Login

झाकली मूठ - प्रेमाची (भाग - ३)

ही एक दिर्घकथा आहे.
रेवा आणि विराजच आवरून झाल्यावर तिघेजण देवीच्या देवळात आले. रेवा पहिल्यांदा गावच्या देवीच्या दर्शनाला आल्याने वैशाली ताईंनी तिला ओटी घ्यायला लावली.

दोघांनी देवीच दर्शन घेतलं आणि रेवाने देवीची ओटी भरली. मग भटजी काकांच्या पाया पडले तसं त्यांनी देवीच कुंकू रेवाच्या कपाळावर कुंकू लावून तिच्या ओटीत गजरा आणि प्रसाद दिला. तिघेही काहीवेळ देवीच्या गाभाऱ्यात बसले. वैशाली ताईंनी ओटीतला गजरा रेवाच्या केसांत माळला. 
 
काहीवेळानंतर, तिघेही प्रदक्षिणा घालण्यासाठी उठले. तेवढ्यात, विराजचा फोन वाजला. तो इशाऱ्याने रेवाला सांगून फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून गेला.
 
तश्या रेवा आणि वैशाली ताई प्रदक्षिणा घालू लागल्या. शेवटची प्रदक्षिणा घालून वैशाली ताई आणि रेवा पुन्हा देवीसमोर हात जोडून बाहेर येऊ लागल्या.

तेवढ्यात, मीरा आणि चिंगी आल्या. मीरा आणि वैशाली ताई बोलत बसल्या, तर रेवा आजूबाजूला बघणाऱ्या त्या चिंगीच निरीक्षण करू लागली.
 
'विराजने सांगितल्याप्रमाणे तर चिंगीच्या वागण्यावरून तिच्या बालमनावर परिणाम झालाय असं अजिबात वाटतं नाहीय. उलट खूप समंजस वाटतेय.' रेवा तिच्याकडे बघतच मनात विचार करू लागली
 
तेवढ्यात, कसल्याश्या आवाजाने ती भानावर आली. चिंगी पुन्हा हायपर झालेली होती. देवळातले सगळे तिच्याकडे बघत होते. मीरा वहिनी तिला धरून घेऊन जाऊ लागल्या. चिंगी सारखी एका दिशेला बघून ओरडत होती. तशी रेवा सुद्धा त्या दिशेला बघू लागली. 
 
एका बाईच्या ओटीत मोगऱ्याचा गजरा होता. तो पाहूनच ती इतकी वॉयलंट झालेली होती.  
 
'असं काय आहे त्या गजऱ्यात ज्याने ही इतकी वॉयलंट होते? ह्या गजऱ्याचा संबंध हिच्या बालपणातील गोष्टींशी असेल का? पण हे मला कस कळेल?' विचार करत असतानाच रेवाच्या कानांत घंटेचा नाद घुमला आणि तिच्या मनात एक नाव आलं. तिने एक नजर देवीच्या मूर्तीकडे बघितले आणि मनोभावे हात जोडले.

****

"बोला, मॅडम! आज कशी काय आठवण आली आमची? तुझा नवरा तर विसरलाच मला. तूही विसरली असशील, अस वाटल मला." कार्तिक नाराजीने म्हणाला

"असं काही नाहीय हा कार्तिक. आमच्या बोलण्यात सतत तुझं नाव असत. ईव्हन कालच विराज मला म्हणाला की, तू कार्तिक सारखी डिटेक्टीव्हगिरी करू नकोस." रेवा

"डायरेक्ट माझ्या प्रोफेशनवर आलात. असं काय बोलत होतात तुम्ही?" कार्तिकने आश्चर्याने विचारले, तशी रेवा काहीशी शांत झाली.

"रेवा, एकदम शांत का झालीस? सगळं ठिक आहे ना, तुझ्या सासरी सगळं ठीक आहे ना?" कार्तिक

"हो, ईथे सगळं ठीक आहे. ॲक्च्युली मला तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे, पण ते असं फोनवर नाही बोलता येणार. मी तुला व्हॉट्सॲपवर मॅसेज करून सगळं सांगते. कार्तिक, ईफ यू डोन्ट माईंड तू माझ्या गावी खामगावमध्ये येऊ शकतोस का?" रेवाने आढेवेढे घेत विचारले

"हो, येऊ शकतो. तसही खूप दिवस झाले मी विराजला सुद्धा भेटलो नाहीय. आमची सुद्धा भेट होईल." कार्तिक म्हणाला

"नाही, नाही. कार्तिक तू खामगावमध्ये येतोयस हे विराजला कळता कामा नये. तू फक्त कधी येणारेस ते सांग." रेवा लगबगीने विचारले

"उद्याचं येतो मी. तू मला भेटण्याचं ठिकाण सांग." कार्तिक, तस रेवाने त्याला एका जागेच नाव सांगून फोन ठेवला आणि व्हॉट्सॲपवर कार्तिकला मॅसेज करून सगळं सांगितले, तसा तोही काहीक्षण गोंधळला. नंतर त्याने चिंगीला सोबत आणण्याचं सुचवले.

तशी रेवा काही क्षण विचारात पडली. तिला कस घेऊन जाऊ शकते. नंतर 'ओके' चा मॅसेज पाठवून मागे वळली आणि दचकलो. समोर रत्ना बाई कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रागाने बघत होत्या

"एवढ दचकायला काय झालं?" रत्ना बाई

"ते तुम्ही अचानक आलात ना म्हणून." रेवाने सुटकेचा निःश्वास सोडला

"वैशाली, कितीवेळच्या आवाज देतायत तुम्हाला. ऐकू येतं न्हाई का?" रत्ना बाईंनी चिडतच विचारलं

"सॉरी." रेवा म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली.

