Feb 24, 2024
प्रेम

जीव गुंतला....

Read Later
जीव गुंतला....

“कधी आयुष्यात काय प्रसंग घडेल सांगता येत नाही”

 

“समजनं आणि समजुन घेणं ह्याच्या पेक्षा मोठी गोष्ट नाही...”

“आयुष्य संपूण जाते, प्रमाणिक माणसाचे खरं खोटं सिद्ध करण्यात...”

 

“ कधी कधी ऐकण्यात आणि बघण्यात चूका होऊ शकतात म्हणून का मनुष्य चुकीचा ठरावा?...”

 

“ आपण रस्त्यावर अपघात होताना पाहतो त्यात कित्येक वेळा चुक दुसर्याची असते आणि प्राण गमवावा लागतो दुसर्याला...”

 

असाच एक प्रसंग डोळ्यासमोर घडला...

हॉस्पिटल मध्ये मधुरा नावाच्या स्त्रीला एडमिट केले होते . अचानक पोलिस येताना पाहून तिच्या समोर बसलेला तिचा नवरा आणि ती दोघेही दचकले आता काय बोलावे नि काय नाहीं हेच तिला सुचत नव्हते.

 

“तुम्हाला माहित आहे आत्महत्या कायद्याने गुन्हा आहे..”

अस म्हणत हवालदार तिच्या नवऱ्यावर ओरडला

 

“ टाकू का आत, बोल खरं खरं काय झाले ते सांग?

नाहीतर मार खायला तयार हो..... तेवढ्यात मधुरा बोलली

 

“नाही साहेब, काही नाही झाले ...

 

श्रीधर: साहेब थोडा गैरसमज झाला नि सर्व असे घडले , चुकी माझीच आहे... हवालदारानी दम देत दोघांना म्हटले....

 

“ मी पाच वर्ष इथेच आहे. परत असे घडले तर याद राखा...” बोलून तेथून निघून गेले.

घाबरलेल्या अवस्थेत स्वत:ला आणि मधुराला धीर देत शांत बसला कारण अश्या अवस्थेत काहीही समजावने व समजने व्यर्थ आहे, त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही..

तितक्यात तिचे नातेवाईक आले त्यांनी एकच प्रश्न विचारला,

“काय झाले श्रीधर?

 

“ तुम्ही तिलाच विचारा काय झाले ते ? आणि तो तेथून निघून गेला.

श्रीधर एकदम डिप्रेशन मधे आला कारण कधी असे काही घडेल याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता .

त्याच्या मनात तेव्हा एकच विचार होता की मधुरा लवकरात लवकर बरी व्हायला हवी...

बाहेर जेव्हा माहित पडेल तेव्हा लोक काय बोलतील याची त्याला कोणतीही पर्वा नव्हती कारण त्याला स्वतः वर आणि आपल्या बायकोवर खुप विश्वास होता.

एकमेंकाना सावरत त्यांनी ती वेळ कशीबशी काढली, तो हॉस्पिटल चे बिल बनवून डीसचार्ज साठी जात होता तेवढ्यात तिथे ज्याचे मेडिकल आहे तो मित्र भेटला.

“ काय झाले श्रीधर? श्रीधरने झालेली सर्व हकीकत त्या मित्रास सांगितली .

 

त्या मित्राला खूप वाइट वाटले आणि म्हणाला

संशयाचे भूत ! पण शेवटी आपलेच नुकसान होते रे...

काही आठवडे उलटल्या नंतर, मधुरा नॉर्मल झाल्यानंतर श्रीधरने मधुराला विचारले

“असं काय झाले होते की तू फीनेल प्यायलिस?... तेव्हा ती म्हणाली,

 

“ माझे तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तुझ्याविना सर्व शून्य आहे, तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार ही करू शकत नाही..

