Jithe Sagara Dharni Milate 4....

Story Of
ईरा जलद कथा मालिका

कथेचे नाव _ जिथे सागरा धरणी मिळते

भाग 4

"अगं दिपू…." मनोहर रावाच्या हाकेने दीपा शुध्दीवर आली अन् लागलीच तिने डोळे पुसून दादुचा फोटो गादी खाली दडवला.अन् चेहरा धुण्यासाठी बाथरूमला पळाली जाताना फोटो घाईगडबडीत उलटा ठेवल्यामुळे तिच्या दादूची प्रतिमा बाहेरून स्पष्ट दिसत होती . मनोहर राव तिच्या बेड जवळ येऊन उभे राहिले पणं त्यांचं लक्ष आपल्या मुलाच्या फोटोवर गेले अन् पुसलेले डोळे पुन्हा भरून आले.त्याच्या चेहऱ्याकडे एकटक ते पाहत होते क्षणभर त्याच बालपण त्यांच्या डोळ्यात उभ राहिल…किती हट्टी होता तो हवे ते हवेच असायचे घरात मोठा म्हणून त्याची प्रतेक इच्छा त्यांनी प्रेमाने पुरवली..काय काय नाही केलं जेवढं जमेल तेवढे सगळे लाड पुरवून झाले…बारावीत बोर्डात जेंव्हा तो पाचवा आला होता तेंव्हा तर आई बाबाच्या समोर आकाश ठेंगणं होतं.पणं अमेरिकेला पुढच्या शिक्षणासाठी जायचा निर्णय आमच्या सगळ्या आनंदावर विरजण पाडून गेलं.गेलास ते गेला पोरा पणं कायमचा तिकडचाच होऊन गेलास रे….मुलाचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात करायचं होत तेही आमच्या नशिबात नाही अरे…मेल्यावर अग्नी तरी द्यायला येशील का रे? एका मुलाचं जे कर्तव्य असत ना ते तरी पार पाड लेकरा मेल्यावर आमच्या आत्म्यास तेवढीच शांती लाभेल …तुला दूर करून खरच तुझ्या नजरेत मी चुकीचा बाप असेन रे.. पण जो निर्णय मी घेतला तो एका अर्थाने बरोबर होता…तुझ्या मामाना आपल्या सर्व नातेवाईकांना मी काय सांगणार होतो?की माझ्या मुलाने परदेशी मुलगी पळवून आणली आहे..किती अपमान सहन करावा लागला असता तुझ्या आई बापाला याचा जरा तरी विचार केलास का रे?अरे अस का केल तू..लग्न केलं तुमच्या मनासारखं तिथेच स्वतः सेटल झालास..तुझा जॉब अन् बायकोसोबत तू रमून गेलास कधी जन्म दिल्या आई बाबाची आठवण ही आली नाही का रे? अरे रोजची सकाळ आणि रात्र तुझ्या आठवणी शिवाय सरत नाही.तुझा कधीतरी फोन येईल या आशेवर आम्ही दिवस ढकलत आहोत…याच तरी भान ठेव रे…तुझ्या लाडक्या बहिणीच लग्न आहे करायचं..फक्त आमच्यासाठी ती लग्न करायला नाही म्हणतेय तुला तर हे पटेल का रे?

क्रमशः

©® सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all