जिवलगा.... मला तू हवा आहेस

रोहित सांसारिक होता वीणा करिअर ओरिएंटेड, रोहितला लहान मुलांची खूप आवड होती, त्याला फॅमिली सुरू करायची होती, वीणाचे खूप लाड करणार होता तो, या वीकेंडला तिच्याशी बोलायच ठरवला त्याने ,

वीणाला आज ऑफिसला सुट्टी होती, आवरायची घाई नव्हती , हातात चहाचा कप घेवून ती बाल्कनीत आराम खुर्चीवर येवून बसली,

बाहेर कुंद वातावरण होत, कुठल्याही क्षणी पावसाला सुरवात होवू शकते असे वाटत होते, आणि पाऊस पडायला लागला, मनमोहक टपोरे पाण्याचे थेंब बाल्कनीत येवून पडत होते, कितीतरी वेळ ती एकटक पाऊसाकडे बघत बसली होती, आत जावून बसायचा भान नव्हत तिला,

पहिल्या पासून पाऊस खुप आवडत होता तिला , किती तरी वेळा छत्री असूनही ती अशीच पावसात भिजत घरी यायची, मनमोहक वातावरणात भान हरापायची ती

पण या वेळीचा पावसाळा अगदी एकटा होता, सुना सुना......... करमत नव्हत तिला घरात उगीच पावसाकडे बघून तिला जुने दिवस आठवले

वीणाच लहानपण छोट्याश्या गावत गेल, मुसळधार पाऊस कोसळायच्या गावात , अगदी सतत धार लागायची, सगळे कंटाळून जायचे पावसाला, वीणा मात्र खुश असायची,

पुढे ते शहरात शिफ्ट झाले, ईकडे तो कोसळणारा पाऊस खूपच वेगळाच भासला तिला , कितीही पाऊस असो शहरातील लोकांच काम कधी थांबलं नाही,

अश्याच एका रम्य संध्याकाळ पाऊस कोसळत होता, वातावरण अगदी छान गार झाल होत, वीणा ऑफिस हून घरी जाण्यासाठी बस स्टॉप वर बसची वाट बघत होती, गुलाबी ड्रेस मध्ये ती त्या दिवशी अतिशय सुंदर दिसत होती

रोहित त्याच बस स्टॉप वरुन घरी जायचा रोज, तिथेच ऑफिस होत त्याच, तसे वरचे वर नेहमी बघायचा तो वीणाला

तो बस स्टॉप वर आला सुंदर वीणा कडे बघत राहिला , बस स्टॉप वर अजून कोणी नव्हत, पावसामुळे बस येत नव्हती, रोहितने टॅक्सी केली, तुम्हाला सोडू का मी घरा पर्यंत वीणाने होकार दिला, हळू हळू त्यांची ओळख वाढली, ओळख प्रेमात कधी बदलली समजल ही नाही,

दोघांनी घरी सांगितल, घरून होकार होता, दोघ अगदी अनुरूप होते एकमेकांसाठी, रीतसर लग्न झालं , एकदम छान सुरू होता त्यांच , लग्नानंतर पंधरा एक दिवसात दोघ परत ऑफिसला जायला लागले, इतर दिवशी ऑफिस वीकएंडला बाहेर जायचे ते मस्त , पार्टी एन्जॉयमेंट सुरू होती ,

रोहित सांसारिक होता वीणा करिअर ओरिएंटेड, रोहितला लहान मुलांची खूप आवड होती, त्याला फॅमिली सुरू करायची होती, वीणाचे खूप लाड करणार होता तो, या वीकेंडला तिच्याशी बोलायच ठरवला त्याने ,

संध्याकाळी वीणा घरी आली तिच हाका मारत, रोहित चल आटोप लवकर आज पार्टी करणार आहोत आपण.... माझ्या कडून पार्टी,

झालाय काय पण,... रोहित उत्साही होता

अरे चल ना सांगते रस्त्यात ,

दोघं निघाले त्यांच्या आवडत्या हॉटेल मध्ये पोहोचले ,

रोहित मला प्रमोशन मिळालय, पहिले सहा महिने ट्रेनिंग साठी जाव लागेल , वीणा भरभरून बोलत होती

रोहित गप्प होता ,

काय झाल रोहित बोल ना काहीतरी, तुला नाही आवडल का माझ प्रमोशन झालंय ते? ,..... वीणा अंदाज लावत होती

तस नाही वीणा पण आपण फॅमिली स्टार्ट करणार होतो ना, किती स्वप्नं बघीतली होती मी, आता हे नवीन प्रमोशन म्हणजे परत एक वर्ष थांबा,

R u serious रोहित , तुला कळतय का किती मोठी achivhament आहे ही , ऑफिस मध्ये सगळे टपून बसले होते या जागेसाठी , मी माझ्या हुशारीने मिळवलय हे आणि माझा स्वप्नं होतं या position वर येणे ,

अग स्वप्नं पुर्ण होतील पुढे, आयुष्य पडलय त्या साठी आता आपल वय आहे, तू विचार कर,.... रोहित समजावत होता

मला काही ऐकायच नाही, उद्या निघते आहे मी, सकाळची फ्लाइट आहे, ट्रेनिंग उद्याच सुरु होईल ,..... वीणा ठाम होती

प्लीज अस करू नकोस वीणा, माझा जरा तरी विचार कर, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय ,.... रोहित काकुळतीला आला होता, तिला विनवत होता

तुझाच विचार करते आहे मी रोहित आपल्या भविष्याचा विचार करते आहे तुला समजत नाही का?.... वीणा चिडली होती

मला तू हवी आहे आपल मुल हव आहे जास्त अपेक्षा नाहीत ग माझ्या..... रोहित

वीणाने काहीही ऐकल नाही, निघून गेली ती सकाळी,

इकडे रोहित एकटा पडला, वीणाला फोन केला तरी ती नीट बोलत नसे , कामात बिझी झाली होती ती,

ट्रेनिंग संपली तिथून वीणाची बदली दुसर्‍या शहरात झाली , रोहितने शिफ्ट व्हायला नकार दिला, त्यांच्यातील अंतर वाढत गेला आणि रोहितने वीणाला घटस्फोटाची नोटिस पाठवली......

सुरुवातील काही वाटल नाही वीणाला, ऑफिस कामात झोकून घेतल तिने स्वतःला, थोड्याच दिवसात तेच तेच काम करून वीणा कंटाळली, एकटी पडत गेली, काय नव्हत तिच्याकडे आलिशान फ्लॅट, गाडी, पोझिशन पण तिचा रोहित नव्हता... त्याच्या आठवण वेड करायची तिला,

दोन तीन दिवस लागून सुट्टी होती, आई कडे जाणार होती ती , नको वाटायच त्या शहरात जायला आता , रोहितच्या आठवणी होत्या तिकडे, त्या आठवणी त्रास द्यायच्या तिला

विमान लॅण्ड झाल, बाबा आले होते घ्यायला , वीणा घरी गेली, आराम झाला... आईने आवडीचे पदार्थ केले होते,

आईने विषय काढला,

काय ठरवल पुढे तू वीणा? , लग्न करणार की नाही,

आई उगीच तोच तोच विषय काढू नकोस, दोन दिवस आली तर नीट राहू दे मला,.... वीणा वैतागली होती

आई शांत झाली,

वीणाला वाटल उगीच बोललो आईला, आई तुझ्यासाठी येते मी एवढ्या लांबुन , उगीच लग्नाचा विषय नको घेत जाऊ, मला नाही करायचय लग्न आता,

अग पण आम्ही आहोत तोवर ठीक आहे, नंतर कस होणार? पूर्ण लाइफ पडल आहे पुढे..... आई कळवळून बोलली,

होईल जस व्हायच तस, प्रेम एकदाच होता, सारखं नाही, पण प्लीज आता हा विषय नको,

म्हणजे तुझ अजुन रोहित वर प्रेम आहे? आई विचारत होती, त्याला भेटत का नाहीस मग?

हो आई मी रोहित शिवाय कोणाचा विचार करू शकत नाही आयुष्यात,

दुसर्‍या दिवशी वीणा आई सोबत खरेदीला गेली मॉल मध्ये, थोडी खरेदी झाली, तेवढ्यात तिला रोहित बाहेरून जातांना दिसला, ती बाहेर आली, तो बाजूच्या दुकानात खरेदी करत होता,

काय कराव जावून बोलाव का त्याच्याशी? वीणा विचार करत होती.....

Hi वीणा..... रोहित तिच्या बाजूला उभा होता,

काय बोलाव सुचत नव्हते तिला,

कशी आहेस? ,

मी ठीक आहे,

तू कसा आहेस? ,

कसा असणार तुझ्या शिवाय,..... वीणाने चमकून बघीतल,

मला बोलायच आहे तुझ्याशी वीणा,

Ok उद्या भेटू मग,

नाही आत्ताच बोलायचय... रोहित हट्टाला पेटला,

वीणाला खर तर त्याचा हा हट्ट आवडत होता.... पण ती काही बोलली नाही,

दोघ आईला सांगून कॉफी शॉप मध्ये आले,

लग्न करशील माझ्याशी वीणा परत .... मी तुला विसरू शकलो नाही, तुझाच विचार करतो मी दिवस रात्र,...... रोहित एकदम बोलून गेला,

मला माफ कर, उगीच तुला घटस्फोट दिला, थोडा सपोर्ट करायला हवा होता मी,..... रोहित

माफी तर मी ही मागायला हवी, मी ही तुझा अजिबात विचार केला नाही, फक्त माझ स्वप्न... माझ काम, याला महत्व दिलं,.... वीणा

दोघ बरेच वेळ बोलत बसले होते, दोघांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता

एक चांगला मुहूर्त बघून दोघांच लग्न झाल,

रोहितने वीणाच्या आईचे आभार मानले.... त्यांच्यामुळे आज ते एकत्र होते, पण या वेळी कधी ही वेगळे होणार नव्हते ते.

या वर्षीचा पावसाळा जरा जास्तच छान होता वीणा रोहित साठी.....

©️®️शिल्पा सुतार