जीवनातील आदर्श भगवद् गीता

गीतेचे थोडक्यात सार


जीवनातील आदर्श....भगवतगीता.
                         जय श्री कृष्ण
आयुष्य जगताना खुप काही घडामोडी रोजच्या जीवनात अनुभवता आल्या. काही क्षण सुखद होते तर काही असह्य वेदना देणारे.भोवताली असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या अनुभवाप्रमाणे वा स्वतःच्या कुवतीनुसार साथ दिली आणि मार्गदर्शन ही केले. कधी ते पटले तर कधी नाही.

ज्यावेळी भगवतगीता वाचली त्यावेळी ज्ञात झाले की जो काही चांगला वाईट अनुभव मला माझ्या जीवनात आला तसा तो इतरांच्या जीवनात त्यांना कित्तेक पटीने वेगळा असतो, कारण नियतीने प्रत्येकाचा जीवनपट वेगवेगळा चितारलेला असतो. प्रत्येक प्राणिमात्र स्वतःच्या कर्मानुसार स्वतः चे जीवन अनुभवत असतो. जसे वर्षभराचे transaction नीट नसेल तर आपली balancesheet जशी financial year च्या अखेरच्या टप्प्यात कोलमडते तसेच आपले जीवन असते. कर्माची ही गाडी कित्तेक जन्म घेऊन धावत च असते. जसे balansheet tally होण्याचे खूप काही नियम असतात तसेच आपली कर्म आपण करत असताना जीवनात काही नियम पाळावेच लागतात. प्रॉफिट, लॉस (सुख-दुःख) असे  अनेक टप्पे पार पाडून ते साध्य होत.

काही वेळा सुरळीत होऊनही हव्यासापोटी आपण खूप काही गमावून बसतो. मनुष्य हा खूप काही गोष्टी मिळवण्याच्या हव्यासापोटी मायेच्या जाळ्यात गुरफटत राहतो. कारण स्वतः तो केवळ भौतिक जगात वावरून सुखाचा च विचार करतो.आणि ते सुख मिळवण्यासाठी तो स्वतःला च हरवून बसतो. तो इतरांचं मूल्यमापन ही स्वतःच्याच तराजूत करतो. मी काय करतो हे शोधण्या पेक्षा समोरचा काय करतो ह्याकडे जास्त लक्ष देतो.त्यातूनच स्पर्धा निर्माण होते, आणि त्यातून च इर्षा निर्माण होऊ लागते. एकूण काय परत कर्माची balansheet कोलमडू लागते.

असे मनुष्य स्वतःच्या चुकी मुळे करतो. जसे सुख असो वा दुःख आपण आपल्या प्रियजनांना बोलावतो.अगदी त्यांची आठवण काढतो,पण आपण ज्यांना प्रिय असतो त्यांना आपण विसरतो. मग कधी तरी देखल्या देवा दंडवत म्हणून त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी आठवतो.तेव्हा थोडीच ते आपल्याला ओळख दाखवणार हे लक्षात आपल्याच येत नाही आणि परत त्यांना च दोष द्यायला सुरुवात करतो. अगदी तसेच भगवंतांच्या बाबतीत ही आपण करतो. गरज असेल तेव्हा त्याला आठवतो आणि तो मदत करत नाही अशी त्यालाच दूषणे देतो तेही अगदी स्वतःच्या सोयीप्रमाणे.

जर आपली कर्म नीट असतील तर आपल्याला कोणत्याच बाबतीत घाबरायची गरज नसते. एवढा सुंदर आदर्श भगवतगीतेने माझ्या समोर मांडला आहे. त्यामुळे जणू काही मी इतर काय करतात ह्या कडे लक्ष देण्यापेक्षा मी कोण?मी काय करते?ह्या कडे जास्त लक्ष दयायला शिकली.
#कृष्णवेडी
सौ. प्राजक्ता हेदे(बोवलेकर)