Jithe Sagara Dharani Milate 6

Story Of
ईरा जलद कथा मालिका

कथेचे नाव_जिथे सागरा धरणी मिळते

भाग_6 अंतिम भाग

"दिपू त्याला कसं माफ करू मी..काय म्हणतील आपले नातेवाईक? अगं काळ फासतील आपल्या चेहऱ्याला त्याची एवढीशी चूक नव्हती ग तुझ्या आत्याला शब्द दिलेला मी की तिच्या दयमंती ला माझी सून बनवेल आणि हा शिकायला म्हणून गेला आणि तिथच लग्न करून सुखात राहिलाय कधी त्याला आई बापाची आठवण आली का?"

"बाबा तुला कोण हवेत तुझी मुले की तुझे नातेवाईक?"

"अगं दिपू…ते नातेवाईक आहेत रक्ताचे नाते आहे त्यांच्याशी त्यांना मी नाही तोडू शकत आणि माझ्या रक्ताच्या मुलांनाही दूर नाही करू शकत ग"

"बाबा खर तर सांगणार नव्हते रे पणं आज सांगते आहे ती जी मुलगी तुमची सून आहे ना ती देखील भारतीय आहे अन् तुझेबाल मित्र विश्वास याची मुलगी आहे..आणि तुम्हाला एक गोड नातू ही झालाय.."

"काय…?"

"होय..मी आत्या झालीय बाबा"

"अग पण हे तुला कसे समजले?"

"सांगेल पणं आधी वचन दे की तू दादू ला इकडे बोलवणार आहेस.."
नातवाला पाहण्याची ओढ लागलेल्या मनोहररावांनी सगळा राग बाजूला सारून दीपाला वचन दिलं.

"हे घे वचन पणं बोल लवकर…"

दीपा ने आई बाबा दोघानाही व्हिडिओ कॉल लाऊ. दिला जो किरण ने तिला तिच्या दादूचा नंबर दिला
होता.

डोळ्यात प्राण आणून दोघेही आपल्या लाडक्या लेकराला पाहत होते तब्बल वीस वर्षांनी.. तिकडे त्याचेही डोळे भरून आले होते हुंदका अनावर झाला होता दाटलेल्या कंठाने तो बोलला
"बाबा माफ करा मला…चूक झाली माझी मला तुमच्या मनाविरुद्ध नव्हते वागायचे पणं दयमती मला आवडत नव्हती .आणि म्हणून इथे सेटल झाल्याबरोबर मी पूर्वा शी लग्न केलं …"
"आता सगळ जाऊ देत तू उद्या इकडे येतो आहेस आमच्या नातवाला घेऊन …तुझ्या लाडक्या दिपू च लग्न सुद्धा जमवायचं आहे…"

दोन दिवसातच रुपेश आपल्या घरी आला बाप्पाच्या कृपेने रुपेश च्या मित्राचं बाबाच्या मनासारखं स्थळ आले अन् दोन महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली देखील..
नववधूच्या वेषेत उभ्या असलेल्या आपल्या लेकीला मनोहरराव डोळे भरून पाहत होते…श्री गणेशाच्या आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने सागराला धरती मिळाली होती…!!!


समाप्त…..

©® सविता पाटील रेडेकर
नेसरी



🎭 Series Post

View all