जुळले प्रेमाचे धागे

सचिन बाहेरच्या खोलीत आला, आई-बाबा रिमा बसलेले होते, त्याने आई बाबांजवळ विषय काढला,... "मला रिमा पसंत आहे मला लग्न करायचं आहे तिच्याशी, अवि आई-बाबांनी रीमा मला तुम्हाला सगळ्यांसोबत राहायचं आहे",..



जुळले प्रेमाचे धागे

©️®️शिल्पा सुतार
..............

रीमा आज संध्याकाळी खिडकीत एकटीच बसली होती, मन अगदी उदास झाल होत तीच, समोर तिचा मुलगा अवी आजी सोबत खेळत होता, त्याच्याकडे बघून रीमाचे डोळे भरून येत होते, बरं झालं आज वेळेवर आईंनी त्याला बाहेर खेळायला नेलं, सकाळपासून हट्ट चालू होता त्याचा,, त्याला त्याच्या पप्पांबरोबर बाहेर फिरायला जायचं होत,

छोट्याशा अवीला काहीही समजत नव्हतं, बाकीच्या मुलांचे पप्पा कसे त्यांच्यासोबत असतात, त्यांना शाळेत नेतात, फिरायला नेतात, लाड करतात, मलाही तसंच बाहेर जायचं आहे पप्पां सोबत , अवी कधी कधी एवढा हट्ट करायचा, रिमा रडकुंडीला यायची, ह्याला समजवू कस? विचार करूनच रीमाला काही सुचत नव्हत, परवा सुद्धा पप्पा पाहिजे म्हणून अवी रडून रडून न जेवता झोपला , घरात सगळे उदास झाले होते, अविचे पप्पा या जगात नव्हते,

पाच वर्षांपूर्वी....

नुकतीच ग्रॅज्युएट झालेली रिमा नवीनच नोकरीला लागली होती, नवीन नौकरी ट्रेनिंग असायच, काम समजून घ्यायला लागायच, कधी कधी उशीर व्हायचा घरी यायला, असच एकदा ती ऑफिसमधून उशिरा घरी निघाली , निघायला बराच उशीर झाला होता, बस स्टॉप वर ती एकटी उभी होती, बस येतच नव्हती, काय कारण होत काय माहिती, खूप सामसूम झाली होती, पूर्वी कधी ती या एरियात आली नव्हती

जरा वेळाने एक कार जवळ येऊन थांबली,... "तुम्हाला कुठे सोडायचं आहे का?, काही मदत हवी आहे का तुम्हाला? ",

रीमा खूप घाबरली..कोण आहे काय माहिती, उगीच अनोळखी लोकांशी नको बोलायला, ती बाजूला जाऊन उभी राहिली,

कार परत तिच्याजवळ आली,.... "हे बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर मी सोडून देतो, आता इथे तुम्हाला कुठलीही बस मिळणार नाही इंडस्ट्रीयल एरिया आहे हा ",.

रीमा काही बोलली नाही, ती बाजूला जाऊन उभी राहिली,.. काय माणूस आहे हा, मला इंट्रेस्ट नाही तरी बोलतो आहे माझ्याशी , आता त्या माणसाने कार बाजूला लावली आणि तोही स्वतः बस स्टॉप वर येऊन उभा राहिला

" काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही माझा पिच्छा करत आहात का? ",... रीमा

"नाही पण मी तुम्हाला या बस स्टॉप वर कंपनी देतो आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, सुमसाम आहे, मी तुम्हाला विचारतो आहे कुठे सोडायचा आहे का? तुमचा नाही विश्वास तर मग तुम्हाला रिक्षा नाहीतर टॅक्सी मिळे पर्यंत मी उभा राहतो, मी तुम्हाला काही त्रास देणार नाही काळजी करू नका",....

