आणि वेळो वेळी मला फोन करून सांगत जा .....मी इकडचं बघते... गायत्री हॉल मध्ये जाऊन..
" आई... बाबा.. आई..."
" काय झालं गायत्री, का एवढयानी हाक मारतेस ?'
"आई , नित्याचा फोन आला होता...
"काय म्हणते, निघालेत का ते? आज निघणार होते ना...."
"आई चिन्मयचा accident झालाय..." नर्मदा च्या हातून पातेलं खाली पडतं ....आई सावरा स्वतःला, तो बरा आहे आता बेशुद्ध आहे दोन तीन तासात शुद्धीवर येईल असं सांगत होती .नर्मदाचे रडू रडू हाल बेहाल झाले ...ति नित्याला फोन करते,
" नित्या बाळा,कसं झालं हे सगळं?.... नित्या सगळं सांगते ,ती खूप रडते...
"आई, मला माफ करा, चिन्मयचा accident माझ्यामुळे झाला...."
"नाही ग, असं कुणामुळे काही होत नाही, ज्यावेळी जे व्हायचं ते होतच..... तू स्वतःला दोष देऊ नकोस...
"आता रडू नकोस बाळा, काळजी घे..."
"आई तुम्ही पण काळजी करू नका.... चिन्मय लवकर बरा होईल....बाबांना पण सांगा... मी ठेवते आता...
दोन-तीन तासानंतर चिन्मयला शुद्ध येते, नित्याचं लक्ष जातं ,ती चिन्मय जवळ जाऊन,
" चिन्मय, I m so sorry.... माझ्यामुळे हे सगळं झालं....
चिन्मय मान वळवतो, ही त्याच्या गालाला हात लावून,
" चिन्मय बोलणा रे माझ्यासोबत,.... चिन्मय प्लीज बोल माझ्यासोबत..... चिन्मय काहीच रिस्पॉन्स देत नाही....
तो शांत डोळे मिटतो .....
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा