ज्युलिया राघव शास्त्री ८

सेक्स ट्रॅप
ज्युलिया राघव शास्त्री

भाग 8

"मला एक रिजन भेटले तेच्या सुसाईडचे, आय गेस इट वॉज दॅट. जर थेच असेल तर पॉर्न व्हिडिओज आर रिस्पॉन्सिबल फॉर हिज सुसाईड." ती परत पुढे म्हणाली.

"व्हॉट?" तो चक्रावून तिच्याकडे बघत होता.

" दॅट डे, थ्या लॅपटॉपमधे मी सगळे व्हिडिओ जिथून डाऊनलोड खेले होते थी सोअर्स लिंक सर्च खेले. ऑल व्हिडिओचे नाही भेटले बरोबर पण एक व्हिडिओची भेटले. थे मी माझ्या मेलला सेंड खेले होते. सॉरी आय डीड इट विदाउट युअर परमिशन.."

"हाऊ डेअर यू?"

"सॉरी, बट तुला खाय आहे थे लिसन खरायाचे का?"
ती बोलल्यावर तो चूप झाला.

"ओके सो लिसन, तुजे लॅपटॉपचे लिंक मी कॉपी खेले आणि त्यावर खूप सर्चींग खेले, इन्फॉर्मेशन कलेक्ट खेले. इकडे मनजे एथे बनणारे पॉर्न व्हिडिओ लिगल आहेथ, पण ॲक्सेस करायला प्रॉपर परमिशन लागते. सो खोनीही थे ओपन करू शकत नाही. पण कोणी कोणी थे डाऊनलोड खरून दुसऱ्या वेबसाईट वर ठाकले आहेत, तेथे बघायला काई परमिशन लागत नाही, जेथून सगले लोकं बघू शकतात अँड डाऊनलोड खरतात." ज्युलिया त्याला सांगत होती.

"मला हे माहिती आहे, मी मुलगा आहे. मुलं काय करतात मला माहिती आहे." राघव मधेच बोलला.

"यस तू मुलगा आये अँड सॉफ्टवेअर डेव्हलपर पण, तरी तू काय केले नाई आपल्या ब्रदरसाठी. लिव्ह इट, कारण तुला बरेच काय माहीत नाई. नाउ लिसन केअरफुली..हे वेबसाईटचा बीजनेस थोडा डिफरेंट आहे. ते जास्त करून टीनएजरस, तरुण मुला/मुलींना टार्गेट खरतात. आदी थे हे सगलं फ्री बघू देतात अँड मुलांना सवय लावतात. एक वेबसाइटला ओपन केले खी मोअर मोअर सर्फिंग ते मुलं खरतात. हे टीनएजर्सचा काय दोष नसतो, तेंचे एजच थे आहे, सेक्शुअल गोष्टी त्यांना अट्रॅक्ट करतात. बॉडी पार्टस, बॉडी मधे येणारे चेंजेस एक्सेट्रा सगलं माहीत करून घेयचा असते. जर तेन्ना प्रॉपर इन्फॉर्मेशन नाई भेटली तर ते व्राँग वे जाऊ शकतात. सो हे व्हिडिओ बघून मुलं अशा पॉर्न व्हिडिओचे ॲडीक्ट होतात. फर्स्टली, तेंना हे व्हिडिओ फक्त बघून मजा वाटते. बट नंतर दे वॉन्ट टू डू दॅट. येचाच फायदा ते वेबसाईटवाले घेतात. त्या वेबसाईटमधे खूप हाईडिंग लिंक्स असतात, मुलांना समजत नाई, ते कशावर पण क्लिक करत जातात, त्यामुले तेंची अकाउंटची इन्फॉर्मेशन हे वेबसाईटवाले कलेक्ट करत असतात. मग मुलांना मेसेज येतो.. त्यातून ते सेड्युस होत असतात. मेसेज मधून तेंना खूप उत्तेजीत खरतात. सम डेज हे चालते. मुलं आपल्या ताब्यात आले, असे तेंना समजले की नंतर व्हॉईस कॉल सुरू होतात. बोलण्यातून परत सेक्स अट्रॅक्शन वाढवले जातात. अन् आता फायनल स्टेज, आता व्हिडिओकॉल सुरू होतात. मुलांच्या चॉईस नुसार गर्ल ऑर बॉय ते व्हिडिओ कॉलमधे येतात आणि ते बोलतील तसेच हे मुलं करत जातात. हळूहळू कपडे उतरतात अँड जे नको करायला पाहिजे तेच ते मुलं करू लागतात अँड मग ते इथेच फसतात. तेंना वाटते ते एन्जॉय करत आहेत, बट तेंचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आये, त्यांना समजत नाई. अँड लास्ट सुरू होते ब्लॅकमेलिंग. ते हाईड लोकं या मुलांना पैशेसाठी ब्लॅकमेल करतात, नाय दिले तर तो व्हिडिओ पेरेंट्स, फॅमिली, फ्रेंड्स, सोशल मीडियावर व्हायरल करणेची धमकी देतात अँड ही छोटी मुलं त्यात अडकत जातात. पैशे नाई दिले तर यांना सिक्रेट प्लेस बोलावून येंच्या कडून कॉल बॉय, कॉल गर्ल्स ऑर पॉर्न व्हिडिओज सारखे काम करवून घेतात. ते मुलं फुल्ली ट्रॅप होतात, अँड नंतर तेच्या आऊट येणे इम्पोसीबल. अँड जेव्हा तेंच्यावर होणारे अत्याचार खूप वाढतात, ते मुलं सहन करू शकत नाई, अँड मग ते असे सुसाईड सारखे गोष्टी करतात."