पंधरा-वीस मिनिटे झाली ते दोघ तसेच बसस्टॉपवर उभे होते, एकही रिक्षा टॅक्सी व बस यायचं नाव नव्हतं, मुलगा चांगला वाटत होता, शेवटी ती स्वतःहून त्याला बोलली की मला प्लीज घरी सोडून द्या

रोहितने तिला घरी सोडलं, गाडीतून उतरताना तिने त्याचे आभार मानले, त्याने तिला कार्ड दिलं,.. "जर कधी असंच घरी जायला उशीर झाला तर बिंदास मला बोलवा, मी तुम्हाला घ्यायला येईल",

" तुम्ही खरच खूप चांगले आहात खूप धन्यवाद",... रीमा

रिमा घरी आली आई काळजीत होती,... "तुझे बाबा आता निघत होते तुला बघायला, का उशीर झाला ग एवढा?",

"आई अग ट्रेनिंग उशिरा संपल, बस रिक्षा मिळेना मग एकाने सोडल घरापर्यंत ",.. रिमा

" कोण ग? कोणी ओळखीचे होते का? ",... आई

नाही आई...

आई काळजीत होती

"मला समजतंय ग अनोळखी लोकांसोबत नव्हत यायला पाहिजे, पण तास दोन तास रिक्षा टॅक्सी मिळत नव्हती, मग मला हा रोहित मला सोडायला आला ",.. रिमा

" बर झाल बाई पुढे अस झाल की तू बाबांना बोलवून घे घ्यायला ",.. आई

हो आई..

त्यानंतर बऱ्याच वेळा रोहित रिमाची भेट होत राहिली, अतिशय सुंदर हसरी रिमा खूप आवडली रोहितला, आता नेहमी तो तीच ऑफिस सुटायच्या वेळेवर बस स्टॉप वर हजर असायचा, त्यांची ओळख प्रेमात बदलली, दोघांच्या मनात होत पण कोणी बोलल नव्हत, एक दिवस रिमा ऑफिस मधून निघाली, रोहित ने तिला फोन करून जवळच्या कॉफी शॉप मध्ये बोलवून घेतल, हॉटेल च्या टेरेस वर दोघांसाठी टेबल बूक होती रिमा ला समजत नव्हत नक्की काय सुरु आहे, रोहित तयार होवून आला होता, त्याने रिमा ला प्रपोज केल, रिमा खूप लाजली होती, काहीतरी बोल रिमा, हो की नाही सांग

रिमा ने उठून रोहितला मिठी मारली, खूप खुश होते ते दोघ, स्वप्नवत सुरू होत त्यांच, दोघांनी लग्न करायचं ठरवलं

रोहित त्याच्या आई बाबांना घेवून रिमाच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेला, अतिशय चांगला सालस असा रोहित घरच्यांना लगेच पसंत पडला, वाजत गाजत त्यांचं लग्न झालं,

लग्नानंतर दोघ फिरायला गेले, खुप सुंदर आयुष्य सुरू झालं होतं, रोहित रीमा वर खूप प्रेम करत होता, अगदी स्वप्नवत सुरू होत सगळ, त्यात अवीचा जन्म झाला, आता रोहितचा बर्‍यापैकी वेळ अवी सोबत जात होता, छोटासा अवी अगदी रोहित सोबत खूप कंफर्टेबल होता प्रत्येक गोष्टीला त्याला बाबा लागत होता,

रोहित आणि त्याचा मित्र सचिन दोघांची मिळून पार्टनरशिप मध्ये फॅक्टरी होती, खूप भरभराट होत होती दोघ मन लावून काम करत होते

एक दिवस चक्कर येऊन रोहित ऑफिस मध्ये पडला, सुरुवातीला काय होतय कोणाला समजे ना पटकन दवाखान्यात नेल, नेईपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं,

रीमाच छोटसं जग क्षणात बेरंगी झालं होतं, काय करावं तिला सुचत नव्हतं, हे सगळ खरं घडल यावर तिचा विश्वास बसत नव्हता, काय करणार होती ती रोहित शिवाय, त्याच्या आई बाबांना, अवीला कस सांभाळणार होती, सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती,

