Login

जुगलबंदी

अहो --"कालच तर झाला ना हा मेनू माझ्या भावाकडे आपण गेलो होतो जेवायला त्यांनी किती आग्रह करून खाऊ घातले, रात्री तुम्हाला सोडा प्यावा लागला.अच्छा-- फिर आप प्यार से खिचडी भी खिला दो तो खा लेंगे, जानम !! शायराना अंदाज मधे राजेश खन्ना स्टाईल मध्ये पहात गोपाळरावांनी डायलॉग मारला. तो बरोबर फिट बसला.

जुगलबंदी

गोपाळराव फिरून घरी पोहोचले तो संध्याकाळचे सात वाजले होते.
घरात पाऊल टाकले तो काय राधा हॉलमध्ये सोफ्यावर गुपचूप बसली होती.
स्वयंपाक घरात सामसूम. रोज ते फिरून घरी येत तेव्हा दारात पाऊल टाकायच्या आधीच मस्त भरपूर आलं घालून केलेला चहा किंवा वेलची जायफळ वाल्या काफीचा सुगंध त्यांचं स्वागत करी, बरोबर काहितरी खमंग चुरचुरीत,चकली, किंवा शंकर पाळे असतं.
.आज जरा जास्तीच फिरणं व कट्ट्यावर गप्पा झाल्या त्यामुळे भूकही लागली होती.
" पण आज हिला काय झालंय\".
"काही कोणाचा फोन बिन? त्यांनी विचारले."
राधा ने न बोलता मान नकारार्थी हलवली.
बापरे मामला गंभीर दिसतोय, आपल्यालाच हातपाय हलवावे लागतिल .मनाशी विचार करत गोपाळरावां नी दोन कप चहा केला एक कप राधाबाईं च्या हातात दिला.
चहाच्या कपातून येणाऱ्या वाफे कडे निर्विकार नजरेने पहात राधाबाई म्हणाल्या
"आयुष्य कसं या वाफे सारखं हळूहळू विरत जात नाही".?
बापरे मूड चांगलाच ऑफ दिसतोय तरीच हे दार्शनिक डायलॉग.
आता हिचा मूड लवकरच ठीक नाही केलं तर आपल्या पोटातील कावळे शांत बसू देणार नाही.
"अगं असं नसत आयुष्य, चहा सारखं चवीचवीनं घोट घोट घेत त्याचा आनंद घ्यायचा असतो, किंवा समज तू केलेल्या पुरणपोळी सारखं आतून गोड वरुन खमंग तुपाळलेल, गोपाळ रावांना कळत होतं की आपल्या या सर्व उपमा भुके पायी आहेत पण---
राधा अजूनही तशीच ढिम्म चेहरा.
आता विषय बदलावा म्हणून "अगं आज सुरेश आला होता कट्ट्यावर खूप वाळलाय ग, घरच्या तक्रारी सांगत होता बायको लक्ष देत नाही खाण्यापिण्याकडे,
दोन दोन सुना आहेत तेव्हा " हा त्यांचा संसार म्हणते ,सुना करतात पण ते चायनीज पिझ्झा वगैरे ते काही याला आवडत नाही सांगत होता कोथिंबीर आणली होती वाळून गेली. वहिनींच्या हातची कोथिंबीर वडी खायची इच्छा आहे पण---
एवढे बोलून गोपाळराव यांनी राधा कडे पाहिले आता चेहरा थोडा खुललेला वाटला. मात्रा बरोबर लागू पडली वाटते पण-- अजून बॅटरी फुल चार्ज दिसत नाही.
"तू काय घालते ग त्या वडी त काही सिक्रेट आहे कां?? सर्व जण तुझी खूप तारीफ करतात."
"तसं काही नाही हो मन लावून केलं की होतं सगळं मूड असावा लागतो".
"मग --आज काय मूड आहे मूळ मुद्द्याकडे वळत गोपाळराव यांनी विचारले".
काय करू ? सांगा
\"मेथीचे ठेपले व कढीगोळे कर\".
रात्रीचे??? न-को बाई ढेकरा देत बसता रात्रभर.
मग-- मसालेभात किंवा मिक्स भाजी पोळी कर.
अहो --"कालच तर झाला ना हा मेनू माझ्या भावाकडे आपण गेलो होतो जेवायला त्यांनी किती आग्रह करून खाऊ घातले, रात्री तुम्हाला सोडा प्यावा लागला.
अच्छा-- फिर आप प्यार से खिचडी भी खिला दो तो खा लेंगे, जानम !! शायराना अंदाज मधे राजेश खन्ना स्टाईल मध्ये पहात गोपाळरावांनी डायलॉग मारला. तो बरोबर फिट बसला.
पुरे पुरे, म्हणत राधा उठली, .....करते हो तुमच्या आवडीचीच कढी, खिचडी, पापड,
काहीतरी पदरात ( पोटात) पडतय त्यावर समाधान मानावे. गाडी रुळावर आली, मेहनत सफल झाली असे मनात म्हणत शीळ वाजवत, टीव्हचा रिमोट हातात घेतला.
स्वयंपाक घराकडे वळत राधा ने विचार केला आज स्वयंपाक करायचा खरंतर खूप कंटाळा आला होता म्हणून खिचडी करायचं विचार होता पण ते गोपाळरावांन कडून वदवून घ्यायचे होते म्हणून हा सगळा शो होता, आणि तो बरोबsर लागू पडला .
ह्या जीवन गाण्यांच्या (खाण्याचा) जुगलबंदी त कुणाच्या सूर वरचढ लागला ?
हे तुम्हीच ठरवा.
----------------------------------------
सौ.प्रतिभा परांजपे.