ते ऐकून राघवच्या डोळ्यात खूप राग दिसत होता पण त्या सोबतच डोळे पाणावले सुद्धा होते, कारण ही माहिती त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. असेही काही होते, हे त्याच्यासाठी शॉकिंग होते.

"सॉरी बट हे पॉर्न व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओची डिमांड जास्त आये, म्हणून किरणकडे माजेच जास्त व्हिडिओ होते. हे व्हिडिओ डेंजर आये, जेंवा किरणचा फ्रेंड सांगितला, तर आय गेस, असेच झाले असेल किरणसोबत. व्हेन आय सर्च, आमची कंपनी पण फ्रॉड आये, तेच हे लीगल व्हिडिओज बाकी लोकांना खूप पैशे मधे सेल करतात. ते पण लोकं हे सारे कांडमधे शामील आये. तेंच नेटवर्क खूप स्प्रेड अँड खूप डेंजर आये. मी तूजा ब्रदर तर वापिस देऊ शकत नाई, बट तेच्या सारखं कोणी फसू नाई, म्हणून मी माझ्याच कंपनीच्या सिस्टीम मधून सगळे वेबसाईटचे ॲड्रेस, इलिगल वर्क लिस्ट पोलिसांना सेंड केले. पोलिसने रेड टाकून ते लोकांना पकडले. तेच लोकं आज माज्या मागे होते. एक जरी बॉय/गर्ल या स्कॅम मधून सेव्ह झाले, तर तेच माजा किरणला ट्रिब्युट आये." ती आपले डोळे पुसत म्हणाली.

ते सगळं ऐकून राघवचे डोकं एकदम सुन्न पडले होते. काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हते. दोघांत एकदम शांतता पसरली होती. बाहेर वातावरण खूप बिघडले होते, दोघेही बसल्या जागीच झोपी गेले होते.