सुरुवातीला रिमा कोणाशी बोलत नव्हती ती फक्त अवीला घेवून बसलेली असायची, जेवण सुद्धा करत नव्हती दोन दोन दिवस, सासुबाई सासरे काळजीत होते, रिमाच्या आई बाबांनी तिच्याशी बोलायच ठरवल, सगळ्यांनी समजवल तिला, अवी सारख तिला पप्पां बद्दल विचारत रहायचा, काय सांगणार त्या एवढ्याशा मुलाला, खूप रडायची रिमा, शेवटी तिने यातून स्वतःला सावरल, सासू सासरे आई बाबा सगळे काळजीत होते, त्यांना आधार द्यायच ठरवल,

"काही तरी कराव लागेल, सगळ्यांना मला सांभाळायच आहे आता",... रिमा

अवी लहान होता, त्याच एकट्याने करता करता नाकीनऊ येऊन जायचे, सासू-सासर्‍यांचे वय झाल होत, लवकरच रोहित गेल्यामुळे ते पण एकटे पडले होते, पण अवी मुळे ते थोडा वेळ दुःख विसरायचे, खेळायचे त्याच्या सोबत,

रीमाने ऑफिस जॉईन करायचं ठरवलं, तिने तसं सचिनशी बोलून घेतलं,

"तुला ऑफिसला यायचं असेल तर ये रीमा, माझी काही हरकत नाही",.. सचिन

"मला काम शिकलं पाहिजे सचिन, तुम्ही असं किती दिवस आमच घर सांभाळणार ",... रीमा ऑफिसला पोहचली सगळ्यांशी तिने ओळख करून घेतली

सचिनच्या केबिनमध्ये ती गेली.. "सचिन मला थोडे दिवस ट्रेनिंग मिळू शकेल का? मला अजिबातच कामाची सवय नाही, थोडा जर कामकाज काय समजलं तर मी व्यवस्थित काम करू शकेल",

" हो चालेल काही हरकत नाही ",.. सचिन

त्यादिवसापासून रीमाचं ट्रेनिंग सुरू झालं, हुशार रीमाने सगळ्या गोष्टी लगेच आत्मसात केल्या, अतिशय छान काम सुरू झालं तिचं, आता तिचा ही वेळ व्यवस्थित जात होता आणि आपण उगीच पगार घेतो आहे असेही वाटत नव्हतं,

घरचे सासू-सासरे चांगले होते, ते अवीचा छान सांभाळ करत होते, पण तरी त्यांच्या मनात असं होत रीमा इतके आयुष्य कसं काढेल एकटी, एक दोनदा त्यांनी तिच्याशी बोलून बघितलं लग्नाबद्दल , पण रीमाने स्पष्ट नकार दिला, माझं आयुष्य आता तुम्ही आई बाबा आणि अवी सोबतच आहे, रीमाच्या आईवडिलांनी पण बोलून बघितलं तिच्याशी, काही उपयोग झाला नाही,

ऑफिस मध्ये ऑडिट होतं, खूप काम असायचं आता, रीमा छान रमली होती, व्यवस्थित काम करत होती, एक दिवस काम करता करता कधी रात्रीचे नऊ वाजले ते तिला समजलं नाही, ती बाहेर आली तर सगळा स्टाफ केलेला होता, बापरे खूपच उशीर झाला वाटत, आता घरी जायला पाहिजे

ती बाहेर आली सचिन उभा होता गाडीजवळ,... "चल रीमा मी तुला घरी सोडून देतो , एवढ्या रात्रीची एकटी जाऊ नकोस" ,

रीमाला कसंतरीच वाटलं होतं सचिन बरोबर घरी जायला, पण काही इलाज नव्हता, तीने तेव्हाच ठरवलं रोहितची कार घरी आहे त्याला एक ड्रायव्हर लावून घेऊ

" नको सचिन तुमच घर दुसऱ्या बाजूला आहे तुम्ही मला सोडवायला येणार तर तुम्हाला घरी जायला उशीर होईल",... रीमा

