प्रेम तुझ्यावर करते खूप ,पण
ते व्यक्त करता येत नाही
आजकाल तुझ्याविना दुसर
काही मला सुचत नाही
आकाशाचा जर केला कागद
आणि समुद्राची शाई
तरी सुद्धा तुझ्यावरचं प्रेम
लिहून व्यक्त करता येणार नाही
क्षणभर ही विसर तुझा
पडत नाही मनाला
बोल्याशिवाय तुझ्याशी
चैन पडत नाही जिवाला
कसतरी होत अस सारखचं
म्हणते मी
पण बोलताना तुझ्याशी
सर्व काही विसरते मी
प्रेमळ तुझे शब्द
मनाला स्पर्शुनी जातात
आठवण जेव्हा तुझी येते
आश्रू डोळ्यात येतात
एकांतात बसल्यावर
तुझा भास मला होतो
जवळ नाहीत तु कळल्यावर
खुप त्रास होतो
सर्व वाचकांना माझी कळकळीची विनंती आहे. माझ्या पोस्ट आवडल्या तर नक्की लाईक करा ,कमेंट करा आणि माझ्या नावासोबत शेयर करायला विसरु नका. काही चुका असतील तर मला नक्की सांगा. मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा