जरा समजून घ्या... भाग 3

वहिनी मी तुम्हाला म्हणायचो नाही का की नका करत जावू दिवस भर काम, जरा काहीतरी दुसरा छंद जोपासा, नोकरीचा बघा असं बोललं नव्हतं का कधी


जरा समजून घ्या... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.........

जलद कथालेखन स्पर्धा

विषय...नाती गोती
...

आता मेधा नोकरी शोधत होती, काम झाल्यानंतर बराच वेळ ती लॅपटॉप मोबाईल घेऊन बसत होती, तेच परत घरच्यांना खटकलं, सदोदित मोबाईल मध्ये बघत असते ही, कोणाशी बोलते काय माहिती.

ती जेव्हा कामात होती तेव्हा कोणी लक्ष द्यायच नाही की किती दमते ही, नुसत फोन हातात घेतला की सगळे बोलायचे, त्यामुळे आता या ही गोष्टीला मेधा घाबरून होती.

एका ठिकाणी इंटरव्यूचा कॉल आला, तिथे जायचं होतं पण घरातले सगळ काम करून निघाव लागणार म्हणून आज मेधा घाईत होती, खूपच धावपळ झाली एक दोन काम करायला जमलं नाही तिला, इंटरव्यूला गेली तिथे ती सिलेक्ट झाली,

आल्यानंतर घरातले तिची वाट बघत होते, स्पेशली सासूबाई आणि माया तिला खूप बोलल्या तिला , नोकरी मिळाल्याचा आनंद सुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करावसा वाटला नाही तिला , संध्याकाळी अंकित आल्यानंतर तिने सगळं सांगितलं. तो खूप खुश होता, हुशार आहेस तू मेधा मला खात्री होती तुला जॉब मिळेल.

दोघ बाहेर आले जेवायला सासुबाईंनी अंकितला खोलीत बोलवलं,.. "तुला पटत का अंकित मेधाच वागण, ती आज सगळ काम टाकून बाहेर गेली होती" ,

"आई इंटरव्यू होता तिचा आणि जॉब मिळाला तिला",.. अंकित.

"कस शक्य आहे घर काम कोण करेल मग" ,.. सासुबाई.

"हा काय प्रश्न झाला, नौकरी महत्वाची की घरकाम आई",.. अंकित ,

"घरच सगळ आवरून जाव लागेल मेधाला ",.. सासुबाई.

" तुम्ही काय करणार दिवस भर मग आता? ",.. अंकित चिडला होता, नुसत बसायच दिवस भर, माझी बायको काम करत रहाते, ते काही नाही नसेल होत तर मदतीला घ्या कोणाला तरी, सगळी अपेक्षा मेधा कडून करू नका.

" तू खूप तिच्या बाजूने बोलतो आहेस ",.. सासुबाई.

" साधी आहे मेधा, नाही बोलता येत तिला म्हणून मला बोलाव लागत, दिसत ना तुम्ही दोघी किती त्रास देता तिला ते",.. अंकित.

आता खूप अति होत आहे मेधा आपण याबद्दल स्टॅन्ड घ्यायला पाहिजे,

"अहो काय करता आहात तुम्ही, नका भांडू, मी बोलते ना त्यांच्याशी सावकाश",.. मेधा.

" मी तुझं बोलणं बघितलं आहे, एवढ्या सहा महिन्यात तू काहीही बोलली नाही फक्त सहन करत रहाते",.. अंकित.

सासुबाई माया खूप चिडल्या,.. "ही मेधा घरात फूट पाडत आहे आणि एकच्या दोन गोष्टी सांगत आहे ",

" तिने काही सांगितलं नाही, मला दिसत नाही का घरात काय चाललं आहे ते, आई आणि वहिनी तुम्ही दोघी अति गैरफायदा घेत आहात मेधाचा, ती करते तर तिला सगळं काम देत आहात, जरा तरी माणुसकीने वागा",.. अंकित.

" आता तुमची बायको काम करते तर दिसते इतके दिवस वहिनी काम करत होती ते नव्हतं दिसत ",.. माया.

" वहिनी मी तुम्हाला म्हणायचो नाही का की नका करत जावू दिवस भर काम, जरा काहीतरी दुसरा छंद जोपासा, नोकरीचा बघा असं बोललं नव्हतं का कधी ",.. अंकित.

" बोलले होते तुम्ही भाऊजी ",.. माया.

"मग तरी सुद्धा तुम्ही अस वागल्या, तुम्हाला स्वतःला अनुभव असतांना सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना त्रास दिला, का असं केलं तुम्ही, सपोर्ट करायला हवा होता तुम्ही मेधाला",.. अंकित.

माया काही म्हटली नाही.

"हे मला चालणार नाही यापुढे घरात माझी बायको एकटी काम करणार नाही ",.. अंकित.

" नसेल करायचं तर ठीक आहे तुम्ही तुमची तुमची सोय बघून घ्या, इथे आयत रहाता येणार नाही ",.. सासुबाई.

ठीक आहे.

🎭 Series Post

View all