जुळून येती रेशीमगाठी... भाग 3

Ek anokhi premkatha

जुळून येती रेशीमगाठी...भाग 3

आधीच्या भागात ,
चिन्मयचा नित्यक्रम सुरू झाला ,त्याच्या ऑफिसच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्यामुळे त्याला ऑफिसला जावं लागलं .....तो ऑफिसला निघतो ....नित्या त्याला बाय करून रूम मध्ये जाते .....तिच्या सामान तिला तिचा फेवरेट बॉक्स दिसतो, त्या बॉक्समध्ये तिच्या काही जुन्या आठवणी असतात, ती जुन्या आठवणीत रमते.....

आता पुढे,

नित्या रूममध्ये तिच्या जुन्या आठवणीत रमलेली असते, तितक्याच गायत्री रूम देते आणि तीच्या खांद्यावर हात ठेवत.....
" नित्या....."

नित्या लपून डोळ्यात आलेले अश्रू पुसते, ते गायत्रीच्या लक्षात येत....

"काय ग नित्या, काय झालंय ?आईची आठवण आली का?

" नाही वहिनी, काही नाही.... तुम्ही बसा ना.... तुम्ही कशासाठी आला होतात ?

"आईनी तुला आवाज दिला..... मी जाते, तू ये...." थोड्यावेळाने , नित्या नर्मदाच्या रूमच्या बाहेर उभी राहून

"मी आत येऊ का ?"

"ये ....ये.... नित्या, बस बाळा ... अग बस.. संकोच करू नकोस ..."

"ती थोडी नर्वस होऊन ,आई काय झालं ?"

"काही नाही ग,मी सहजच बोलावलंय, मी काय म्हणत होते आजकालच्या तुम्हा मुलींना ड्रेसेस ची सवय झालेली असते हे साडी वैगेरे तुला झेपत नसेल ना..... मी काय म्हणते बाळा तू ड्रेस घातले तरी चालेल......"

" आई पण, घरात बाबा वगैरे.......ती बोलता बोलता थांबते...."

" कुणालाही काही प्रॉब्लेम होणार नाही .....गायत्री घालतेच की हो ...."

"हो आई..."
"काय ग ,चेहरा का असा दिसतोय? आईची आठवण आली का?"
" नाही नाही' असं काही नाही ....आई मी जाऊ?"
चिन्मय संध्याकाळी ऑफिस मधून येतो ,खूप खुश असतो..? आल्याआल्या आईला हात धरून नाचवायला लागतो ...
"आई... आई... आई... मी खूप खुश आहे...."

" अरे.. हो.. हो.. थांब जरा ,काय झालं ?

"आई ...आई... माझं प्रमोशन झालं... जे प्रमोशन प्रतीकला मिळणार होत ,ते मला मिळालय..... आय एम सो हॅपी.... आणि आता मी सुट्ट्या घेऊ शकतो, सरांनी ते प्रोजेक्ट दुसऱ्याला करायला दिले बॉस म्हणतो सुट्टी हवी असेल तर तू सुट्टी घेऊ शकतोस ...""

"आई.?. आई... मी खूप खुश आहे ?नित्या कुठे आहे?

" ती रूम मध्ये आहे...."

" नित्या ....नित्या... लवकर बाहेर ये ....नित्या रूमचा दार उघडते... चिन्मय लक्ष जातं, चिन्मय बघतच राहतो नित्यानी ड्रेस घातलेला असतो, साईडला उभ्या असलेल्या आई आणि वहिनी गळा खवखवुन...
"अ... अ... अ... हे ऐकल्यावर चिन्मय भानावर येतो ....आई नित्याला जवळ बोलावून..

" छान दिसतेस ह बाळा...  तुझ्याच पायगुणाने आज चिन्मयच प्रोमोशन झालाय....."

चिन्मय नित्या कडे बघून ,"माझं प्रमोशन झालंय...."

" अरे वा... काँग्रॅजुलेशन...."

" थँक यु  .. थँक यु सो मच.....
आता मला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत.... गायत्री: चिन्मय छान झालं की, तुम्हाला कुठेतरी फिरायला जायला मिळेल ,चिन्मय तू आज काय ते प्लॅन कर आणि ठरवून टाक सगळं.....

चिन्मय खुश होतो, पण नित्याच्या चेहऱ्यावर तेवढे भाव नसतात.... रात्री बेडरूममध्ये चिन्मय नित्याला,
" आपण फिरायला गेलेलं तुला आवडणार नाही आहे का?"

" नाही, तसं काही नाही आहे....."

" नाही तुला नसेल जायचं तर तसं सांग, मी नाही ठरवत.....  कसा आहे ना आपण मनानी एखादी गोष्ट केली तर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो ......आपण फिरायला जायचो आणि तुझं मनच लागनार नसेल तर आपल्या जाण्याला काही अर्थ नाही......"

" नाही तसं नाही, आपण जायचं.... तू ठरव...."

मी ठरव वगैरे  काही नाही, आपल्याला दोघांनी मिळून ठरवायचं आहे.....