थोड्यावेळाने राघवला जाग आली, बघतो तर ज्युलिया एका कोपऱ्यात जमिनीवर, दोन्ही पाय आपल्या पोटाजवळ घेऊन झोपली होती. तिच्या अंगावर त्याच्या शर्ट खेरीज काहीच नव्हते. थोड्यावेळ तर त्याला ती त्याच्या घरात काय करतेय, तेच कळत नव्हते. स्वप्न बघतोय की काय हे पण त्याला वाटून गेले. परत परत डोळे चोळत तो तिच्याकडे बघत होता, तरी ती तिथेच होती. नंतर त्याने आपला हा आपल्या तोंडासमोर धरत आपल्या श्र्वासांचा वास घेऊन बघितला, अन् त्याला कळले की त्याने ड्रिंक पण केलेले नाही. तो तिच्याजवळ गेला, तिच्या मोकळ्या केसांना त्याने हात लावून बघितला, तेव्हा त्याला जाणवले की खरंच ज्युलिया तिथे आहे. डोक्यावर त्याने थोडा जोर दिला आणि मग त्याला दुपार पासून घडलेल्या गोष्टी आठवू लागल्या आणि बोलतांनाच तो कधीतरी झोपला, हे त्याच्या लक्षात आले. त्याने बाहेर बघितले तर अजूनही विजा, पाऊस सुरू होता. घड्याळात बघितले तर रात्रीचा एक वाजला होता. जेवायची वेळ पण निघून गेली होती. तो आपल्या बेडरूममध्ये जाऊन पडला. पण काही केल्या त्याला झोप येत नव्हती. कोपऱ्यात झोपलेली जुलिया त्याच्या डोळ्यांपुढे येत होती. तो उठला आणि परत तिच्या जवळ जात खाली गुडघ्यांवर बसला. ती खूप गाढ झोपली होती, बहुतेक खूप दिवसांनी ती अशी शांत झोपली असावी, असे भासत होते. ना थंडी वाजत होती की कशाची भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत होती, खूप बिनधास्तपणे ती झोपली होती. तो बऱ्याच वेळ तिचा चेहरा न्याहाळत होता.


"राघव, तिच्याकडे असे बघू नको, विसरू नको हीच्यामुळेच किरण गेला आहे."

"तिची मजबूरी होती हे काम करण्याचे, आपल्या आवडीने कोणीही पॉर्न स्टार बनत नाही आणि त्यांच्या व्हिडिओ मधून हे सगळं घडत आहे, हे तिला पण माहिती नव्हते."

राघवच्या डोक्यात दोन्हीकडून विचार येत होते. त्याचे एक मन म्हणत होते ती दोषी आहे, दुसरे मन म्हणत होते की ती दोषी नाहीये.

"जाऊ दे काही पण असेल, पण सध्या ती आपल्या घरची पाहुणी आहे, आपणच तिला इथे आपल्या घरी आणले आहे, तिची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. अतिथी देवो भव, हे आपल्या धर्मात सांगितले आहे." त्याचे मन बोलत होते.

तिला उठवायला म्हणून त्याने तिच्या हाताला हात लावत तिच्या हाताला थोडे हलवले, पण ती फारच गाढ झोपेत होती. ती उठली नाही. शेवटी त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतले. तिच्या अंगावर फक्त शर्ट असल्यामुळे त्याच्या हातांना तिच्या शरीराचा स्पर्श होत होता. त्या स्पर्शाने त्याला कसेतरी झाले. त्याने पटकन तिला बाजूला असलेल्या सोफ्यावर झोपवले. तिच्या अंगावर पांघरून घातले. तेवढयात तिची झोप चळवळली. डोळे उघडून बघते तर राघव तेवढ्या रात्री सुद्धा आपल्या अंगावर गोमूत्र शिंपडत होता. ते बघून तिला फारच हसू आले, पण आवाज न करता ती परत डोळे मिटून पडून राहिली.


राघवला मात्र झोप येत नव्हती. त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि त्यात तो काहीतरी करत बसला. हळूहळू पापण्या जड होऊ लागल्या तसे तो आपल्या खोलीत जाऊन झोपला. इकडे ज्युलिया पण त्याला बघता बघता कधीतरी झोपी गेली होती.


सकाळी राघवला जरा उशिरानेच जाग आली. उठून हॉलमध्ये आला तर ज्युलिया अंगाभोवती पांघरून गुंडाळून सोफ्याच्या एका बाजूला बसून बाहेर बघत होती. राघवच्या येण्याची चाहूल लागली तसे तिने वळून बघितले.

"गुड मॉर्निंग." ज्युलिया राघवला बघून छान गोड स्माईल देत म्हणाली.

त्याने मात्र सपशेल तिच्याकडे दुर्लक्ष केले.

