Oct 27, 2020
स्पर्धा

जुळून येती रेशीमगाठी...( एक अनोखी प्रेमकथा ) भाग 2

Read Later
जुळून येती रेशीमगाठी...( एक अनोखी प्रेमकथा ) भाग 2

जुळून येती रेशीमगाठी ( एक अनोखी प्रेमकथा )

भाग2
आधीच्या भागात,
चिन्मय आणि नित्याच लग्न ठरतं, नित्या तिच्या भुतकाळाबद्दल म्हणजे तीच पाहिलं प्रेम जतीन बद्दल सांगते, तो आता हयात नाही.....चिन्मय तिला समजून घेतो, नित्या पण सांगते की कुणाच्या दबावाखाली लग्न करत नाही आहे, ती स्वइच्छेने करतीये....

आता पुढे,

पंधरा दिवसानंतरची लग्नाची तारीख ठरते,या पंधरा दिवसात त्यांचं जास्त काही भेटण वगैरे होत नाही,,  लग्नाची तयारी छान चाललेली असते......नवरामुलाचे कपडे, नवरीमुलीचे कपडे, दागदागिने सगळी खरेदी झाली, नित्याचे कपडे  सगळे तिच्या पसंदीने घेतले.....

लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता तशी तशी नित्याची धडधड वाढत होती, म्हणजे तिच्या मनात विचार यायचा .. आपण नीट निभावून घेऊ की नाही, आपल्या जमेल की नाही.....तिने चिन्मयला फोन केला....

"hello, चिन्मय.....मी नित्या बोलतीय ...."

"ह, बोल ग, तुझा no. आहे माझ्याकडे सेव..."

"आपण भेटू शकतो का थोड्यावेळासाठी?"

तो थोड्या विचार करून... "ok, संध्याकाळी भेटू" coffee शॉप मध्ये...

ok by...
by....


तो अड्रेस massage करतो...

संध्याकाळी दोघे भेटतात...
hi...
hello... बस ना..."काय झालं ,काही प्रॉब्लेम झालाय का?"

नाही, प्रॉब्लेम असा काही नाही ..आता चार दिवसावर आपलं लग्न आलय ना, मला खूप भीती वाटतेय...

" भिती?"
"भिती कसली?"
अंग मी बरा आहे, मला घाबरण्याची गरज नाहीये... तो हसतो....

" तसं नाही ,जेव्हा मी तुझ्या घरी येईल, सगळं नवीन असेल ना ....मला सगळ्यांशी जुळवून नाही घेता आलं तर, मला adjust करता नाही आल तर, मला याचीच भीती वाटते......"

dont worry, नित्या ,एवढा विचार करण्याची गरज नाही, माझी फॅमिली खूप छान आहे, सगळे तुला समजून घेतील.... तो नित्याला समजावतो आणि निघतो ......

दोन दिवस निघून जातात... मेहंदी, संगीत ,हळद,मंडप सगळ्या विधी पार पडतात, लग्नाचा दिवस उजाडतो.... खूप साध्या पद्धतीने कमी लोकांत, त्या दोघांचं लग्न होतं.... सप्तपदी मध्ये नित्यानी  लुगडं आणि चिन्मयनी धोतर घातलेले असते ,दोघेही खूप छान दिसतात ...अगदी "लक्ष्मीनारायणाचा जोडा" सगळे विधी पार पडतात गृहप्रवेश होते..... गृहप्रवेशानंतर अंगठी शोधण्याचा कार्यक्रम होतो..... दोघांना समोरासमोर बसवतात, मोठ्या पातेला पाण्यानी, गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला असतो, दोघेही पातेल्यात हाथ घालतात, अंगढी शोधता शोधता दोघांचे हाथ एकमेकांना स्पर्शतात,  ती झटकन हाथ बाहेर काढते,त्याच्या लक्षात येते पण तो गप्प असतो...

सगळे विधी पार पाडतात, सगळे आपापल्या रूममध्ये जातात, चिन्मय आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो, मित्र त्याला  त्याच्या पहिल्या रात्री बदल चिडवत असतात, गायत्री नित्याला तिच्या बेडरूम पर्यंत नेऊन देते ,नित्या दार उघडते, बघते तर समोर संपूर्ण रूम  गुलाबाच्या फुलांनी आणि लाल रंगाच्या heart shape फुग्यांनी सजवलेल असत.....

ती चेंज करून खाली चटई घालून झोपते, चिन्मय येतो तेव्हा ,बघतो तर काय, ही खाली झोपलेली..... चिन्मयला थोडं वाईट वाटत, त्याची काही स्वप्न असतील पहिल्या रात्री बदल,  तो थोडा नर्व्हस होतो,एकाद तास चेअर वर बसून राहतो आणि मग चेंज करून झोपतो.....

