जिंदगी मे कभी कोई आये ना रब्बा...भाग 2

Katha tyachya premachi

जिंदगी मे कभी कोई आये ना रब्बा...भाग 2


भाग 1 पासून समोर


पण आज पायल क्लासमध्ये आलीच नव्हती. त्यामुळे सगळे तास खूप कंटाळवाणे गेले. अनामिक क्लासच्या बाहेर पडला तर त्याला कॅटीनबाहेर तिची गाडी दिसली, म्हणून त्याने आत डोकावून पाहिले.

पायल, विनीत आणि त्याचा ग्रुप बसला होता. विनीत तिला जोर-जोरात काहीतरी ओरडत होता. ती खाली मान घालून बसली होती.  कदाचित रडतही  असावी. शेवटी वैतागून ती बाहेर पडली.

तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. नक्कीच काहीतरी भांडण झालं होतं. अनामिक बाहेरच उभा होता.

तिने एकदा त्याच्याकडे बघितले आणि गाडी चालू करून निघून गेली.


अनामिकने पण गाडी काढली आणि घरी न जाता, गाडी समुद्राकडे वळवली. त्याचा अंदाज खरा ठरला. दूरवर पायल गुडघ्यात डोकं खुपसून रडताना दिसली. तो तिच्या जवळ गेला, तिच्या बाजूला जाऊन बसला.


त्याला बघताच तिने डोळे पुसले, आणि दुसरीकडे कुठेतरी बघत बसली. बराच वेळ शांततेत गेला, मग तिच म्हणाली, 

“विनीत खरंच खूप चांगला आहे रे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. पण तो माझ्या बाबतीत खूप पझेसीव्ह आहे. मी दुसऱ्या कुणाशी बोललेलं त्याला आवडत नाही.. काल आपण इकडे गप्पा मारल्या ते त्याला कुणीतरी सांगितले, ते त्याला आवडले नाही. प्लीज तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये.”


एवढे बोलून ति निघून गेली.


तो मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला.

दुसऱ्या दिवशी अनामिक विनीत आणि पायलला भेटला. त्याला खात्री पटवून दिली की तो समजतोय तसे काही नाहीये. त्यालाही ते पटले. मग भरपूर गप्पा मारून, ती दोघ निघून गेली.


पण का कुणास ठाऊक त्यानंतर त्या दोघांमधील भांडण वाढतच गेली. कारण एकच, त्याचा पझेसिव्हनेस, कधी तिने केस मोकळे सोडले म्हणून, कधी लिपस्टिक लावले, कधी शॉर्ट स्कर्ट घातला, तरी कधी अजून काही.

रोजची भांडण, रोजची रडारड. कधी ती अनामिकला भेटून त्याला समजवायला सांगायची, तर कधी तो अनामिकला भेटून तिला त्याच्यासाठी समजवायला सांगायचा.

दोघेही त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम अनामिकला जवळ सांगायचे.
एकदा पायल त्याला म्हणाली,

“तू वकील का होत नाहीस? चांगलं बोलता येतं तुला.” त्यावर तो खळखळून हसला होता.


कित्येक दिवस गेले, भांडण मात्र या ना त्या कारणाने सुरूच होती.

विनीतचा अनामिकवर थोडा विश्वास होता, त्यामुळे तो त्याच्या मित्र-मंडळींसोबत कुठे चालला असेल तर अनामिकला पायल बरोबर थांबायला सांगायचा.

मग तो परत येईपर्यंत अनामिक तिच्याबरोबर गप्पा मारत बसायचा. एखादी कविता, तिचे गाणे गुणगुणणे, तिच्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स, गॉसिप्स सगळे काही मनापासून ऐकायचा. पहिल्या-पहिल्यांदा विनीतच्या परतण्याची वाट पाहणारी पायल, नंतर नंतर मात्र त्याच्यापासून दूर जाऊ लागली, त्याला या ना त्या कारणाने टाळू लागली.

त्या दोघांमधली दरी वाढतच गेली, आणि अनामिक आणि पायल मधील अंतर कमी कमी होत गेले.


एके दिवशी तर कमालच झाली, गावात देवीची जत्रा होती, विनीत तिला त्याच्याबरोबर यायला सांगत होता, पण बरं नाही म्हणून पायलने त्याला टाळले. 


क्रमशः

🎭 Series Post

View all