Feb 23, 2024
माहितीपूर्ण

जोहान्स केप्लर............ कॅलेंडर मेकर

Read Later
जोहान्स केप्लर............ कॅलेंडर मेकर

               ' I used to measure the heavens, now I shall  major the shadows of the earth. Although my soul was from heaven,the shadows of my body lies here'.

              हे सार्थ शब्द आहेत केप्लरच्या थडग्याजवळ कोरलेल्या शिलालेखांवरचे. महायुद्धात केप्लरचे थडगे नष्ट झाले आणि हा दगड तेवढा शिल्लक राहिला. 27 डिसेंबर पंधराशे 71 मध्ये जर्मनीत जोहान केप्लर चा जन्म झाला. ताऱ्यांविषयी अभ्यास करायचा या ध्येयाने प्रेरित होऊन सतत ताऱ्यांचा अभ्यास करतच तो मोठा झाला. तार्‍यांशिवाय त्याने गणिताचा हि खूप अभ्यास केला. ग्रहताऱ्यांच्या स्थितीवर अवलंबून असलेल्या धार्मिक सणांच्या तारखा काढणे  , हे तेव्हा फारच अवघड समजले जाईल वयाच्या . वयाच्या तेविसाव्या वर्षी केप्लर कॅलेंडर बनवण्यात तज्ञ बनला होता.

                १५९७ मध्ये केप्लर ने त्याचे पहिले महत्त्वाचे संशोधन 'द कॉस्मोग्राफिक मिस्ट्री' प्रसिद्ध केले.दूरवर असणार्‍या ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर त्याने दाखवून दिले होते. कोपर्निकसच्या मतांचा पाठपुरावा करत पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे हे प्रतिपादन केले. १६०० मध्ये तो एम्पीरियन रुडाल्फ च्या दरबारात गणितज्ञ म्हणून काम पाहू लागला .त्या काळी हे अत्यंत मानाचे पद होते .केप्लरचा ताऱ्यांविषयी चा अभ्यास सुरू होता . त्यानंतर त्याने मंगळाची कक्षा लंबगोल असल्याचा शोध लावला . केप्लरने मुख्यतः खगोलशास्त्राच्या अभ्यासावर भर दिलेला असला तरी त्याचबरोबर त्यांने  इतर शाखा शास्त्र आणि गणिताचा ही खूप अभ्यास केला .ज्यायोगे ताऱ्यांचा सखोल अभ्यास करणे त्याला अधिक सोपे झाले.


फोटो आणि माहिती    -   साभार गुगल

(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेली असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


(वाचकहो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि आपली मत नक्की कळवा)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//