जीवनाच्या उतारवयात.. सोबती तू आणि मी भाग 3 अंतिम

Sobat tuzi ni mazi

जीवनाच्या उतारवयात सोबती तू आणि मी भाग 3 अंतिम

माधवी नसल्यामुळे घरातलं सगळं काम नेहा वर पडलं. 

समीरला काम करायची सवय नसल्यामुळे त्याची काहीच मदत होत नव्हती.समीर लहानाचा मोठा झाला पण कधीच त्याने कुठलंच काम केलं नाही, स्वतःसाठी पाणी तरी घ्यायचा नाही, माधवी सगळं हातात द्यायची. 

नेहाला सकाळी उठून नाश्ता, स्वयंपाक सगळं करावं लागायचं, तिची चिडचिड व्हायला लागली. 

नेहा: “समीर काही तरी हेल्प कर ना रे, कधीची मी एकटीनेच सगळं करतीये.” 

समीर: “ये नेहा मला यातली काहीच सवय नाही ग,मी कधीच कोणतं काम केलं नाही, आई सगळं हातात द्यायची.” 
नेहाला सगळी काम करून वैताग यायचा. दोघांनाही आईची कमतरता भासायला लागली. 

नेहा: “समीर आई होत्या तर किती काम करून घ्यायच्या, आपण त्यांना उगाच बोलायचो की तुम्ही दिवसभर घरीच असता.घरी असूनही त्या दिवसभर कामच करायच्या रे, हे आपल्या लक्षात आलंच नाही.” 

समीर: “हो ग , मी पण उगाच बोललो आईला.मी फोन करतो आपण बोलूया तिच्याशी, त्यांना समजावून इकडे बोलवूया.” 

समीरने बाबांना फोन केला. 

समीर: “हॅलो बाबा, समीर बोलतोय.कसे आहात तुम्ही?आई कशी आहे?.” 

गणपतराव: “ठीक आहोत आम्ही दोघेही,  मस्त आनंदात आहोत. तू सांग आज आमची आठवण कशी आली?” 

समीर: “बाबा मी काय म्हणतो , बरेच दिवस झालेत तुम्ही तिकडे जाऊन आता या ना परत. आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे.” 

गणपतराव: “आमची आठवण येतेय की तुमच्याने घरची कामं होत नाही आहेत म्हणून आठवण येत आहे.” 
समीर: “नाही नाही बाबा, तस नाही आहे.” 

समीर अजून काही बोलणार बाबांनी फोन ठेवला. 

फोन ठेऊन गणपतराव पलटले तर मागे माधवी उभी होती, तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात आनंदाश्रु होते. 
गणपतरावांनी  माधवीला जवळ घेतलं. 

गणपतराव: “आता रडायचं नाही, जीवनाच्या या उतारवयात तू आणि मी सोबती आहोत आणि राहू.” 

काही महिन्यानंतर गणपतराव आणि माधवी शहरात फ्लॅट मध्ये राहायला आले. 

पेन्शन असल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू भक्कम होती, त्यांना कुणाच्याही आधाराची गरज नव्हती. दोघेही एकमेकांना सांभाळायला समर्थ होते. 

...................... 

गणपतराव आणि माधवी पिक्चरला गेले. पिक्चर बघून थेटर मधून बाहेर आले तर त्यांना बघून टवाळकी मूलं हसायला लागली. 

“हे बघा दोघे म्हातारे, पिक्चर बघायला आले.हे वय आहे का?” 

अस म्हणून ते जोरजोरात हसायला लागले. 

त्यांचं बोलणं ऐकून गणपतरावांना राग नाही आला उलट ते त्या मुलांकडे गेले. 

गणपतराव: “मुलांनो अगदी बरोबर बोललात तुम्ही? हे वय आहे का?पण मुलांनो मी आज तुम्हाला सांगतो. मी लहान होतो तेव्हा माझा सगळा वेळ शिक्षण आणि अभ्यास यात गेला त्यामुळे मी कधी पिक्चरला गेलोच नाही, त्यानंतर नोकरी लागली मग घरच्यांना मदत म्हणून बाहेर कधीच पैसे उडवले नाहीत. मग लग्न झालं संसार सुरू झाला, मुलं झाली त्यांनतर त्यांच्या संगोपनात काही कमी पडू नये म्हणून आम्ही कधीच बाहेर खर्च केला नाही. 

आता मुलांची लग्न झाली, ते त्यांच्या संसारात रममाण झालेत. 

आता आमच्याकडे वेळही आहे आणि पैसाही आणि अजून एक महत्वाच जीवनाच्या या उतारवयात आम्ही सोबत आहोत. हे सुख खूप कमी लोकांना मिळतं. 
आम्ही भाग्यशाली की आम्ही सोबत आहोत.” 

समाप्त: 

खरच जीवनाच्या उतारवयात कोणी सोबत नसलं तरी चालतं, पती- पत्नी सोबत असायला हवेत.

त्यांना एकमेकांचा आधार असतो, मुलं स्वतःच्या स्वार्थसाठी आई वडिलांना जवळ ठेवतात आणि स्वार्थ संपला की दूर लोटतात. त्यांनी दूर करायच्याआधीच  स्वतःच दूर गेलेलं बर. गणपतराव आणि माधवीने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे शेवटचे दिवस सुखकर झालेत, एकमेकांना वेळ देता आला, काही क्षण एकमेकांसोबत जगता आले. 

🎭 Series Post

View all