सफर भाग-4

Another Beautiful Day For Vivan . Which Is Unforgettable For Him.

श्वेता -" मिस कॉल दिलाय. "


विवान -" बर.."

श्वेता -" बर बाय..."

विवान -" बाय..."

         ती जाताना परत एकदा एक क्युटशी स्माइल दिली. तो बघताच त्याच्या मनात एक वेगळीच झटका देवून गेली. आजचा दिवस त्याला खूप वेगळा गेला. तिचा नंबर तो सेव केला आणि घरी निघाला. आजचा दिवस आठवताना त्याच्या मनात वेगळीच प्रेमाची भावना निर्माण झालेली होती.

         आता त्याला खरी कॉलेजची मजा येणार होती. खूप काही विचार त्याच्या मनात येत होत्या . तसेच विचार करत तो घरी कधी पोहचला कळलच नाही . घरी पोहचताच काही वेळ तो फुकट घालवला . कॉलेज नुकतीच झाली होती , म्हणून अभ्यास काही नव्हताच . त्याच्या त्या सॅमसंग बटण असलेला मोबाइल घेतला . श्वेताचा नंबर बघितला . एकदा त्याच्या मनात आल कि कॉल करु का नको . त्याच्या मनातील दोन्ही पेहलू एकमेकांशी भांडत होते . एक म्हणत होत कि कॉल कर एक म्हणत होत कि नको करुस , ओळख तर आजच झाली . विवान मात्र डोक्यानं जास्त विचार करणारा होता . मग विचार करून कॉल न करण्याचा निर्णय घेतला .


          एक नवीन दिवसाची सुरुवात झाली . नेहमी प्रमाणे तो कॉलेजला निघाला . कॉलेजला जाताना तो नेहमी रिक्षा घेत होता . रिक्षामध्ये जात असताना त्याचा मोबाइल खिशात वाजला आणि लगेच बंद झाला . कसतरी धडपड करून खिशातून मोबाइल काढला . श्वेताच मिस कॉल येऊन गेला होता . हे बघून तो थोडा चकित झाला . कदाचित चुकून लागला असेल , अस विचार करून तो मोबाइल खिशात ठेवला . थोड्यावेळेने तो कॉलेजमध्ये पोहचला . सकाळच्या लेक्चरसाठी तो वर्गामध्ये पोहचला , तर तिथे जास्त कोण नव्हते . मुलात तर विवान एकटाच होता .


          काही मिनिटे झाले तरीही प्रोफेसर अजून आले नव्हते . कंटाळून विवान वर्गाच्या बाहेर आला . इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला पोहचताच त्याला कळाल कि डिपार्टमेंट उघडला होता , पण कोणीही तिथे नव्हते . हे बघून लेक्चर होणार नाही अस गृहीत धरून तो बाहेर आला . त्याला एक सवय होती कि जेंव्हा कधी फ्री टाइम असायचा , तो मोकळ्या असलेल्या वर्गात जाऊन बसत . पहिल्या मजल्यावरच्या सगळे वर्ग मोकळे होते . कारण तिथे सकाळी लेक्चर होत असतात . म्हणून तिथे कोणी लिखाण करण्यासाठी जात असत किंवा काही कपल्स सुद्धा तिथे आढळत , पण जास्त कोणी तिथे फिरकत नव्हते . आता मोकळा वेळ घालवण्यासाठी तो मोकळ्या वर्गात बसण्यासाठी जाऊ लागला . वर पोहचताच मोकळ्या वर्गाच्या शोधात फिरकू लागला .


         एका वर्गासमोरून जात असताना अचानक त्याच लक्ष वर्गात गेल . आतमध्ये श्वेता पहिल्या बाकावर बसली होती . कानात इअरफोन घातलेली होती व काहीतरी लिहीत होती . वन साईड बॅग बाजूच्या बाकावर ठेवली होती . तिच्या त्या टपोरे डोळे एकदा वरच्या वहीत बघत होते आणि नंतर स्वतःच्या वहीत बघत होते . ती लिहिण्यात व्यस्त दिसत होती . विवान तिला अस बघतच आतमध्ये आला . कोणीतरी आत आल्याची चाहूल लागल्यावर तिची नजर वहीवरुन वर गेली . विवानला बघताच पहिल काम ती कानातील इअरफोन काढली . स्माईल करत म्हणाली .


श्वेता - " हाय "


विवान -" हाय .."


श्वेता -" कॉलेजला इतक्या लवकर , कस काय ?"


विवान -" सकाळी माझं लेक्चर असत ."


श्वेता -" अच्छा .. कुठल लेक्चर ?"


विवान -" इलेक्ट्रॉनिक्स च लेक्चर .."


श्वेता -" ओ ...."


विवान -" तू इथे ? म्हणजे इतक्या लवकर ?"


श्वेता -" कालच प्रॅक्टिकल कंप्लिट करायचं आहे ना ?"


विवान -" अच्छा ... तू आता कॉल केली होतीस ?"


श्वेता -" अरे हो .... कंप्लिट झाल्यावर जर्नल देण्यासाठी कॉल केले होते . पण म्हणल कि तसही तू कॉलेजला येणारच होता , तर इथेच देऊयात ."


विवान -" ह्म ... मग झाल लिहून ?"


श्वेता -" नाही अजून ..."


विवान -" ओके ."


       तो ही तिथेच एका बाकावर बसला . ती परत लिहिण्यात मग्न   झाली . हा फक्त बसून मोबाइलला पाहत होता आणि तसही त्या मोबाइलमध्ये बघण्यासारखं काहीच नव्हतं . विवान फक्त तिच्यासोबत बोलण्यासाठी म्हणून थांबला होता . त्याच्या मनात बोलण्याची इच्छा तर होत होती . पण कालच ओळख झालेली मुलीला इतकं जवळीक नकोत म्हणून शांत होता . काहीवेळ असच गेल्यावर तो उठला आणि जात होताच इतक्यात ती म्हणाली .


श्वेता -" अरे तू चालास ?"


तो थांबला आणि मागे पाहत म्हणाला .


विवान -" थोडं काम होत म्हणून चालो होतो ."


श्वेता -" अच्छा ... मग तुला जर्नल नंतर दिल्यावर चालेल ?"


विवान -" हो चालेल ."


      एवढं म्हणत तो बाहेर जाऊ लागला . तिच्याशी बोलण्याची इच्छा त्याच्यात खूप होती . पण इतक्यात नको म्हणून मोह आवरला होता . बाहेर येऊन खाली जातच होता इतक्यात प्रदीपचा कॉल येत होता .


प्रदीप -" कुठं आहेस ?"


विवान -" कॉलेजमध्ये .."


प्रदीप -" कॉलेज मध्येच आहेस माहिती आहे , पण नेमकं कुठं आहेस ?"


विवान -" मेन इमारतीमध्ये . का रे ?"


प्रदीप -" काही नाही ... तू लायब्ररी मध्ये ये ."


विवान -" बर ."


      एवढं म्हणून तो लायब्ररीच्या दिशेनी निघाला . काहीवेळानंतर तो तिथे पोहचला . तिथे प्रदीप आधीच उभा होता .


विवान -" काय झाल ?"


प्रदीप -" काय नाही . तुझं लेक्चर झाल का?"


विवान -" नाही .."


प्रदीप -" प्रॅक्टिकलला अजून वेळ आहे . चल लायब्ररीला .."


विवान -" ओके चल ."


  लायब्ररीमध्ये गेल्यावर तिथली परिस्तिथी वेगळीच होती . म्हणजे वर्दळच चालू होती . जिथे शांत बसण्याच सूचना असत , तिथे वर्दळ होती . इतक्यात प्रदीपला कॉल आला आणि काम आहे म्हणून निघून गेला . पहिल्यांदा लायब्ररी मध्ये आला होता म्हणून नजर फिरवत होता . तेवढ्यात मागून आवाज आला .


आवाज -" विवान .."


विवान आवाजाच्या दिशेनी बघितला .


विवान -" अरे रोहित तू इथे ?"


रोहित -" हे तर मी तुला विचारणार होतो ."


     हा होता रोहित गोरे ... पाचवी पासून तो आणि विवान एकत्र शाळेत होते . दहावी नंतर मात्र रोहित आणि विवान दोघे वेगळ्या कॉलेजमध्ये गेले . त्या नंतर ग्रॅड्युएशन ला योगायोगाने ते परत एकत्र आले . थोडावेळ बाकीचे गप्पा झाल्या . रोहितचा भौतिकशास्त्रचा प्रॅक्टिकल होता आणि विवानचा रसायनशास्त्रचा प्रॅक्टिकल होता . केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल म्हणजे विवानचा अगदी नावडता प्रॅक्टिकल ... केमिस्ट्री आणि विवानच छत्तीसचा आकडा होता . त्याला हा विषय आवडत नव्हता . नाईलाज म्हणून तो हा विषय घेतला होता . इतर जण प्रॅक्टिकलसाठी रसायन घेण्यासाठी जाऊ लागले . विवानही तिकडे गेला . सगळेजण रसायन घेऊ लागले . तो मात्र मागे उभा होता आणि सर्वांच्या शेवटी रसायन घेणार होता . मागे उभा राहून तो सगळीकडे नजर फिरवत होता . तेंव्हा त्याला कळाल कि श्वेताही तिथेच प्रॅक्टिकल करत होती . तिची सुद्धा नजर योगायोगाने त्याच्या नजरेला भिडली . ती बघताच हात हलवत हळूच हाय म्हणाली . तो सुद्धा स्माईल करत हात हलवला आणि रसायन घेऊन स्वतःच्या टेबलावर गेला आणि प्रॅक्टिकल करू लागला . भलेही तो प्रॅक्टिकल करत असला तरी त्याची मन आणि नजर दोन्हीही श्वेताकडे बघत होते . काही वेळानंतर प्रॅक्टिकल संपल . श्वेता आधीच बाहेर गेली होती . तिला बाहेर जाताना पाहताच तोही गडबडीने प्रॅक्टिकल संपवला आणि बाहेर पडला . पण तिथे श्वेता नव्हती . बाहेर पडलाच होता तर तो कॅम्पस फिरू लागला . तेवढ्यात रोहित त्याला भेटला .


