Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

. जीवनात लाभलेले गुरूजन...

Read Later
. जीवनात लाभलेले गुरूजन...
जीवनाची वाट चालतांना आपण वाटसरूची भुमिका बजावतो पण वयाच्या टप्प्यावर मार्ग दाखवणारे गुरु आपल्याला भेटत असतात..

ऋणांचे गुण मनी बाळगावे..
आयुष्याचे गुपित जाणुन घ्यावे...
मार्ग दाखविणार्यास गुरूस्थानी मानावे..
शिकवत जावे वयपरत्वे....

किती खर आहे नाही हे जीवनात...जन्मझाल्यापासुन एक एका टप्प्यात आपण शिकत जातो पण ते शिकवणारा पहिला गुरू लाभतो ती म्हणजे "आई"

आई माझी गुरू ..
आई कल्पतरू..
आई वाटसरू...
माझ्या जीवनाची...

आई जे शिकवते ते अनमोल असत जीवनात... आईसारखी गुरू न होणे आहे...आपल्या बाळाचे सतत भले चिंतणारी आई ..जीवनात सतत पाठिशी असते..भल्याबुर्याची जाण हि आईच तर करुन देते..बोट धरून जीवनाची वाट ती शिकवत असते...म्हणुनच "आई"हि आपली पहिली गुरू..

आईनंतर दुसरे गुरू म्हणजे "वडिल".

समाजात देई मान,
त्याच्यां नावाचा सन्मान,
समाजमनाचे भान
शिकवी तो मायबाप....!...

जीवनात येणार्या कठोर प्रसंगातुन वाट काढत..जनमानसात वावरण्याचे तंत्र शिकविणारा पिता ..वत्यांचा आशिर्वादरूपी हात कायमच सोबतीला असतो..नाही का?..प्रसंगावधान,भान,सहनशिलता व निर्णयक्षमता आपल्यात येते ती पित्याकडून म्हणुन पिता हे आपले दुसरे गुरू...

जीवनातील घरातला बालपणाचा काळ सरला कि मग जीवनात शिक्षणाला सुरवात होते आणि ह्या प्रवासात खरी आयुष्याची खरी जडणघडण सुरू होते...त्यात महत्वपुर्ण भुमिका बजावतात ते म्हणजे "शिक्षक"..ह्या गुरूंचे स्थान जीवनात आनन्य साधारण असत..म्हणुन तर कोणतेही कार्य करतांना 

गुरु ब्रम्हा गुरूर विष्णु...
गुरू देवो महेश्वरा..

असे गुरूंचे नामस्मरण आपण करतो...गुरू सांगेल ते सार आपण आचरणात आणतो विद्येसोबत ..चांगल्या वाईटाची जाण ...व सदगुणांची पेरण करतात ते शिक्षक...खरी गुणाची चाळण होते ती  आपल्या वयाच ह्या टप्प्यावर...शिक्षकांबरोबर ह्या पायरीवर आपल्याला भेटतात गुरूरुपात मित्र-मैत्रिणी योग्य वळणावर योग्य ठिकाणी योग्य सल्ला देत जीवनात घडणार्या चुका टाळण्याचे व योग्य मार्ग दाखवण्याचे त्यांचेही कार्य मोठेच 
म्हणुन तिसरे गुरू म्हणजे "मित्र"

मित्रासारखा गुरु,
लाभणे अनमोल,
योग्य अयोग्यतेचे भान
सदा करवून देई...!

शिक्षक,मित्र,आईवडिलांनंतर आयुष्यात लाभणारा एक सच्चा गुरू म्हणजे ,"जिवनसाथी".
आपल्या जीवनाचे सारथ करतांना सतत आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याच काम जीवनसाथी करत असतो...

जीवनाची वाट 
सोबतीने चालती
सुख दुःखाचा सोबती,
साथ करतो "जिवनसाथी"..!

आपण कधीच चुकीच्या वाटेवर जाऊ नये म्हणुन जिवनसाथी सतत प्रयत्नशिल असतो..म्हणुन तोही गुरूस्थानीच असतो ...

जीवनसाथीनंतर आपली मुलही ...आपल्याला योग्य निर्णयक्षमता देण्यात मदत करतात जुन्यासोबत नविन जगाशी सांगड घालण्यात मदत करणारे..नवविचारी ..नवप्रवाहात आणणारे हे गुरूच की..!

ह्या सार्यांसोबत खरतर जीवनात अनेक प्रसंग येतात त्यात संपर्कात येणारे नातलग,शेजारी,सहप्रवासी,सहकारी ...यांच्याकडूनही जीवनाचे बालकडू आपण शिकत असतो...शेवटच्या क्षणापर्यन्त मनुष्य शिकत असतो व त्या त्या टप्प्यावर हे अलौकिक गुरूजण त्यास लाभत असतात...गुरूचे न वय असते ना गुरू छोटा मोठा असतो...योग्य गोष्टीची शिकवण देणारे जीवनात येणारे गुरूच आपले जीवन धन्य करतात ...

गुरूंचा आधार जीवनात राही,
जीवनास माझ्या आकार देई,
चराचरात गुरुंचा भास मज होई,
शिकवत जाई रोज मज जीवनाचे सार...!

जीवनात लाभलेल्या सर्व गुरूजनांना गुरूपौर्णिमेच्या हर्दिक शुभेच्छा..!


®वैशाली देवरे...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vaishali Deore

Housewife

मी कोणी महान लेखिका नाही...शब्दांना थोडासा साज देण्याचा प्रयत्न बस

//