" होउदे झाला तर उशीर, नाहीतर माझ्या घरी कोण आहे माझी वाट बघणार" ,... सचिन

" कोणीच नाही का तुमच्याकडे? ",... रिमा

"नाही मी एकटा आहे",.. सचिन

रीमा सचिन बरोबर निघाली घरी आली, बाबा बाहेर वाट बघत होते, ते काळजीत होते, सचिनला बघून त्यांना बर वाटल, त्यांनी सचिनला घरात यायचा आग्रह केला, सचिन आत मध्ये आला

" आता जेवून जा सचिन",... सासूबाईंनी आग्रह केला

सचिनला बघून अवी खूप खुलला होता, सचिन आला तर एकदम पटकन त्याच्या जवळ जाऊन बसला, त्याच्या कडे सारखा बघत होता तो, सचिनही खूप गप्पा मारत होता अविशी, अविने त्याला त्याचे खेळणे पेंटिंग सगळे दाखवले,

रिमा फ्रेश होऊन आली, कॉटनच्या ड्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती, सचिन तिच्याकडे बघतच बसला, ते तिच्या लक्षात आलं होतं, तिला समजतच नव्हतं काय करावं, तसं काही चेहऱ्यावर न दाखवता तिने सगळ्यांचे ताट वाढले, ते जेवायला बसले पहिला घास खाल्ला आणि सचिनच्या डोळ्यात पाणी होतं

"काय झालं आहे सचिन",.. आई आणि विचारत होत्या

" माझ्या आईची आठवण आली, तिच्या हाताला ही खूप छान चव होती",... सचिन

"तुला जेव्हा वाटलं तेव्हा इथे येत जा, मी तुझ्या सगळ्या आवडीचे पदार्थ बनवून देईन, नाही तर एक काम करते उद्या पासून मी तुला रीमा सोबत डबा पाठवते",... आई

" नको मावशी त्याची काही आवश्यकता नाही",... सचिन

" आवश्यकता का नाही? डबा देत जा ग तू ह्याला ",... बाबा ही सचिन च्या आजूबाजूला होते

आता रीमा रोज सचिनच डबा ऑफिसला नेत होती, त्या निमित्ताने तिला त्याच्या केबिनमध्ये जावे लागायचं, सुरुवातीला तिला त्याच्याशी बोलणं अवघड वाटायचं, कामापुरते ठीक आहे पण उगीच गप्पा मारायची नाही ती, नुसता डबा ठेवून वापस यायची

सचिनही बघत होता किती चांगली आहे रीमा, तिच्या कामाशी काम ठेवते, अघळ पघळ बोलणार नाही की भांडणं नाही कोणाशी, त्याला आता रिमा खूप आवडायला लागली होती, ते त्याच्या वागण्या-बोलण्यातुन समजत होतं,

रीमा घरी आली आज तिचं जेवणात लक्ष नव्हतं ती सचिनचा विचार करत होती, तिला समजलं होतं त्याच्या वागण्या-बोलण्यातुन सचिन चांगला होता, पण आता तिला परत लग्न करायचं नव्हतं, काय करावं ऑफिसला न जावं का? पण काय करणार आहे मी घरी, घरचे काय म्हणतील? का बरं जात नाही आता ऑफिसला? आणि तसं सचिन अजून मला काही बोलला नाही, आपणच उगाच गैरसमज तर नाही ना करून घेत आहे

ठीक आहे उद्या पासून आपण जातो तसं जाऊ जेव्हा तो काही म्हटला तर बघू, आज तिला रोहितची खुप आठवण येत होती

सकाळी तयार करून रीमा बाहेर आली,

"मी पण आज ऑफिसला येणार आहे अवि हट्ट करत होता, मला सचिन काका ला भेटायचं आहे",..

