जिथे सागरा धरणी मिळते..भाग 11
ती, "हो पण मी सकारात्मकच होते पण मला का कोणास ठाऊक आज त्या मॅनेजर चा खूप राग आला होता ,आधी जर कळवले असते तर ,मी इतर कुठे ही मॅनेज केले असते, पण असू दे त्यानेच तर पुन्हा ही आयडिया देऊन मला टेबल दिलाच.."
तो, "ओके आता आपण ज्या कामासाठी इतकी ही खटाटोप केली आहे ,ते करूया का ? नाहीतर ही वेळ ही निघून जायची आपल्या हातातून आणि मग कोणी आपल्याला ही वेळ पुन्हा देणार नाही ,टेबल बुक होऊ शकतो पण वेळ वेळीच बुक केली नाही तर हवा असलेला माणूस ही गेल्यावर पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही "
ती,"खरंय, टेबल मिळाला पण आज जो आवडला आहे तो उद्या इतर कोणाला ही आवडू शकतो, मग ज्याला तो आवडला आहे तो आपल्या का परत देईल.."
दोघांना ही एकमेकांच्या बोलण्याचा इशारा कळला नाही, दोघे ही कळत नकळतपणे एकमेकांना होकार देत होते पण त्यांना कळत नव्हते..त्यांच्या दोघांच्या ही मनात दोघे उतरले होते...पण तरी ही स्पष्टपणे होकार असा मिळत नाही तोपर्यंत ते गप्प होते.
ती, "समीर आत्ता तुम्ही काय म्हणालात, आपल्या हवा असलेला माणूस. !! "
तो,"आणि तुम्ही ही काय म्हणालात,
तो," पण तुम्ही जो आपल्याला आवडला आहे तो म्हणजे !! "
ती, " आधी तुम्ही सांगा तुमच्या ह्या बोलण्याचा काय अर्थ समजावा "
तो, "म्हणजे मला तुम्ही आवडला आहात हाच एक अर्थ आहे त्याचा.."
ती, "म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल अजून काही जाणून न घेता तुम्ही तुमची पसंती देत आहात का? "
दोघे ही होकाराच्या निर्णयावर आलेच होते,पण काय होईल..पुढे..
क्रमशः..?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा