जिवन

Self love

प्रत्येक क्षणाला रुप बदलते

त्याचेच नाव हे जिवन असते

ऊन-सावलीचा खेळ हे जिवन 

प्रत्येक क्षण हा घ्यावा जगून

उद्याचा विचार द्यावा सोडून

सुख-दु:खाची सांगड घालावी

नैराश्या वर मात करावी

साथ असो वा नसो कोणी

स्वतःशीच मैत्री मात्र नक्की करावी