Jithe Sagara Dharani Milate.....

Story Of
ईरा जलद कथा मालिका

कथेचे नाव _जिथे सागरा धरणी मिळते

भाग 2

"जर तुझ्या बाबाची निस्सीम भक्ती गणेशावर असेल तर नक्की त्याच्या मनासारखा त्यांना जावई भेटणार म्हणजे भेटणार…"
"अग आई तू पण…"
"हो मला माहीत आहे आणि गनेशावर माझा विश्वास ही आहे…तो नक्कीच आमच्या दोघांची इच्छा पूर्ण करणार…"
"देवा गणेशा आजपर्यंत बाबांनी तुझी मनोभावे सेवा केली रे त्यांच्या भक्तीला पाव त्यांना नाराज करू नकोस…"दीपा ने ही मनोभावे हात जोडले अन् नाष्टा करू लागली .
"अग दीपा कालच मी शेगदाण्याचे लाडू केले होते.. शाळेत जाता जाता तेवढे गोखले काकूंना देऊन जाशील का ग..?"
"अग आई हे काय विचारणे झाले का…दे मी जाताना त्यांना भेटून जाणार होतेच.."
"का ग काही बोलली नाहीस त्या आजारी तर नाहीत ना…?"
"अग आई अजिबात नाही त्या वॉक ला सुद्धा आल्या होत्या अगदी धडधडीत आहेत अग वीरू दादाने पैसे ट्रान्स्फर केले आहेत तेच ते काढण्यासाठी मला बोलावले होते काकूंनी त्यांच्या भावाच्या मुलीच लग्न आहे म्हणे त्यासाठी ते पैसे काढायचे आहेत काकूंना.मला बाकी काही माहित नाही."
"दिपू…"
"ह्ममम..बोल"
"दिपू तुझ मनासारखं लग्न झालं की मग आम्ही सुखाने डोळे मिटायला तयार असू ग…बाबा तर रोज काळजीत असतात तुझा दादा परदेशात गेला तो तिकडचा च होऊन गेला कधी आपले आईबाप बहीण आहेत याची दखलही घेतली नाही ग त्याने…रोज आतुरतेने वाट पाहते त्याच्या फोन ची आज वीस वर्ष झाली ना तो आला ना त्याचा फोन…" दीपाची आई अनुसया डोळ्यांना पदर लाऊन रडू लागल्या.
"आई किती रडशील रोज ..नको त्रास करून घेत जाऊ..जो मुलगा माझ्यासकट तुम्हा दोघांनाही सांभाळेल अशा मुलाशीच मी लग्न करेल आणि माझा निर्णय झालाय…"
"दिपू तुझ्या सुखात च खरे आमचं सुख असा वेड्यासारखा विचार नको करत जाऊ पोरी आम्ही काय आज आहोत तर उद्या नाही.. पण आमच्या मुळे तुझ्या सुखी संसारात उगाच विघ्न नकोय "
"चल आई नाष्टा संपला मी आवरते…"आई पुढे काही बोलणार तोच दीपा ने विषय स्टॉप केला कारण आई एमोनेशल झालेली तिला अजिबात बघवत नसे डोळे काठोकाठ भरले होते…

क्रमशः

©® सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all