"कॅन आय यूज युअर वॉशरूम?" ती अडखळतच म्हणाली.

"हम्म.." तो फक्त तेवढेच बोलला आणि सरळ किचनमध्ये गेला.

"कडूस." ती पुटपुटली.

"व्हॉट?" तो किचन मधून डोकावला.

"ते एक टीव्ही सीरियल .. हा नथिंग." म्हणत ती आतमध्ये गेली.

ती फ्रेश होऊन परत सोफ्यावर येत पांघरून गुंडाळून बसली.

राघव हातात एक ट्रे घेऊन आला आणि तिच्या पुढ्यात धरला.

"धिस इज..."

"पोहे." ती खूप एक्साईटेड होत म्हणाली.

"तुला माहिती आहे?"

"माय मॉम यूज टू कूक इट.. शी वॉज अल्सो फ्रॉम पुणा."

"एक्सक्युज मी.. मी पुण्याचा आहे, तुला कसे माहिती?"

"ते तू मला बोलतांना एव्हरी टाईम वर्ड्स क्लिअर करत होता, सो आय गेस इट." बोलता बोलता तिने जीभ चावली.

त्याने चुपचाप तिच्या पुढे पोह्यांची प्लेट आणि चहाचा कप ठेवला.

"हेच्या टॉप, फाइन्ली चोप टोमॅटो, कोरीएंडर लिव्हस् अँड ग्रेटेड कोकोनट टाकले की इत टेस्ट वेरी यम्मी." ती खूप आनंदी होत, त्याच्याकडे बघत म्हणाली. पण त्याने काही रिस्पॉन्स दिला नाही.

"माय मम यूज टू सर्व्ह लाईक दॅट." म्हणत ती चुपचाप ते खाण्यात व्यस्त झाली.

"मी आथा लिव्ह करथे." ती जागेवरून उठत म्हणाली.

"नाही नको, ती लोकं अजूनही तुला शोधत असतील. इथेच थांब. आऊट साईड तसे पण वेदर अलर्ट आहे. आम्हाला पण वर्क फ्रॉम होम सांगितले आहे."

तिने फक्त होकारार्थी मान हलवली.

"आणि हो, इथेच एका जागेवर बसून रहा, तुझे इकडे तिकडे फिरलेले, हात लावलेले मला चालणार नाही." तिने परत होकारार्थी मान हलवली.

त्याचे ते असे हुकूम सोडणे पण तिला खूप छान वाटत होते. त्याच्या रागीट बोलण्यात पण उगाच तिला त्याची तिच्याबद्दलची काळजी जाणवून गेली. ती स्वतःच गालात हसली. एका जागेवर बसून ती त्याच्या हालचाली टिपत होती.

राघव आंघोळ वगैरे आटोपून आला. त्याने कंबरेभोवती क्रीम रंगाचे सोवळे गुंडाळले होते. गळ्यात एक सोन्याची चेन आणि एका खांद्यावरून जाणवे घातले होते. दिसायला तर तो छान होताच पण या रूपात तो अगदी एखाद्या गंधर्व सारखा दिसत होता.

त्याने देवापुढे दिवा लावला. नंतर धूप बत्ती लावली. ड्रॉवर मधून फडके काढून देव्हाऱ्यातील सगळे फोटो पुसले. दिव्याने ओवाळले, नंतर कापूर लावून घंटीनाद सुद्धा केला. धूप बत्तीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. घंटी नादाने ते वातावरण एकदम प्रसन्न वाटू लागले होते. त्याच्या घराचे रूपांतर एकदम मंदिरात झाल्यासारखे तिला भासत होते. ती तो काय काय करतोय, ते सगळं बघत होती. नंतर तो तिथेच बाजूला खाली मांडी घालून बसला. डोळे बंद करत काहीतरी ध्यान करत होता. त्याच्या त्या सात्विक रुपावरून ज्युलियाची नजर हटत नव्हती.

"राघव माईंडने एवढा बॅलेन्स्ड आहे, वेल मॅनर्स्ड आहे, किरण कसे काय अशा गोष्टींना भुलला?" तिच्या डोक्यात बरेच प्रश्न येऊ लागले.

