A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionb9b8467089128da5e5941c8f519dcefdde087954aad66adfbafdbf6ab61702d0e9bb4ed8): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Jhankar
Oct 27, 2020
स्पर्धा

झंकार

Read Later
झंकार

प्रेरणादायी कथा स्पर्धा 
          #झंकार
 ©अर्चना बोरावके"मनस्वी
     सकाळची वेळ म्हणजे राधासाठी मोठी कसरतीची वेळ! मुलांचे आणि मिस्टरांचे डबे , सगळ्यांचा चहा - नाश्ता, घर आवरणे, सासू सासऱ्यांना मधून मधून हवे नको विचारणे... पायाला भिंगरी लावून नुसती पळतच रहायची ती. मागच्या बावीस वर्षापासुन हेच तीचे रुटीन होते ! सणवार असेल तर अजूनच कामे! पाहुणे तर सतत सुरू असायचे. घर म्हणजेच तीचं विश्व झालं होतं. 
         किचनची कामे आटपून आता तीने एकेक रूम आवरायला घेतली होती. लेक प्रिया आता कॉलेजला जात होती पण रूममधला पसारा पाहून एखाद्या लहान मुलाचीच रूम आहे असे वाटत होते. रात्री कसलासा प्रोजेक्ट करत बसली होती. आणि सगळा पसारा तसाच ठेवून आता कॉलेजला गेली होती. पदर खोचून राधा कामाला लागली. एकेक वस्तू जागेवर ठेवत असताना तिची नजर बेडवर पडलेल्या घुंगरूंवर गेली. घुंगरू हातात आले आणि तिचे डोळे पाण्याने भरून गेले. 
        किती आवड होती तिला नृत्याची! पण घरच्यांनी कधी शिकू दिले नाही. नाचणे त्यांना कमीपणाचे वाटे. शाळेत, कॉलेजात कधी नाचात भाग घेऊ दिला नाही. इतर मुलींना नाचताना बघून तिचे पाय आपोआप थिरकायला लागत. पण हे पायांचं थिरकणं तेव्हड्यापुरतचं! तो नाच कधी कुणासमोर आलाच नाही. कधी कधी ती दार लावून एकटीच खोलीत नाचत असे पण सगळ्यांपासून चोरून! 
         कॉलेज संपल्यावर लगेच लग्न झालं. आणि घरातल्या कामांच्या रहाटगाडग्यात तिचा नाच कुठेतरी हरवून गेला. आपल्याला नृत्याची किती आवड होती हे तर ती केव्हाच विसरून गेली होती. मनातल्या घुंगरांचा झंकार, घरातल्या भांड्यांच्या आवाजात तिने दाबून टाकला होता.........पण प्रियाला मात्र तिने भरतनाट्यमचा क्लास लावला होता. आता ती त्यात चांगली पारंगतही झाली होती. दुधाची तहान तिने ताकावर भागवली होती. प्रियामध्ये ती स्वतःलाच पहात होती......... घुंगरू हातात येताच राधाला आज पुन्हा सगळं आठवलं. जुन्या जखमेवरची खपलीच जणू निघाली. तेव्हड्यात प्रिया धावत पळत रूममध्ये आली. तिचा प्रोजेक्ट घरीच राहिला होता. आईच्या हातातले घुंगरू आणि डोळ्यातले पाणी तिला न बोलताच बरच काही सांगून गेले. 
                   
            भरतनाट्यम कला अकादमी आज उत्साहाने ओसंडून वहात होती. नृत्याचे धडे पूर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा अरंगेत्रमचा कार्यक्रम होता. (नृत्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावरचा स्टेजवर होणारा पहिला कार्यक्रम)  प्रिया तिच्या गेट अपमध्ये खूपच छान दिसत होती. सगळ्या नातेवाईकांना  खास बोलावले होते प्रियाच्या कार्यक्रमासाठी! दोन्हीकडचे आजी आजोबा अगदी पहिल्या रांगेत बसले होते नातीचे कौतुक बघायला. प्रियाचा डान्स सुरू झाला. तिची घुंगरांच्या तालावर थिरकणारी पाऊले, सुंदर पद लालित्य, चेहर्‍यावरचे अप्रतिम हावभाव आणि नृत्य कौशल्य बघून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. आजी आजोबांनी तर उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. 
   कार्यक्रम संपला असे वाटत असतानाच निवेदिकेने घोषणा केली कि, " आता आजच्या दिवसाचा शेवटचा नृत्याविष्कार सादर होत आहे. ही एक नृत्याची जुगलबंदी आहे आई आणि मुलीची...... जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या प्रिया आणि राधा सावंत यांचे!"     सगळ्या नातेवाईकांचा त्यांच्या कानांवर विश्वासच बसेना. राधाला नृत्य करताना कुणी कधी पहिलेच नव्हते. 
     परदा वर गेला. नृत्याच्या मंचावर दोन नृत्यांगना अवतरल्या. एक जणू दुसरीची सावलीच.... एकमेकींचे प्रतिबिंबच! संगीताच्या तालावर, घुंगरू बोलू लागले. दोघीही एक से बढ़कर एक..... शिव आणि शक्ति जणू मंचावर प्रकटले होते. सगळे प्रेक्षक मंत्र मुग्ध होऊन गेले. नृत्य संपले पण टाळ्यांचा गजर काही थांबेना. मग प्रियाने हातात माइक घेतला आणि बोलू लागली, " सर्वांचे मनापासून धन्यवाद! आजचा दिवस खरचं खूप अविस्मरणीय आहे. माझं अरंगेत्रम पूर्ण झालं यापेक्षा मला जास्त आनंद आहे, माझ्या आईचं स्वप्न आज पूर्ण झालं. इतकी वर्ष तीचं मन  आम्हाला कळलच  नाही. दुसर्‍याचं हवं नको बघता बघता आपल्याला काय हवं हेही ती विसरून गेली होती. आम्ही सगळेच किती स्वार्थी होतो, आमच्या स्वप्नांमागे धावत होतो, आईचंही स्वप्न असू शकतं, तिलाही काही आवड असू शकते हेच विसरलो होतो. पण जेव्हा मला याची जाणीव झाली तेव्हा मात्र मी ठरवलं, आई ने लहानपणापासून मनात जपलेली इच्छा पूर्ण करायची! मागच्या एक वर्षापासून तीने मेहनत सुरू केली आणि जिद्दीने आज तुमच्या समोर उभी राहिली. आता मी तिला थांबू देणार नाही... तिचा हा प्रवास आता सुरू झाला... तो कधीही न थांबण्यासाठी! "
         प्रियाच्या दोन्ही आजी आजोबांनी राधाचे खूप कौतुक केले. बाबांनी तर तिला सॉरीही म्हटले. सर्वांनाच आता जाणीव झाली होती कि, आपण कधी तीचं मन जाणूनच घेतलं नाही. तिला सगळे जण गृहीत धरूनच चालले होते इतकी वर्ष! राधाला मात्र आता गेलेल्या क्षणांचे दुःख नव्हते. कला जोपासायला वयाचे बंधन नसते हे तिला कळून चुकले होते. घुंगरांच्या मधुर नादाने तिच्या हृदयाच्या तारा झंकारल्या  होत्या. हा झंकार आता ती कायम जपणार होती तिच्या तनात, तिच्या मनात आणि तिच्या आयुष्यात! 
       आवडल्यास कृपया नावासह शेअर करा. 

अर्चना बोरावके"मनस्वी"
माझे सर्व लेख आणि कथा वाचण्यासाठी माझ्या #मनस्वी या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.