मला थोडी भीती वाटली त्या दिवशी तू लेट आलास आणि फोन चे पण उत्तर बरोबर देत नव्हतास, त्यामुळे मला वाटले की मला सोडून दुसरीकडे तर नाही ना जात आहेस

 

. पण जेव्हा हॉस्पिटल मध्ये तू माझ्या साठी रात्रभर झोपला नाहीस तेव्हा मला जाणीव झाली तू माझाच आहेस, फक्त माझाच....

आणि माझ्या डोळ्यांत पाणी आल असं कसं घडल माझ्या कडून?

पण तुझ वागण पण अस होतं कि माझ्या मनात संशय निर्माण झाला .

 

“तू सकाळी निघालास तेव्हा पॅनकार्ड, रेशन कार्ड आणि फोटो घेऊन, बांद्रा कोर्ट ला मित्राचे लग्न म्हणून सांगून निघालास आणि नंतर तुला उशीर झाला म्हणून मी तुला फोन केला,तर तू फोन उचलत नव्हतास आणि मध्ये मध्ये मोबाईल बंद येत होता,म्हणून मग मी तुझ्या मित्राला फोन केला तेव्हा त्यानी सांगितलं की

“श्रीधर माझ्या सोबत नाही ,मी तर माझ्या मेउणीच्या लग्नाला आलो आहे...”

तो तुझा मित्र एवढे बोलल्यावर मला काहीच सुचलं नाही आणि मग काय करू नि काय नाही काहीच समजत नव्हत .मला वाटलं कोणा दुसरी सोबत तर नाहीस ना ? म्हणून मी.....

अस म्हणत मधुरा भावुक झाली.... पण श्रीधर मात्र हे ऐकल्यावर शॉक झाला

“खरचं किती प्रेम करतेस माझ्यावर आज जाणीव झाली, पण होतं ते चांगल्या साठीच हे सिद्ध झाले. मधुरा तुझं वागणं बरोबर आहे अग ज्या वेळीस त्यांचे लग्न झाले तेव्हा घरच्यांचा विरोध असल्याकारणा मुळे पोलीस चोकी वगैरे मध्ये वेळ झाला नंतर तो मित्र लगेच गावी निघाला ,कारण मुलीच्या घरच्यांचा विरोध असल्या मुळे एकाच एरियात राहणे थोडे दिवस चुकीचे होते म्हणून संध्याकाळची बसची तिकीट काढली,नंतर तो म्हणाला पार्टी घेतल्या शिवाय जाऊ नकोस म्हणून मी थांबलो, त्यात माझा फोन ची बॅटरी कमी होती आणि कुणाचा फोन आला की बंद व्हायचा त्यामुळे मी तूला रिप्लाय देऊ शकलो नाही...... सॉरी .....ग....आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मी ज्याच्या लग्नात साक्षीदार म्हणून गेलो तो माझ्या ओळखीचा नव्हता तो माझ्या मित्राच्या ओळखीचा होता आणि त्याच्या शब्दावर गेलो होतो आणि तोच आला नव्हता कारण तो त्याच्या मेउणीच्या लग्नात गेला होता.... असो, जे घडलं ते चांगले म्हणता येणार नाही पण त्या घटनेने आपल्याला मात्र अजून जवळ आणलं....

आता पुन्हा असं वागणार नाही एवढी माझ्या कडून तुला हमी देतो मधू...... माय स्वीट हार्ट....

 

“आणि मी पण तुला वचन देते, काहीही झालं तरी मी माझ्या डोक्यात संशयाच भूत येऊ देणार नाही....आणि अस वागणार नाही.... तुझ्यात जीव गुंतलाय रे माझा...

 

“सॉरी श्रीधर...…ती त्याच्या जवळ गेली

I love you...

 

I love you to मधू.....

 

दोघांनीही एकमेकांना मिठीत घेतल.......

 

समाप्त::::

 

संशयाच भूत खरच खूप हानिकारक आहे, हा किडा केव्हा, कुणाच्या डोक्यात जाईल सांगता येत नाही....आणि कुणाचं आयुष्य कोणत्या वळणावर घेऊन जाईल देवच जाने....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//