जिथे सागरा धरणी मिळते..भाग 7
तो,"तुम्ही जरा गोंधळलेलता का वाटत आहात,म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना.."
ती," मला माणसं ओळखता येतात पण मी खुपदा माणसे ओळखतांना माझ्या घरच्यांचा नजरेतून ओळखते..त्यांना वाटले की हा मुलगा चांगला नाही तर मग मी ही बऱ्याचदा नकार देऊन मोकळी होते ,आणि मग कळते की तो तसा चांगला होता..आपण लगेच घाई नको करायला हवी होती, नकार देण्याची.."
तो," काय काय बोलत चाललो आहोत आपण दोघे ही ,अजून तर आपलं नीटसं बोलणं ही झाले नाही ,ओळख ही झाली नाही, स्वभाव ही कळले नाही तोच नकाराची भाषा, हे मला पटत नाही. म्हणजे शुभ सुरुवातीला शुभ आणि सकारात्मक बोलू या का आपण, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेऊ शकू.."
ती त्याला एक स्माईल देत , "मला सहज मनात आले ,सुरुवातीला जी काही मुलं मी पाहिली होती त्यांच्या बाबतीत जरा घाई केली होती मी, आपण खूप तर्क लावतो कधी कधी आणि लगेच निर्णयावर येतो,पण आज नाही होणार तसे असे वाटते एकंदर हे मी माझ्या मनाला समाजावत होते ,मी मनाशी बोलत होते ..पण तुम्हाला कसे ते ऐकू गेले कळलेच नाही.."
त्याला तिचा ओघ कळला, ती कुठे तरी आपल्या बाबतीत नकारात्मक नसून सकारात्मक असावी, तिला मी कुठेतरी नाकारण्याच्या लिस्ट मधला नसावा असे वाटत असेल, हे नक्कीच.. तशी ती ही माझ्या नकारात्मक लिस्ट मध्ये नाही..बाकी पुढच्या पुढे..
दोघे आता रिसेप्शन जवळ आले होते ,त्याने लगेच त्या काउंटर वर उभ्या असलेल्या मॅनेजर कडे त्याने रुफ टॉप वर बुक केलेल्या टेबल बद्दल विचारणा केली...
ती, "मी संपदा मोहिते ,मी सकाळी आपल्याला कॉल केला होता,आणि माझ्या साठी एक टेबल बुक करायला सांगितला होता..I hope तो बुक केला असेल.."
क्रमशः??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा