मुल मोठी करताना

मुलं मोठी करताना येणारी आव्हान

हो मुल मोठी करावी लागतात ती आपोआप मोठी होत नसतात , जशी आपल्याला एका रोपाची काळजी मशागत करावी लागते अगदी तशीच काळजी मुलांची करावी लागते डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं , रात्रीच्या साखर झोपेचा त्याग जेवणाच्या बिघडलेल्या वेळा , त्यांच्या सोबत अगदी लहान होवून खेळणं , हसणं आणि हे सगळं करताना कंटाळा येवून चालतच नाही , नाहीतर मुल रडायला सुरुवात करतात आणि ते काहीही करुदेत पण त्यांचं रडणं नको रे बाबा सर्वात मोठ शस्त्र आहे ते त्यांचं.. आणि ह्या सगळ्यात कधी नजर चुकीने किंवा आणखी काही कारणाने आपल लक्ष विचलित झाल तर काय घडू शकतं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे .
मला वाटतं माझ्या सर्व वाचकांना माहित आहेच मला दोन मुल आहेत आणि दोन्ही खूप मस्तीखोर आणि आगाऊ आहेत ,आणि दोन्ही लहान असल्याने खूप लक्ष द्यावं लागतं , सात दिवसांपूर्वी अशीच सकाळची गडबड चालली होती मोठ्या मुलाची स्कूल सकाळची असते त्यामुळे त्याला उठवा , डब्याची गडबड , सर्वच बायकांना सकाळी अगदी वायू वेगाने काम करावी लागतात तरीही गडबड होतेच , असो तर ह्या सर्व गडबडीत मुलाला उठवला त्याच आवरलं आणि मला डबा बनवायला वेळ झाला होता असल्याने माझा नवरा त्याला सोडतो बोलला , पण मुलांच्या कधी काय मनात येईल आणि कधी ते हट्ट करतील हे सांगता येत नाही , तो मी तुझ्यासोबत जाणार म्हणून हट्ट करत होता ,आणि मला समोर कामांचा ढीग दिसत होता पण मला माहित आहे मुलांचं एक खूप भयंकर शस्त्र असतं रडणं ,ते जर त्यांनी बाहेर काढल तर काही विचारताच सोय नाही , म्हणून मग माझे मिस्टर बोलले चल तू पण गाडीत लगेच सोडून येवू कामवाल्या ताई यायला देखील वेळ होता म्हणून मी पण तयार झाले , त्यात आमची लहान मुलगी झोपली होती मुलाची शाळा अगदीच जवळ आहे गाडीने तर अगदीच दोन मिनिट अंतर , मग आम्ही विचार केलं हिला घरीच ठेवून जावू असही तिच्या उठण्याची वेळ झाली न्हवतीच , म्हणून मग आम्ही जावून त्याला सोडून आलो ..
आम्ही गाडी पार्क करतोयच मला ओवीच्या रडण्याचा आवाज येत होता," मम्मी, मम्मी" करून ती रडत होती आम्ही पळतच गाडीतून उतरलो आणि वरती आलो , मिस्टरानी दार उघडलं पण काही उघडेना , त्यांच्या लक्षात आलं ओवीने आतून लॉक करून घेतलं होत , आमचा हा गोंधळ ऐकून शेजारी सर्व आलेच होते , मी तर रडायची बाकी होते पण अश्या वेळी ठाम व्हावं लागत मला शेजाऱ्यांनी तिच्याशी बोलत रहायला सांगितलं मी तिथेच दारात खाली बसले होते आणि माझं बाळ आत .मी तिच्याशी नेहमी सारख्या गप्पा मारत होते , ओवी बघ पेप्पा आली का ?चिऊ आली का ? ती फक्त दोनच वर्षाची आहे त्यामुळे ती कडी आतून काढणं शक्यच नव्हत ,जितूने तोवर किल्ली वाल्याला फोन केला आमचं नशीब चांगलं तो लगेच आला , त्याने बघितलं आणि सागितलं स्मार्ट लॉक वाली कडी नाही ,तर तिने स्टीलची कडी लावली होती आता दरवाजा तोडण्याशिवाय पर्याय न्हवता , जितुने ओवीला बेटा मला पाणीआण अस सांगितल आणि तिला दरवाजातून बाजूला केलं , आता सर्वजण दरवाजा तोडायला सज्जच होते इतक्यात जितु ने एकाच लथेत दरवाजा तोडला मी आणि सर्वच जण आवक होवून पाहतच राहिलो मी इतक्याही गंभीर परिस्थितीत त्याच्यकडे पाहतच राहिले आणि मनात म्हंटल "ओरे मेरे दया " (मला वाटतं मी आधी ओळख करून दिलेली नाही माझे मिस्टर वास्तुतज्ञ जितेंद्र कुलकर्णी हे आहेत )आम्ही आत आलो ओवी खूपच घाबरली होती आम्हाला पहिल्या पहिल्या बाबाच्या मिठीत शिरली , शेजाऱ्यनी देखील खूप मदत केली , आजच्या बिल्डिंग संस्कृतीत कोणी कोणाला मदत करत नाही पण आमच्या शेजाऱ्यांनी खूप चांगली मदत केली ...
असा प्रसंग झाला पण आम्हाला खूप काही शिकवून गेला लहान मुलासोबत एक कोणी तरी घरी हवाच, बऱ्याचदा आपण मुल इतका वेळ झोपेल म्हणून "खालीच तर जायचं आहे" दोन मिनिटात येवू , पण त्या दोन मिनिटात काय घडेल आपण सांगू शकत नाही , आणि खरच मला त्या दिवशी पटल लहान मुलांसोबत असंन काही साधं काम नाही आपण खरच हे खूप मोठं काम करतोय ,आणि हे पण समजल आपली अगदी छोटीशी हलगर्जी आपल्याला खूप महागात पडू शकते , मुलांच्या आई वडिलांना पोलिसा सारखं सतत सतर्क राहावं लागतं आणि हे छोटे बदमाश सतत काही तरी कारवाया करत
राहतात ... गमंत अशी त्या दिवसानंतर मी जितुला आता बोलते "दया तोड दो ये दरवाजा " आणि आम्ही दोघंही खूप हसतो आणि आमची लबाड मुलगी आम्हाला बघून ती पण हसते ...
लहान मुलांसोबत आई वडिलांच्या अश्या खूप आठवणी असतातच तुमच्या देखील अश्या तुमच्या चिमुकल्या सोबतच्या आठवणी नक्की कमेंट मध्ये लिहा ...
@मुलांसोबत पालकत्वाचा प्रवास शिकणारी अवंती कुलकर्णी...