नंतर राघवने आपला लॅपटॉप उघडला आणि काही ऑफिसचे काम करत बसला, पण त्याने एकदाही ज्युलियाकडे कामाशिवाय बघितले नाही.

त्याने तिला टीव्ही वर काही व्हिडिओ लावून दिले. तेच ती बघत बसली होती. भारतीय संस्कृती सौंदर्य दाखवणारे ते व्हिडिओ होते.

"इंडियाची जमीन खूप फविथरा प्लेस आहे ना? तिथे पाय ठेवला तरी सगले शुद्ध होते, माय मॉम अल्वेज यूज टू टेल धिस." ती ते व्हिडिओ बघून बोलत होती. पण तो मात्र हू कि चू करत नव्हता. पण ती मात्र जे जे आठवत होते, ते ते बोलत होती.

"माय मॉम वॉन्टेड टू विझिट इंडिया. मला पण अयोध्या, वृंदावन, कृष्णाचे सगले प्लेस बघायचे होते."

"तुझ्या सारख्या अपवित्र मुली तिथे जाऊ शकत नाही. ते खूप पवित्र स्थान आहे. तुझ्या स्पर्शाने मळेल माझा देश." तो पटकन बोलून गेला.

"यू डोन्ट हॅव गर्लफ्रेंड, राईट?"

" वॉव, तू माझी ही पण माहिती काढली."

"नो. तू खूप एरोगंट आहे. युअर वर्डस् आर वेरी स्पायसी, म्हणून मला सम्हझले तुला गर्लफ्रेंड नाई."

"वाह खूप हुशार आहेस तू.. हीच हुशारी चांगल्या कामात वापरली असतीस." तो तिरकसपणे म्हणाला.

"इफ यू बिहेव लाईक धिस, तुला गर्लफ्रेंड भेटणारच नाई अँड तू अनमेरीडच राहशील."

"मला गर्लफ्रेंड पाहिजे पण नाही. मला मुलींवर विश्वासच नाही. त्या कपडे बदलतात तसे बॉयफ्रेंड बदलतात, फिजिकल पण होतात. मला अशी मुलगी पाहिजेच नाही."

"तू मॅरेज करूच नको, तुला मॅनेज होणार नाई. लग्न तुला झेपणार नाई." ती आपले तोंड वाकडे करत त्याला म्हणाली आणि परत व्हिडिओ बघण्यात मग्न झाली.

त्याला तिच्या बोलण्याचे थोडे हसूही आले होते, पण त्याने तसे चेहऱ्यावर दाखवले नाही.

असाच काहीसा त्यांचा दिवस गेला. रात्री ज्युलियाला जाग आली तर राघव लॅपटॉपवर काहीतरी करत होता. ते बघून ती त्याच्या जवळ गेली.

"अशे केल्याने सगले ठीक होईल? यस्टरडे नाईट पण तू हेच करत होता."

"मी रोज हे करतो."

"हे पॉर्न, बॅड व्हिडिओजला रिपोर्ट केल्याने सगले बंद होणार नाई." ज्युलिया समजावणीच्या सुरात म्हणाली.

तो रोज रात्री लॅपटॉप उघडून, त्याच्या वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंट वरून जेवढे फेसबुक, इंस्टाग्राम वर अश्लील व्हिडिओ होते, ते बॅन होण्यासाठी त्यांना रिपोर्ट करत होता. तेच काल रात्री ज्युलियाने बघितले होते आणि आता सुद्धा तो तेच करत होता.

"जास्तीत जास्त युथ फेसबुक, इंस्टा वापरतात. मी करेल हे." म्हणत परत त्याचे काम तो करू लागला.

"मिलेनियंस अकाऊंट आये इथे, किती कंट्रोल होईल? अँड धिस इज नॉट द सोल्यूशन.."

"मग काय आहे?"

"एज्युकेट देम प्रॉपरली."

*******

पुढील भागात:

" मला पवित्र होयचे आये.. प्लीज टेल मी सम सोल्यूशन.."

*****

क्रमशः

🎭 Series Post

View all