रोहित -" झालं का प्रॅक्टिकल ?"


विवान -" हो ... तुझ ?"


रोहित -" हो ... "


विवान -" मग आता कुठं ?"


रोहित -" बाहेर चालोय . वडापाव खायला . चल तु पण ."


विवान -" आता ?"


रोहित -" हो ... चल ."


       बाहेर निघताच थेट वडापाव खाण्यासाठी ठेला वर पोहचले . तिथली वडापाव खूप प्रसिद्ध होती . इतकं प्रसिद्ध होती कि अख्या कॉलेजचे मुलंमुली इथेच वडापाव खाण्यासाठी येत होते .


         वडापाव आणि गप्पाचे मिश्रण अगदी उत्तम होती . काहीवेळानंतर लेक्चरची वेळ होणार होती . म्हणून परत कॉलेजमध्ये दोघेही आले . मग लेक्चर सुरु झाले . रसायनशास्त्र सोडल्यास बाकी सगळ्या लेक्चर विवानला आवडत .

       शेवटचा लेक्चर संपत आलेली होती . इतक्यात विवानच्या मोबाइलवर मेसेज आला . हळूच खाली मोबाईल काढून मेसेज वाचू लागला . मेसेज श्वेताचा होता .

" After lecture , in the canteen.’


         हा मेसेज वाचताच तो मागे श्वेताकडे बघितला . ती भुवया वर करून विचारली . विवान फक्त अंगठा दाखवला . लेक्चर संपताच आधी सगळे मुली बाहेर आले . विवानही बाहेर आला . रोहित थोड्यावेळाने घरी गेला . विवान ठरल्याप्रमाणे कॅन्टीनमध्ये आला . कॉलेजमध्ये सर्वात शेवटचा लेक्चर होता . कोणीच विदयार्थी कॉलेजमध्ये नव्हते . कॅन्टीनही मोकळाच होता . तिथे गेल्यावर श्वेता वाट पाहत असल्याच त्याला दिसली . वन साईड बॅग घातलेली होती आणि हातात जर्नल होती .


श्वेता -" इतका उशीर ?"


विवान -" हो ... थोडा झाला उशीर ."


श्वेता -" थोडा ?"


विवान -" मग नाहीतर काय ? ... सर्वात आधी तुम्हा मुलींनाच गडबड असते लवकर बाहेर जाण्यासाठी . मग होणार नाही का उशीर ?"


तो चेष्टेच्या स्वरात म्हणाला .


श्वेता -" मग तुम्ही व्हायचं पुढं मग ?"


तीही चेष्टेत होती .


विवान -" ते म्हणतात ना \" लेडीज फर्स्ट \" त्याच पालन आम्ही करतो ."


    ती हसू लागली . हसताना ती अजून सुंदर दिसत होती . तो तिलाच पाहतच राहिला . थोडा वेळ अशेच गप्पा चालू राहिली . श्वेता मग हातातली जर्नल त्याला देऊ लागली .


श्वेता -" Thank you ."


विवान -" फक्त thank you ?"


श्वेता -" मग काय ?"


विवान -" आपण कॅन्टीनजवळ आहोत ."


श्वेताला त्याच इशारा समझून घेतली . ती कॅन्टीन वाल्याकडे वळाली .


श्वेता -" काका .... दोन चहा ."


विवान -" अग मी चेष्टा करत होतो . मला चहा नकोय . काका , एकच चहा द्या ."


श्वेता -" काका ... दोन द्या . अरे राहूंदेत . "


विवान -" अग नको मला .. खरच . काका एकच द्या ."


श्वेता -" अरे राहुदेत म्हणल ना . काका दोन द्या ."


काका -" आधी ठरवा एक देऊ का दोन .."


दोघेही एकमेकांना बघितले आणि हसू लागले .


श्वेता -" काका दोन चहा द्या ."


        काका दोन चहा दिले . ते घेऊन दोघेही बाजूला आले . चहा पीत दोघेही गप्पा मारू लागले . ती संघ्याकाळ विवानसाठी अगदी मस्त जात होती . हि एक नवी दोस्तीची सुरुवात होती . ती संध्याकाळ विवान कधीही विसरणार नव्हता .


******************************

क्रमशः


ऋषिकेश मठपती


मला माहिती आहे . खूप दिवसांनी हा भाग आलेला आहे . व्यस्त असल्या कारणाने लिहिण्यासाठी वेळच भेटत नव्हता . उशिरा भाग आल्याने माफी असावी . कृपया समजून घ्या . पुढचा भाग लवकर येईल . धन्यवाद ???