"नाही अवि तुला नाही येता येणार नाही, ऑफिसमध्ये काम असतं",.. म्हणून रीमा ने त्याला टाळलं

संध्याकाळी रीमा घरी आल्यानंतर अवि सदोदित सचिन बद्दल अस तिला प्रश्न विचारत होता

" काय झालं हे अवी बाळ तू सारखा त्या काका बद्दल काय बोलत असतो?" ,.... रिमा

" मम्मी मी सचिन काकाला पप्पा बोलू का? ",.. अवी

"काही काय बोलतो आहेस अवी?, तो सचिन काका फक्त माझ्या ऑफिस मध्ये काम करतो, असं बोलू नये",... रिमा

पण अविने हे खूप मनावर घेतलं होतं तो रोज सचिनला फोन करत होता, त्याच्याशी खूप बोलत होता, एक दिवस अवीने परत ऑफिसला यायचा खूप हट्ट धरला, दरवेळी प्रमाणे रिमाने त्याला ऑफिसला नेलं नाही, रीमा ऑफिसला गेली, इकडे अविला खूप ताप भरला, रीमाला फोन आला ऑफिसमध्ये,

ती सचिनच्या केबिन मध्ये गेली,... "मला आत्ता घरी जावं लागेल",..

"काय झालं काही प्रॉब्लेम आहे का?",.. सचिन

"हो अवीला खूप ताप भरला आहे, लगेच जाते आहे मी जाता जाता डॉक्टरांना घेऊन जाते",.. रिमा

"मी येऊ का सोबत?",.. सचिन

"नको सचिन आता चार वाजता खूप महत्त्वाची मीटिंग आहे मी निघते",... रिमा निघाली डॉक्टरांना घेऊन घरी पोहोचली, अवि तापात बडबड करत होता तो सारखा सचिनच नाव घेत होता, रीमाला समजत नव्हतं काय करावं, शेवटी संध्याकाळी बाबांनी सचिनला फोन केला, सचिन लगेच घरी आला, त्याला बघून अवि खुलला सचिनने त्याच्यासाठी खाऊ आणला होता, अवि त्याला सोडतच नव्हता, पूर्ण वेळ तो सचिनशी गप्पा मारत होता, ताप तर जसा पळूनच गेला होता,

"अवि आता मला घरी जावं लागेल",.. सचिन

तसा अवि रडायला लागला, तू नको जाऊस काका, मी तुला पप्पा म्हणू का?

आई बाबा रीमा सचिन सगळे एकमेकांकडे बघायला लागले

" हो चालेल अवि, तुला जे वाटत ते म्हण मला, पण तू त्रास करून घेऊ नको",.. सचिन

"मग तू इथून जाऊ नको काका, आमच्या सोबतच रहा",.. अवी

" ठीक आहे उद्या मी येतो",.. म्हणून सचिन निघाला, रिमा बाहेर पर्यंत आली

" मला माफ करा सचिन, अविला काही समजत नाही, त्याचा तसा काही उद्देश नाही, तो रोहितला मिस करत असतो ",... रिमा

" काही हरकत नाही रीमा, पण अवि बोलतो आहे त्यावर आपण विचार करायला काही हरकत नाही, तू लग्न करशील का माझ्याशी, अवि साठी ही आणि मला ही तू खूप आवडते ",.. सचिन

रीमाला खाली बघत होती, रीमा पटकन आत निघून आली, दुसऱ्या दिवशी सचिन अवीला भेटायला आला, खूप खेळणे आणि खाऊ आणला होता त्याने, आता अविला बरं वाटत होतं, अवि खूप खुश होता, सचिनच्या हातून जेवला तो, औषध घेऊन जरा वेळाने झोपला

सचिन बाहेरच्या खोलीत आला, आई-बाबा रिमा बसलेले होते, त्याने आई बाबांजवळ विषय काढला,... "मला रिमा पसंत आहे मला लग्न करायचं आहे तिच्याशी, अवि आई-बाबांनी रीमा मला तुम्हाला सगळ्यांसोबत राहायचं आहे",..

