जीवनातील गुरु

Marathi Katha



रिया आणि सोहम दोघांनी लवमँरेज केले होते. दोघांचे लग्न होऊन तसे सात- आठ वर्षे झाली होती. पण अजून दोघांना मुल झाले नव्हते. रियाला खूप काळजी वाटत होती .सतत चिंतेत असत होती .सर्व दवाखाने झाले उपास-तपास झाले. तरी देखील रियाला मूल होत नव्हते. मग त्या दोघांनी निर्णय घेतला. आपण आपण अनाथ आश्रमातून एक मूल दत्तक घ्यायचे. मग दोघेजण अनाथाश्रमात केले. आणि तिथे लहान मुलांना बघून त्यांना खूप गहिवरून आले .त्यांनी तेथे असलेल्या एका लहान एक वर्षीय मुलीला दत्तक घेतले.

त्या मुलीला घेऊन ते घरी आले.रिया त्या मुलीचा सांभाळ अतिशय उत्कृष्ट रितीने करत होती. त्या मुलीला जेवायला घालण्यापासून ते खेळण्यापर्यंत सर्व काही रिया अगदी आनंदाने करत होती. सोहम देखील मुलीला हवे नको ते बघत होता. त्या मुलीचे नाव" दीप्ती" ठेवले होते .

रिया आणि सोहम दीप्तीचा संगोपन अगदी योग्य पद्धतीने करत होते. तिला कधीच कुठली कमी केली नाही .आणि तिला योग्य ते संस्कार दिले. शाळा शिकून तिला मोठे केले आणि ती डॉक्टर बनली. एके दिवशी ती नोकरी करिता काही कागदपत्रे शोधू लागली .तेव्हा तिला दत्तक पत्र दिसले .आणि तिला गहीवरून आले. ती आई-वडिलांना मिठी मारून तुम्हीच माझे खरे गुरु आहात. तुम्ही माझे खूप चांगले पालन पोषण करून मला जीवदान दिले. त्याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजते असे म्हणू लागली.