*****

"वैशाली, उद्याची न्याहारी बांधूनच द्या आम्हाला. आम्ही दोघं प्रवासातच खाऊ. काय विराज राव!" विलासराव एक नजर विराजकडे पाहत म्हणाले

"कुठे बाहेर चाललायत का तुम्ही दोघं?" रेवाने एक नजर विराजकडे बघत विचारले

"झाली, काम होण्याआधीच माशी शिंकली." रत्ना बाई रेवाकडे बघत रागाने म्हणाल्या

तशी रेवा घाबरून वैशाली ताईंकडे बघू लागली.

"सूनबाई, बाहेर जाणाऱ्या माणसांना कुठे चाललात असं विचारू नये, कामं होत नाही म्हणतात." वैशाली ताईंनी रेवाला समजावून सांगितलं.

"सॉरी, हे मला माहिती नव्हतं पण आता विचारलंच आहे तर!" रेवा

"सूनबाई, गेल्या चार-पाच महिन्यांपासून दुधात भेसळ आहे. अशी तक्रार केलीय गावकऱ्यांनी, हे तुम्हाला माहिती असलचं! आता दुधात भेसळ आहे की, नाही ते तपासणी केल्यावर कळेल पण तपासणी करायला सुद्धा काही जणांचा नकार आहे म्हणून आज मीटिंग भरवली आहे. एकतर तपासणी करा. नाहीतर तक्रार माग घ्या आणि विराज रावांच्या डोक्यात काही उपाय योजना आहेत. त्या राबवायचा विचार चालू आहे म्हणूनच आज आमच्यासोबत ते येतायत." विलासरावांनी स्पष्टीकरण दिलं

"म्हणजे उद्या विराज घरी नाहीय तर. ग्रेट!" रेवा मनातच आनंदी झाली

"ओहह.. शीट आय एम सॉरी रेवा मगाशीच आपल ठरलेलं, उद्या आपण पूर्ण गाव फिरणार होतो." विराजने दिलगिरी व्यक्त केली.

"इट्स ओके, विराज कामही महत्वाचं आहे." रेवा समजूत घातली

"सूनबाई, आम्ही येतो तुमच्यासोबत. आपण दोघी जाऊया." वैशाली ताई

"का? नाही, म्हणजे आपण पूर्ण गाव फिरणार परत घरी आल्यावर तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनवणार आणि आपण दोघीही बाहेर गेलो, तर आजी एकट्याच राहतील ना घरी. त्यापेक्षा मी मीरा वहिनींसोबत जाऊ का? म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर!" रेवाने एक नजर विलासरावांकडे बघत विचारले

तसे विलासराव जेवण थांबवून रेवाकडे बघू लागले.

"ग्रेट! आणि त्यात न चालण्यासारख काय आहे? जा, तू मीरा वहिनींसोबत. तूही फिरून येशील आणि मलाही गिल्टी वाटणार नाही. आबासाहेब चालेल ना तुम्हाला?" विराजने एक नजर विलास रावांकडे बघत विचारले

"ह.. हो.. चालेल ना, जा तुम्ही मिरासोबत." विलासराव काहीसा विचार करत म्हणाले.

तशी रेवा मनोमन आनंदी झाली. रात्री झोपण्यापूर्वी रेवाने ठरवलेलं प्लॅनिंग कार्तिकला व्हॉट्सॲप केलं.

****

दुसऱ्या दिवशी विराज आणि विलास राव सकाळीच निघून गेले. रेवाने तयार होऊन वैशाली ताई आणि रत्ना बाईंचा निरोप घेतला आणि मीरा वहिनींच्या घरी आली. तेव्हा चिंगी बाहेरच्या व्हरांड्यात बसून खेळत होती. रेवाला आलेलं पाहताच चिंगी गालात गोड हसली, तिचं हसणं बघून रेवा सुद्धा हसली.

"एवढी नॉर्मल मुलगी मोगऱ्याचा गजरा बघून हायपर का होते?" क्षणांत रेवाच्या मनात विचार येऊन गेला.

"निघायचं?" मीराच्या आवाजाने रेवा भानावर आली.

"आपण दोघीच जातोय का? चिंगी येतं नाहीय?" रेवाने एक नजर खेळणाऱ्या चिंगीकडे बघत विचारले.

"तिला बाहेर कुठे नेत नाही आम्ही सहसा." मीरा

"तिलाही घरात बसून कंटाळा येतं असेल ना आणि आपण दोघीही बाहेर गेल्यावर घरात एकटीच राहील ती. शिवाय आपल्याला परत यायला कितीवेळ लागेल, हेही माहिती नाही. त्यापेक्षा आपण जर तिला बाहेर घेऊन गेलो, तर तिलाही बर वाटेल." रेवा आपली बाजू मांडत म्हणाली

तशी मीरा विचारात पडली. मनात कुठेतरी तिलाही रेवाच म्हणणं पटलं होतं. तीसुद्धा दिवसरात्र तिचं करून कंटाळली होती.

"देवा! प्लीज.. मीरा वहिनी चिंगीला बाहेर घेऊन जायला तयार होऊदेत." रेवा त्यांच्याकडेच बघत मनातच देवाला प्रार्थना करू लागली.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(रेवाने काय प्लॅनिंग केलं असेल? मीरा चिंगीला बाहेर घेऊन तयार होईल का? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all