" ओके..."
" ओके...." त्यांच्य जवळजवळ अर्ध्या रात्रीपर्यंत डिस्कशन चाललेलं असतं, सकाळी उठल्यावर चिन्मय  सगळ्यात पहिले हॉलमध्ये जाऊन सगळ्यांना आवाज देतो.....
" आई-बाबा ....दादा ...वहिनी....या सर्वजण हॉलमध्ये, मला काही सांगायचं आहे.... या लवकर.... एक एक करत सर्व जमा होतात आणि नित्या सुद्धा खाली आलेली असते.... "

नर्मदा:  बापरे ; अरे किती हा आरडाओरडा.... काय झालं?
" आई-बाबा, आम्ही ठरवलं आम्ही फिरायला जातोय... आणि तेही उटीला"....
"उटी " छानच आहे की ,कधी निघालात...
" आई ...आई.. अजून वेळ आहे ,तीन दिवसानंतर ची फ्लाइट मी बुक करणार आहे तोवर आम्ही आमची जाण्याची तयारी करतो .....

गायत्री : काय ग नित्या ,खुश ना ....ती फक्त होकाराची मान हालवते, दुपारी दोघे खरेदीला निघतात ,संध्याकाळी खरेदी उरकून घरी येतात..... नित्या आईला फोन करते "हॅलो आई...."
" अगं आई मी नित्या  बोलतीय...."

" बोल बेटा,कशी आहेस.....

" आई मी बरी आहे, तू आणि बाबा कसे आहात?

" आम्ही बरे आहोत, तुझं काय चाललंय, सर्व ठीक आहे ना....."

" हो ,आई इथे सर्व ठीक चाललंय, आई चिन्मयच प्रमोशन झाल... त्याच्या कॅन्सल झालेल्या सुट्ट्या पुन्हा मिळाल्या... आई आम्ही दोन दिवसानंतर फिरायला जातोय..."

" छान गोष्ट आहे, तुझ्या बाबांना खूप आनंद होईल हे ऐकून...."

" आई मी ठेवते आता, नंतर फोन करेल ....

रात्री चिन्मय रूम मध्ये येतो तेव्हा नित्या रूम मध्ये बेडवर लेटलेली असते... हा लाईट स्विच ऑफ करतो तिच्या जवळ जातो तिच्या केसांवरून हात फिरवत तो थोडा अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण नित्या स्वतःला दूर सारते...... चिन्मय चा प्रयत्न फसतो, पण ठीक आहे त्यानीही तिला वेळ देण्याचं ठरवलं होतंच त्यामुळे तो heart नाही झाला.... सगळी पॅकिंग झाली, फिरायला जाण्याचा दिवस आला ,सकाळी सातची फ्लाईट असते...... घरून निघण्याआधीचे नर्मदाचे instruction...
"बरोबर जा रे , काळजी घ्या..., काळजी घे नित्याची,  पाण्यात भिजू नका आणि वेळेवर जेवण करा..… फोन करत राहा ......

"आई.... आई... तू इतकी पॅनिक होऊ नकोस.... मी काळजी घेईन नित्याची आणि स्वतःची सुद्धा आणि वेळेवर फोन करेल .....पहाटे पाचलाच दोघे घरून निघतात, फ्लाईट 7 ची असते, मुंबई ते कोथबंटूर..... तिथून शंभर किलोमीटर वर उटी आहे.... मुंबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर थोडा वेळ असतो.... थोडावेळ बसतात, बरोबर सातला फ्लाईट टेक ऑफ घेते एखाद तासात कोथबंटूर ला पोहचतात,त्यानंतर ट्रॅव्हल्सनी उटीला जातात, तिथून कॅब नी हॉटेल Lakeview ला पोहोचून सर्वात घरी फोन करून सांगतात  ... या चार-पाच तासाच्या ट्रॅव्हल मध्ये नित्या अगदी गप्प बसते फक्त हो,नाही,ह... एवढं सुरू असतं हॉटेलमध्ये रूमची चावी घेऊन जातात रूम मध्ये एन्ट्री केल्या नंतर समोर जो नजारा दिसतो तो अतिशय सुंदर असतो ,समोर मस्त हिरवळ दिसते....थकलेले असल्यामुळे ते दोघेही फ्रेश होऊन आराम करतात..... रात्री कँडल लाइट डिनर साठी बाहेर जाते ...दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून पाय मोकळे करायला निघतो,  नित्याला जाग येते तेव्हा तिला रूममध्ये चिन्मय दिसत नाहीत,ती इकडे तिकडे आवाज देते ,,काहीच रिस्पॉन्स मिळत नाही,, ती त्याला कॉल करते पण मोबाईल रूममध्ये असतो.... रूमच्या बाहेर निघून इकडेतिकडे बघू लागते, जीव रडवेला झालेला असतो परत रूम मध्ये येते आणि बेडवर रडत बसलेली असते ....तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याच तिला जाणवत, मान वर करुन बघते तर चिन्मय असतो, नित्या पटकन उठून,

" चिन्मय कुठे गेला होतास ?...मी किती शोधलं तुला?... मोबाईल पण तुझा इथेच होता, असं म्हणत ती चिन्मयला hug करते आणि यानंतर

"असं करायचं नाही ,मला एकटं सोडून जायचं नाही...अस म्हणत रडते,,चिन्मय तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत करतो , चिन्मयला आतून खूप समाधान मिळते.....

क्रमशः

🎭 Series Post

View all