Mar 01, 2024
प्रेम

जुळून येती रेशीमगाठी... भाग 4

Read Later
जुळून येती रेशीमगाठी... भाग 4

जुळून येती रेशीमगाठी...भाग 4
आधीच्या भागात,
चिन्मय आणि नित्या उटीला फिरायला गेलेले असतात, सकाळी चिन्मय पाय मोकळे करायला गेलेला असतो
नित्याला चिन्मय कुठेच दिसत नाही म्हणून ती पॅनिक होते, चिन्मय आल्यावर त्याला hug करून खूप रडते …. चिन्मय तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करतो.....

आता पुढे,

नित्या अग रडू नकोस मी इथेच आहे, पाय मोकळे करायला गेलो होतो.. तुला उठवणार होतो पण तू साखरझोपेत होतीस .... नित्या शांत होते हळूच स्वतःला चिन्मय पासून दूर करते....

" चल... चल... तयार हो.. ब्रेकफास्ट करू आणि फिरायला निघू"
दोघेही ब्रेकफास्ट झाल्यानंतर सर्वात आधी "निलगिरी पर्वत" ला जातात... निलगिरी पर्वत खूप आकर्षक आहे तिथल्या पहाडी तर मन मोहून घेतात, नित्याला पण सगळं खूप आवडतं.....त्यानंतर थोडं फिरून, खाऊन पिऊन ते "वनस्पती उद्यान" ला जातात.… वनस्पती उद्यान हा खूप मोठा बगीचा आहे इथे फळझाडे फुलझाडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींची प्रजाती आहेत, सगळं खूप छान पाहण्यासारखा आहे.... संध्याकाळपर्यंत दोघेही थकतात हॉटेलवर जाऊन आराम करतात ...दुसऱ्या दिवशी ते "झिल" ला जातात तिथे बोटिंग वगैरे करतात तोही दिवस छान जातो ....दोन-तीन दिवस पुन्हा इकडे तिकडे फिरल्यानंतर त्यांचा परत येण्याचा दिवस येतो..
चिन्मय निघायचं म्हणून लवकर फ्रेश होऊन येतो, नित्या अंघोळीला गेली असताना हा तिला मदत म्हणून तिची बॅग आवरायला घेतो तिच्या बॅगमध्ये याला बॉक्स दिसतो तो काय आहे म्हणून उघडणार तितक्यात नित्या जोरात ओरडते...

" चिन्मय, तू माझ्या बॅगला हात कसा लावलास? मला आवडत नाही कुणी माझ्या सामनाला हात लावलेला.... माझ्या सामानाला हात लावायचा नाही..."

" अगं मी मुद्दाम नाही केलं ,मी तुझी बॅग आवरायला घेतली होती ...त्यात हा बॉक्स..." तो काही बोलणार तितक्यात नित्या ..

"जस्ट  shutup चिन्मय, यानंतर माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही ...."
चिन्मय खूप हर्ट होतो त्याच्या अख्ख्या आयुष्यात ह्या लँग्वेज मध्ये त्याच्याशी कुणीही बोललेलं नव्हतं ...त्याला हर्ड झाल्यामुळे तो रूमच्या बाहेर निघून जातो ... विचारांच्या गोंधळात तो चालत चालत रस्त्यावर आला हेही त्याला कळलं नाही. रस्त्यावर चालत तर होता पण मन थाऱ्यावर नव्हतं... तिकडे नित्या खूप वेळ झाला म्हणून चिन्मयला फोन करते पण तो फोन उचलत नाही... थोड्या वेळाने नित्याच्या फोन वाजतो बघते तर चिन्मय चा कॉल

"हॅलो... हॅलो... चिन्मय कुठे आहेस तू ? किती वेळची फोन करते मी ...फोनही उचलत नाही आहेस..."

"हॅलो... समोरून एक अनोळखी आवाज ऐकून..
" नित्या : कोण बोलताय तुम्ही?
" हा ज्यांचा मोबाईल आहे त्यांच्या एक्सीडेंट झालाय त्यांना विजया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय तुम्ही लवकर या " असं म्हणून तो माणूस फोन ठेवतो ....इकडे मात्र नित्या हे ऐकून बिथरते... तशीच धावत पळत हॉस्पिटलला जाते तिथे गेल्यावर..
" एक्सक्युज मी, इथे कोणी चिन्मय शिंदे नावाच्या व्यक्तीला ऍडमिट केलंय का?"
"एक मिनिट चेक करते, हो ...वरच्या फ्लोअरला रूम नंबर 4...

" ओके, थँक्यू.... ती आत जाते ....तेव्हा चिन्मय बेहोश असतो त्याच्या डोक्याला बँडेज केलेलं असतं हाताला पायाला खर्चटलेल असतं....नित्या तिथे उभ्या असलेल्या नर्सला विचारते,
" सिस्टर, हा शुद्धीवर कधी येईल....

" दोन-तीन तास लागतील, त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे थोडं ब्लीडिंग झालाय त्यांना अजून तीन दिवस येथे ठेवण्यात येईल..."
" ओके.."

