जिजाऊ आणि राजे शिवाजी

About Jijau And Shivaji Maharaj


जिजाऊ आणि राजे शिवाजी



परकीयांकडून जनतेवर होणारे
अत्याचार जिजाऊंनी पाहिले
जनतेचा होणारा छळ
पाहूनी त्यांचे मन हळहळले
जनतेच्या सुखासाठी
जिजाऊंनी स्वप्न पाहिले
आणि भवानी मातेला
जिजाऊंनी साकडे घातले
पुत्र म्हणूनी बाळ शिवाजी
जिजाऊंच्या पोटी जन्मास आले
जिजाऊंनी शिवाजींना
स्वराज्याचे बाळकडू पाजले
युद्धकला आणि शास्त्रात
त्यांना पारंगत केले
लहानपणापासून त्यांना
चांगल्या संस्कारांनी घडविले
शिवाजींनी तोरणा जिंकून
स्वराज्याचे तोरण बांधले
गनिमी काव्याने शत्रूला
राजांनी पराभूत केले
कधी शक्ती तर कधी युक्तीने
समस्यांना तोंड दिले
गड,किल्ले, प्रदेश जिंकून
आपले साम्राज्य वाढविले
गरीब जनतेचे आणि
दुःखितांचे कैवारी झाले
सर्व जनतेला त्यांनी
एका छत्राखाली आणले
आणि माता जिजाऊंनी
पाहिलेले स्वप्न पूर्ण केले
वीर व आदर्श मातेचे
पराक्रमी,आदर्श पुत्र ठरले
राजे शिवाजी जनतेचे
खरे छत्रपती झाले
जिजाऊ व राजे शिवाजी
आपल्या कार्याने अमर झाले
आणि आई व पुत्र
सर्वांसाठी आदर्श बनले