Jithe Sagara Dharani Milate...

Story Of
ईरा जलद कथा मालिका
कथेचे नाव _जिथे सागरा धरणी मिळते
भाग 3

डोळे काठोकाठ भरले होते..आज वीस वर्ष आई बाबाचे दुःख स्वतः च्या डोळ्यांनी ती पाहत होती.आई आजारी पडली की सतत तिच्या लाडका दादू दिपेशच नाव घ्यायची आणि इथे बिचाऱ्या दीपाची अवस्था बिकट व्हायची.होय तो दीपाचा लाडका दादा होता बारावी झाल्यावर स्वतः च्या हट्टाने परदेशात तो शिकण्यासाठी गेला होता पाच वर्षाचा व्हिसा संपल्यावर तो मायदेशी परतणार होता पण त्या आधीच त्याच्या लग्नाची बातमी घरच्यांना समजली.आणि बाबांनी रागानेच त्याच्याशी असलेल्या नात्याचा संबंधच कायमचा तोडून टाकला..पुढे कितीतरी दिवस बिचारी आई मुलाच्या अश्या वागण्याने अंथरुणाला खिळली. दीपाचे बाबा सरकारी नोकरीत असल्याने घरच्या परिस्थिती ची तितकी काळजी नव्हती पणं आपल्या माणसाने आपल्यासोबत च रक्ताचे नाते तोडावे यासारखा अन्याय सहन होत नव्हते तिच्या आई बाबांना..दोन वर्षांपूर्वी मनोहरराव ही रिटायर्ड झाले होते अन् दीपा माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाली होती.तिचा पगार आणि बाबाची पेन्शन यामुळे पैश्याची अजिबात चणचण भासत नव्हतीच..
आपल्या दादाचा फोटो छातीशी कवटाळून ती रडत होती .
दादू खूप वर्ष लोटली रे …ये ना आता आपल्या देशात ,,आपल्या माणसात,, आपल्या आई बाबाच्या प्रेमात बघ किती ते सुख असत…का दादू आठवणही येत नाही रे तुला …आता माझं ही लग्न होईल रे..मी ही निघून जाईल सासरी…आई बाबांना सोडून तरी कशी जाऊ रे मी सांग ना…माझे लग्न जमवू नकोस म्हणून तर गणेशाला आळवत आहे मी…प्लीज दादू ये ना रे ..माझ्या लग्नात तुला नाचायचं आहे ना..तुझ्या लग्नात नाही रे नाचता आले मला पणं माझ्या लग्नात तरी ही इच्छा पूर्ण होऊ देत.. दीपा आपल्या फोटोतल्या भावाला रडून विणवत होती.अन् नुकतेच तिला प्रसाद देण्यासाठी आलेले मनोहरराव तिचे बोलणे भरल्या डोळ्यांनी ऐकत होते…भावासाठी आपली मुलगी आपले लग्न न होण्यासाठी देवाला आळवते आहे हे ऐकून तिचा राग ही येत होता…अन् प्रेम ही येत होत कारण रक्ताच्या दोन्ही लेकराच एकमेकांवरील प्रेम बघून डोळेही काठोकाठ भरलेले होते. कितीही केलं तरी बहीण भाऊच ते जगावेगळं बहीण भावाच नातं…!

क्रमशः

©® सविता पाटील रेडेकर
नेसरी



🎭 Series Post

View all