जरा समजून घ्या... भाग 4 अंतिम

हेच आधी सगळे नीट राहिले असते तर, घरकाम स्वयंपाक इतर गोष्टी काही विशेष नाही, ते काम जमत नसेल तर आपण मदतनीस ठेवू शकतो



जरा समजून घ्या... भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

जलद कथालेखन स्पर्धा

विषय...नाती गोती
...

दुसऱ्या दिवसापासून अंकितने घर बघायला सुरुवात केली, त्यांना त्याच एरियात थोडं लांब छान घर मिळालं, एक तारखेपासून मेधालाही ऑफिसला जॉईन व्हायचं होतं,

तिथे आधी विरोध केला,.. " अंकित नको वेगळ रहायला, मला सगळे नातेवाईक समाजातील लोक नाव ठेवतील की मी घरात फूट पाडली",

पण अंकितला विशेष फरक पडला नाही,.. "आपण इथून जाणार आहोत आणि ते ठरलेलं आहे, हे तुझ्या चांगल्या साठी आहे मेधा, यापुढे मला कुठल्याच गोष्टीत वाद नको आहेत",

त्यामुळे आता मेधा शांत बसली.

नवीन घरात मेधा अंकितला खूप छान वाटत होतं, दोघांचं काम लगेच होऊन जायचं, ती पुढच्या स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करत होती, मन ही प्रसन्न राहायचं दिवसभर.

अंकित मुळातच चांगला आणि समजूतदार होता त्यामुळे काहीच अडचण नव्हती.

एक तारखेपासून मेधाने ऑफिस जॉईन केलं, सकाळीच ती दोघांचा स्वयंपाक करून घ्यायची, छान बस्तान बसलं होतं त्यांचं, मध्ये मध्ये त्यांना पूजाची आठवण येत होती, पण काय करणार काही गोष्टींना इलाज नसतो.

इकडे सासरी मात्र मायाला आता खूप जीवावर येत होत, मेधाच लग्न झाल्यापासून काहीच काम करायची सवय नव्हती आणि ती गेल्यामुळे सासूबाई आता परत मायाच्या मागे लागल्या होत्या, तिला सगळं काम देत होत्या, यावेळी मात्र रोहितने पण सगळं बघितलं की कसा वागला अंकित, त्याने त्याच्या बायकोला सपोर्ट केला, रोहितने पण विरोध केला की माझी ही बायको सगळं काम करणार नाही.

मायाने ही आता शाळेत नोकरी धरली होती, घरात कामाला मदतनीस आल्या, त्या बरच काम करायच्या, मायाला स्वयंपाकाचे काम होतं आता त्यांच व्यवस्थित सुरू होत.

पण हे अस व्यवस्थित व्हायला कोणाला तरी घर सोडायची गरज आहे का?

जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा सगळे एकमेकांशी प्रेमाने नीट नाही वागू शकत का? एकमेकांचा आधार नाही बनू शकत का, आता सासूबाईंनाही थोडी या गोष्टीची जाणीव झाली, त्यांनी एक दोनदा अंकीतला सांगून पाहिलं की ये इकडे रहायला,

पण आता तो नाही म्हटला. दुरून गोड बरे आम्ही, एकत्र रहाण नको आता.

घराचं रीनोवेशनच करायचं ठरलं, बंगला पाडून तिथे दोन-तीन वाजली बिल्डिंग बांधली, अंकित मेधाला त्यांनी परत तिथे राहायला बोलवलं , अंकितने आधी सांगून दिल आम्हाला दोघांना वेळ नसतो, प्रेमाने राहणार असणार तर येतो आम्ही, हे केल नाही ते नाही चालणार नाही, घरची जबाबदारी घेवू आम्ही आई बाबां तुम्हाला सांभाळू, पण कोणीही आमच्या मधे मधे करायच नाही. मेधाला ऑफिस असत, आम्ही दोघ पुढच्या परीक्षा देत आहोत.

ठीक आहे.

खालच्या मजल्यावर सासू-सासरे मध्ये माया आणि रोहित आणि वरती अंकित आणि मेधा राहायला आले, जो तो ज्याच त्याच काम करत होते, सासुबाई सासरे दोघ आलटून पालटून मुलाकडे जेवायला येत होते, प्रत्येकाला आपली स्पेस मिळत होती.

हेच आधी सगळे नीट राहिले असते तर, घरकाम स्वयंपाक इतर गोष्टी काही विशेष नाही, ते काम जमत नसेल तर आपण मदतनीस ठेवू शकतो, तस न करता घरच्या सुनेला सवय नसतांना सगळ काम सांगायच, स्वतः काही करायच नाही, अति त्रास द्यायचा, हेच होत सगळीकडे.

एक दिवस सहन करण्याच्या पलीकडे होत सगळ मग घरचे सासू सासरे एकटे रहाताना दिसतात, लोक म्हणतात काय मुलगा सून आहे, पण आधी सासुबाई सासरे कसे वागले, त्यांनी काय केल त्यांनी हे नाही दिसत लोकांना.

जेव्हा त्या मुलीला सगळ्यात जास्त आधार प्रेमाची गरज असते तेव्हा तिला त्रास दिला जातो, कर्म वाईट असेल तर त्याच फळ तस मिळेल, त्यांना त्रास होणारच, आपल्याला प्रेम आधार हवा असेल तर आधी प्रेम आधार द्या दुसर्‍याला, तर ते परत येईल आपल्याकडे.

🎭 Series Post

View all