नित्याला स्वतःचा खूप राग येतो, तिला जाणवत हे सगळं तिच्यामुळे घडलं पण आत्ता घरी काय सांगायचं या विचाराने ती गोंधळते तिला आणखी रडू येते ती गायत्रीला फोन करते ....
"हॅलो... हॅलो वहिनी.."

" हा बोल नित्या, काय ग निघालात  तुम्ही?

"नाही वहिनी, आम्ही दोन-तीन दिवसांनी येणार आहोत.... का गं काय झालं तुमची तर आजची फ्लाईट होती ना?
नित्याला अगदी रडूच येत....

गायत्री : नित्या काय झालं? अग रडतेस का? चिन्मय काही बोलला का तुला?.... अग बोल ना..."

" वहिनी चिन्मयचा एक्सीडेंट झालाय....."

" नित्या, तू हे काय बोलतेस... कसा आहे चिन्मय.…. कुठे लागलंय  त्याला ,कसा झाला...."

" सध्या शुद्धीवर नाही आहे डॉक्टर म्हणाले दोन तीन तासात शुद्ध येईल त्याला ...."

"नित्या कसं झालं हे सगळं.....?

" वहिनी, माझीच चूक आहे... मी खूप बोलले त्याला म्हणून तो हॉटेल मधून निघून गेला आणि एका गाडीने त्याला टक्कर दिली.... मी काय करू मला समजत नाही आहे.... माझ्यात आईला सांगण्याची हिम्मत नव्हती म्हणून मी तुम्हाला फोन केला तुम्ही सांगाल का आईला प्लीज.....

" नित्या अग धर्मसंकटात टाकते आहेस तू मला, मी आईला कसं सांगू ....आईला तर धक्काच बसेल... बरं तू फोन ठेव , चिन्मय ची काळजी घे आणि वेळो वेळी मला फोन करून सांगत जा .....मी इकडचं बघते... गायत्री हॉल मध्ये जाऊन..
" आई... बाबा.. आई..."

" काय झालं गायत्री, का एवढयानी  हाक मारतेस ?'

"आई , नित्याचा फोन आला होता...

"काय म्हणते, निघालेत का ते? आज निघणार होते ना...."

"आई चिन्मयचा accident  झालाय..." नर्मदा च्या हातून पातेलं खाली पडतं ....आई सावरा स्वतःला, तो बरा आहे आता बेशुद्ध आहे दोन तीन तासात शुद्धीवर येईल असं सांगत होती    .नर्मदाचे रडू रडू हाल बेहाल झाले  ...ति नित्याला फोन करते,

" नित्या बाळा,कसं झालं हे सगळं?.... नित्या  सगळं सांगते ,ती खूप रडते...

"आई, मला माफ करा, चिन्मयचा accident माझ्यामुळे झाला...."

"नाही ग, असं कुणामुळे काही होत नाही, ज्यावेळी जे व्हायचं ते होतच..... तू स्वतःला दोष देऊ नकोस...

"आता रडू नकोस बाळा, काळजी घे..."

"आई  तुम्ही पण काळजी करू नका.... चिन्मय लवकर बरा होईल....बाबांना पण सांगा... मी ठेवते आता...

दोन-तीन तासानंतर चिन्मयला शुद्ध येते,  नित्याचं लक्ष जातं ,ती चिन्मय जवळ जाऊन,

" चिन्मय, I m so sorry.... माझ्यामुळे हे सगळं झालं....

चिन्मय मान वळवतो,  ही त्याच्या गालाला हात लावून,
" चिन्मय बोलणा रे माझ्यासोबत,.... चिन्मय प्लीज बोल माझ्यासोबत..... चिन्मय काहीच रिस्पॉन्स देत नाही....
तो शांत डोळे मिटतो .....


नित्या चिन्मय कडे बघून,
"  बोलना ...रे ....चिन्मय माझ्याशी , आय ॲम रियली सॉरी..... बोल ना प्लीज ....तुला माहिती आहे ना माझा काही past आहे i mean होता , त्याच्या आठवणी होत्या त्या बॉक्समध्ये आणि तो बॉक्स तुझ्या हातात बघून मी पॅनिक झाले..…

" सॉरी... चिन्मय, पण मी ह्या नंतर असं नाही करणार.. प्रॉमिस... तो काही बोलणार त्याआधी डॉक्टर आले.. ते चिन्मयला चेक करतात,  नित्याकडे बघून..

" आता यांना बरं आहे ,अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज नाही आहे... तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता..."

"ok, thank you doctor,  नित्या खाली जाऊन सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून येते .....

"आपल्याला जायचं आहे...."
" ह...."
ती त्याला हळूच आधार देऊन कॅब पर्यंत नेते, दोघे हॉटेलच्या रूमवर येतात.... पूर्ण दोन दिवस आराम केल्यानंतर दोघे मुंबईला परत येतात .....घरी गेल्यागेल्या आईच त्याला बिलगून रडणं सुरू होतं ,नित्या पण आईला बिलगून रडते.... तिला तिची चूक जाणवते आणि ती सगळ्यांसमोर कबूलही करते....

