Jithe Sagara Dharni Milate....

Story Of
ईरा जलद कथा मालिका

कथेचं नाव _जिथे सागरा धरणी मिळते
भाग 1

हिवाळ्याचे दिवस होते…थंडीने कुडकुडत फिरायला जाण्याची तिची रोजची सवय आजही ती फिरायला निघाली होती.अंगावर स्वेटर कानाला गुंडाळलेला स्कार्फ आणि पायात स्पोर्ट्स शूज…

लहानपणापासून ते आज तेवीस वर्षापर्यंत तिने कधीही आपल्या या मॉर्निंग वॉक मध्ये खंड पडू दिला नव्हता.रोज नित्यनियमाने तीने हा छंद जोपासला होता.
"गूड मॉर्निंग….दीपा"
"गुड मॉर्निंग…काकी"
रोज या दोघींची भेट व्हायची वर्षभरापूर्वीच गोखले काकीशी तिची ओळख झालेली त्यामुळे नित्य नियमाने दोघीही वॉक चा पुरेपूर आनंद घेत असत.

दीपा तशी पदवीधर होती.एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.लग्नाचं वय झालं होत पणं म्हणावं तसं स्थळ तिला मिळत नव्हते.दिसायला गोरीपान, लांबसडक काळेभोर केस, नाकेली,काळेभोर डोळे , दाट पापण्या,अन् कोणालाही पाहताक्षणी मोहित करेल अस खळखळनारे हास्य अशी सुंदर असलेल्या दीपाला आजपर्यंत लग्नासाठी स्थळाची रांग लागली होती.पणं तिच्या बाबांच्या मनासारखं एक ही स्थळ भेटत नव्हतं.

दीपाच्या बाबांना सुंदर उच्च शिक्षित पदवीधर स्वतः चा बिझिनेस सेटल मिन मिळाऊ मुलगा हवा होता. आतापर्यंत आलेली अनेक स्थळ ही श्रीमंत होती पणं साऱ्याजवळ आपल्या श्रीमंतीचा गर्व होता.आणि हेच तिच्या बाबांना पटत नव्हते. दीपाची काळजी त्यांना नेहमी भेडसावत असे.आधीच स्वतः मधुमेहाने त्रस्त असलेले दीपाचे बाबा मनोहर सतत आजारी असायचे. आपलया लाडक्या लेकीच आपले डोळे मिटन्या आधी तिचे लग्न आपल्याला पाहायला मिळू देत अशी विनवणी ते रोज श्री गणेशाला करत असत.गणपतीचे निस्सीम भक्त असलेले मनोहर राव दर मंगळवारी गणेशाला दुर्वा भक्ती भावाने अर्पण करीत…

" दीपा..अग पोहे थंड होताहेत ये लवकर…"
" हो आई आलेच…"
थोड्या वेळापूर्वी वॉक करून जस्ट अंघोळ आटोपून ती जिना उतरत बोलली.
"आई बाबा नाही आहेत आज कुठे आहेत ग?"
"अग दीपा आज मंगळवार ना…मग कुठे असणार आपले नेहमीच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले आहेत.."
"अग आई किती वेळा सांगायचं बाबांना की उगाच उपवास करत जाऊ नका…आधीच बीपी चां त्रास त्यात हे उपवास करतात आणि मग पुन्हा तबीयत बिघडते…मला सांग एवढे देव देव करून नक्की बाबांना मनासारखा मुलगा भेटणार आहे का?"

क्रमशः..


©® सविता पाटील रेडेकर
नेसरी
🎭 Series Post

View all