आई-बाबा रिमा कडे बघत होते, रिमा उठून आत चालली गेली,

"आम्ही समजतो रे तुझ्या भावना, पण तुला माहिती आहे ना रिमा रोहितला इतक्या सहजासहजी विसरू शकणार नाही, तुमच्याकडे काही अडचण नाही ना रीमा अविला स्वीकारण्यासाठी ",... बाबा

" नाही काही प्रॉब्लेम नाही, माझे आई बाबा नाही, दूरचे नातेवाईक आहेत, ते काय म्हणतील याच्याशी मला काही देणं घेणं नाही ",... सचिन

दुसऱ्या दिवशी रिमा ऑफिसला गेली, सचिन ने तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं, रीमा येऊन समोर बसली,.. " रीमा मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ",..

" माझं आधी लग्न झालेलं आहे, मला मुलगा हि आहे, तुमचं अजून लग्न झालेलं नाही, तर तुम्हाला अजून चांगली मुलगी मिळू शकते, राहिला प्रश्न अविचा, त्याला समजवावे लागेल",.. रिमा

" तू खूप आवडते मला , मला तुझ्या आणि अवीसोबत आयुष्य घालवायला आवडेल, प्लीज माझा विचार कर रिमा ",... सचिन

" पण मी रोहितला विसरू शकत नाही, मला थोडा वेळ हवा आहे ",.. रिमा

" चालेल माझी काही हरकत नाही ",... सचिन खुश होता

दोन महिन्याने सचिन रिमाच लग्न झाल, सचिन आता घरी रहायला आला, नावाला त्यांच लग्न झाल होत, रिमाने अजून सचिनला होकार दिला नव्हता, अवी खुप खुश होता रोज तो त्याच्या पप्पांसोबत मस्त वेळ घालवत होता,

सचिन रिमाशी बोलण्याच्या प्रयत्न करायचा, तिचा विशेष प्रतिसाद नव्हता, ती लांब रहात होती,

आॅफिस मध्ये ऑडिट होत, कामासाठी सचिन जास्त वेळ थांबला होता, रिमा लवकर घरी निघून आली, जेवण झाल, बराच वेळ झाला, सचिन का आला नाही, जरा वेळाने फोन वाजला, आम्ही हॉस्पिटल मधुन बोलतो आहे, सचिनचा अ‍ॅक्सीडेंट झाला आहे,

रिमा खूप घाबरली, आई बाबांना सांगितल, मला जायला पाहिजे हॉस्पिटल मध्ये, ड्रायवरने गाडी काढली, रिमा बाबा हॉस्पिटल मध्ये गेले, रिसेप्शनला विचारल, त्यांनी सचिन अ‍ॅडमिट होता ती खोली दाखवली,

बाबा रिमा आत मध्ये गेले, थोड लागल होत हाताला आणि सकाळ पर्यंत अंडर आॅब्जरव्हेशन ठेवणार होते, बाबा खूप काळजी करत होते ते सचिनला रागावत होते, रिमा बाजूला उभ राहून सगळ बघत होती, तिच्या डोळ्यातील काळजी स्पष्ट दिसत होती,

" तुम्ही घरी जा आता बाबा, रिमा, मी ठीक आहे आता ",.. सचिन

" नाही मी घरी जाणार नाही, बाबा तुम्ही घरी जा आई काळजी करत असतिल" ,... रिमा

बाबा तयार झाले, ड्रायवर सोबत घरी गेले, रिमा त्यांना सोडून आली, सचिन जवळ येवून बसली, रडायला लागली, सचिनने पुढे होवुन तिला जवळ घेतल, बर्‍याच वेळ ते दोघ असे बसुन होते,

" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे सचिन, मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही,.... काळजी घे" ,..

"आता तू आहेस ना माझी काळजी घ्यायला ",.. सचिन खुश होता

एका वर्षानी त्याच हॉस्पिटल मध्ये रिमा अ‍ॅडमिट होती, एका छोट्याश्या गोड परिच आगमन झाल होत त्यांच्या संसारात, अवी आता मोठा दादा झाला होता, आई बाबा अवी सचिन सगळे हॉस्पिटल मध्ये गर्दी करून होते, अगदी काय करू काय नको अस सचिनला झाल होत, रिमाची सगळे खूप काळजी घेत होते

आता त्यांचा परिवार पूर्ण झाला होता,....