" कसा आहे रे माझ्या राजा, माझ्या सोन्या?.."

" मी बरा आहे ग..." मला थोडा वेळ आराम करायचा आहे.....

दोघेही ट्रॅव्हलिंग मध्ये थकले असल्यामुळे आराम करायला रूममध्ये जातात..... दुसऱ्या दिवशी सकाळी  नित्या साडी नेसून अगदी पारंपरिक वेशभूषेत खाली येते, किचन मध्ये चिन्मय साठी सूप बनवायला जाते, सूप बनवून येईपर्यंत चिन्मय जागा होतो..... राग अजून गेला नाही आहे...
" चिन्मय सूप आणलंय, हे  ब्रश घे फ्रेश होउन घे, ती बेडवर त्याला सगळं करून देते आणि मग सूप पाजुन देते.... ती त्याचा राग घालवायचा खूप प्रयत्न करते पण त्याचा राग काही जात नाही, तिचे रोजचे प्रयत्न सुरू असतात ....त्याच्यासाठी हेल्दी रेसिपी बनवते, त्याला काय हवं नको ते सगळं बघते , दिवस-रात्र त्याचा राग कसा घालवायचा याचाच विचार करत असते.... नित्याचा वाढदिवस जवळ येणार होता , सगळे वाढदिवसाच सेलिब्रेशन प्लॅनिंग करतात त्यात चिन्मय देखील सामील असतो..... वाढदिवसाचा दिवस येतो.... नित्या सकाळी उठून अंघोळ करुन पूजा वगैरे करते, सगळ्यांसाठी नाश्ता बनवते ....डायनिंग वर प्लेट तयार करून सगळ्यांना आवाज येते ....

"आई... बाबा.... या, नाश्ता रेडी आहे.... नित्याला वाटतं आल्या आल्या सगळे आपल्याला wish करतील.... ती खूप एक्सायटेड असते ....सगळे नाश्त्याला येतात, डायनिंग वर नाश्ता करतात इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात , नित्याला वाटतं की आता विश करतील....  आत्ता विश करतील पण तसं काहीच होत नाही.... ती दिवसभर सगळ्यांच्या जवळ जाऊन जाऊन गप्पा मारते या अपेक्षेने की कोणीतरी मला विश करेल, कुणाला तरी आठवेल.... पूर्ण दिवस जातो पण काही होत नाही...

संध्याकाळी नित्याच्या आईचा फोन येतो...

"हॅलो आई ,बोल ग... आता आठवण आली तुला, सकाळपासून आत्ता फोन करतेस तू मला,,,,"

" अग नित्या मी काय म्हणते, मी..ना.. इथे तुझ्या घराच्या बाजूच्या मॉलमध्ये आली आहे, तू येतेस का थोड्या वेळासाठी?.."
"अग आई...."

" ये ना नित्या प्लीज..."

" ओके...येते मी....
नित्या घराबाहेर जाते, तसेच सगळे हॉलमध्ये जमा होतात आणि नित्याच्या सरप्राईज बर्थ डे पार्टी ची प्लॅनिंग करतात, एका तासाने नित्या घरी येते... सोबत तिची आई पण असते... घरी येते ,हॉलच दार उघडते तर हॉलमध्ये सगळा अंधार असतो.... अंधार बघून...

" नित्या:  अरे घरातली सगळी मंडळी कुठे दिसत नाहीयेत?  आणि लाईटही ऑफ आहेत.....

" आई... वहिनी....ती आवाज देते, पण कुणाचाही response येत नाही.... ती थोडया समोर येते तेवढ्यात लाइट्स on होतात... फॅन सुरू होतो, वरच्या गुलाबाच्या पाकळ्या नित्याच्या अंगावर पडतात नित्या आनंदून दोन्ही हात बाजूला पसरून गोल गोल फिरते ....
सगळेजण .
हॅपी बर्थडे टू यू....
हॅपी बर्थडे टू यू ...
हॅपी बर्थडे टू यू डिअर नित्या....
हॅपी बर्थडे टू यू

चिन्मय हातात गिफ्ट घेऊन तिच्यासमोर उभा राहून तिला गुडघ्यावर वाकून" हॅपी बर्थडे माय डियर नित्या "  ,"आय लव यू " म्हणत स्माईल करतो ..... नित्या फक्त तोंडावर हात ठेवून आश्चयव्यक्त करते......एक एक करून सगळे तिला विश करत छान छान गिफ्ट देतात आणि नित्याच्या डोळ्यात पाणी येतं,....
नर्मदा:- ये येडा-बाई काय  ग...असं वाढदिवसाच्या दिवशी रडत का कुणी तर डोळे पूस आणि बसिते औषध करते करते तिला भरभरून आशीर्वाद देते तिला खूप खूप खुश होते तिच्या ध्यानी मनी नसताना तिचा बर्थडे इतका सुंदर सेलिब्रेट केल्या याचा तिला खूप आनंद होतो पुन्हा तिचे डोळे भरून येतात ......

क्रमश;

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//