सकाळी झोप उघडते ती दारावरची थाप एकून , चिन्मय झोपलेला असतो, कसातरी उठून डोळे चोळतचोळत दार उघडतो...

गायत्री: अरे चिन्मय, ती समोर काही बोलणार तीच लक्ष नित्या कडे जात, समोरचे चित्र बघून गायत्री  शॉक होते.... गायत्रीच काय तर तिच्या जागी दुसरी कुणी असती तरी तेच झालं असतं ......पहिल्याच रात्री नवऱ्यामुलीला असं खाली चटई वर बघून कोणालाही धक्का बसेल....


"वहिनी ये ना ...."अग ..... तो थोडा सावरत, अग तिला ना रात्री बरोबर झोप येत नव्हती म्हणून ती खाली बसून पुस्तक वाचत बसली होती आणि मग तशीच तिला झोप लागली असेल .....

" तू कशासाठी आली होतीस?"

ती थोडी नर्वस होऊन, तुम्हा दोघांना उठवायला आले होते.... तिला उठव आणि दोघेही तयार होऊन खाली या, हळद उतरवण्याचा कार्यक्रम आहे.....

" हो येतो आम्ही, वहिनी एक मिनिट,, वहिनी प्लीज तू हे सगळं कोणाला सांगू नकोस ....प्लीज ....

ती होकाराची मान हालवते आणि जाते.....

चिन्मय : नित्या उठ, नित्या, चिन्मय तिला उठवायला हाथ जवळ नेतो आणि पुन्हा दूर करतो.....

"नित्या उठ, तो पुनः आवाज देतो, ती उठते....

आपल्याला  बाहेर बोलावलंय, हळद उतरवायची आहे, मग पूजा आहे....

दोघे खाली येतात....पूर्वा ( चिन्मयची बहीण ) नित्याला गमतीने चिडवते..... आल्या आमच्या वहिनी बाई... या.. या.. सगळे त्यांना खूप चिडवतात.... हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो....

नर्मदा:  नित्या आंघोळ करून घे आणि लगेच तयार होऊन ये ...आता थोडया वेळानी पूजा सुरू होईल, तू तयार होऊन ये .... दोघेही तयार होऊन येतात, पूजा वगैरे सगळे होते... नित्याचे आई-बाबा आलेले असतात ......


नलिनी:  नित्या बेटा, सांभाळून घे  ...आता हेच तुझं घर आहे,  ही सर्व माणसं खूप चांगली आहेत, तू सांभाळून घे, चिडचिड वगैरे करायची नाही ... हे सासर आहे तुझं, माहेर नाही ...हे विसरू नकोस ,,आम्ही निघतो, काळजी घे......

सगळे पाहुणे जातात आता दररोजचा नित्यक्रम सुरू झाला,, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नित्या किचनमध्ये आली..... गायत्री आणि नर्मदा  चहा, नाश्त्याच बघत होत्या.....

"आई मी काही करू का?"

"नाही बाळा, तू बस आल्याआल्या कामाला लागू नकोस..... तुला सवय नाही आहे ना .....आम्ही करतो...."

"नाही आई, मी करते ना काहीतरी,"

गायत्री: "बस ग नित्या, आता जेवढे लाड करायचेत करून घे ,मग कोणी लाड करत नाही..."

नर्मदा: ये काय ग लबाड....मी तुझे लाड करत नाही ....

"करता हो आई, गंमत केली....

चिन्मय तयार होऊन येतो...

गायत्री : अरे हे काय, तू कुठे निघालास....

"ऑफिसला चाललोय वहिनी"

" अरे पण तू सुट्ट्या काढलयास ना ...."

"नाही वहिणी, सुट्ट्या मला पुढच्या महिन्यात मिळाल्यात,  या महिन्यात मला एक प्रोजेक्ट कम्प्लीट करायच आहे....

"चल मी निघतो ..."

आई डबा भरून देते, चिन्मय बाहेर जाऊन बाईक काढून निघणार तेवढ्यात  नित्या बाहेर येते...
चिन्मय चेहऱ्यावर स्माईल आणत नित्याला by करतो..

नित्या:  by,  लवकर येशील please ....

नित्याच्या "लवकर येशील" या शब्दाने चिन्मय भारावला... आणि तोही स्मितहास्य करून निघाला, नित्या दारातून त्याला हात हलवत बाय करते..... 

त्यानंतर रूम मध्ये येते, आपली बॅग उघडते, बॅगमध्ये तिचा फेवरेट  बॉक्स असतो, त्यात तिच्या जुन्या आठवणी असतात..... बॉक्स मधले सामान बघून नित्या जुन्या आठवणीत रमली.....

क्रमश:

Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing